Home » Chipko Movement : जेव्हा काही बायकांनी मिळून जंगल वाचवलं होतं!

Chipko Movement : जेव्हा काही बायकांनी मिळून जंगल वाचवलं होतं!

by Team Gajawaja
0 comment
Chipko Movement
Share

डोंगराच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडच्या रैंणी गावात 1974 साली एक बातमी येऊन धडकली. रस्ता बांधण्यासाठी गावातील आजूबाजूच्या परिसरातील तब्बल २ हजार पेक्षा जास्त झाडं तोडण्यात येणार आहेत. ही बातमी ऐकून गावात एकच खळबळ उडाली. का? कारण ती झाडं गावकऱ्यांसाठी फक्त झाडं नव्हती, ती त्यांचं सगळं काही होती. जडीबुटी, फळं-भाज्या, लाकूड, सगळं त्या जंगलातून मिळायचं. पण वन विभाग आणि ठेकेदारांना याची कायच पर्वा होती. त्यांनी एक डाव टाकला. गावकऱ्यांना मोबदला देण्याच्या बहाण्याने सगळ्या पुरुषांना दुसऱ्या गावाला पाठवलं आणि गुपचूप जंगलात कुऱ्हाड घेऊन मजूर पाठवले. पण त्यांना काय माहीत, रैंणीच्या बायकांची हिम्मत काय आहे! गौरा देवीच्या नेतृत्वाखाली 21 बायका आणि काही पोरं जंगलात गेले. ठेकेदारांनी धमक्या दिल्या, बंदुका काढल्या, पण गौरा देवी म्हणाली, “ मार गोळी, पण आमची झाडं कापायची नाही!” मग काय झालं? सगळ्या बायका झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या. आणि सुरू झालं झाडांना वाचवण्यासाठी केलं गेलेलं सर्वात मोठं आंदोलन चिपको आंदोलन. (Chipko Movement)

ही गोष्ट आहे 1974 सालची, जेव्हा उत्तराखंडच्या रैंणी गावात वन विभागाने रस्त्यासाठी २ पेक्षा जास्त झाडं झाडं तोडायची परवानगी इलाहाबादच्या सायमंड कंपनीला दिली. इथली झाडं म्हणजे गावकऱ्यांसाठी सोनं! त्यापासून शेतीसाठी हत्यारं बनायची, कारण इथल्या झाडांचं लाकूड हलकं, मजबूत आणि टिकाऊ होतं. पण गावकऱ्यांना झाडांच्या वापरावर बंद घातली गेली आणि सायमंड कंपनीला टेनिस-बॅडमिंटनचं साहित्य बनवायला तीच झाडं देण्याचं ठरलं. गावकऱ्यांना हे कसं चालणार होतं? त्यांनी ठरवलं, “आम्ही ही झाडं कापू देणार नाही!” (Top Stories)

The Chipko Movement

14 फेब्रुवारी 1974 ला चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली गावात सभा झाली. सगळ्यांनी मिळून ठरवलं की या जंगलतोडी विरुद्ध मोर्चा काढायचा 15 मार्चला गावकऱ्यांनी जंगलतोडीविरुद्ध मोर्चा काढला. 24 मार्चला विद्यार्थ्यांनीही तसाच मोर्चा काढला. आंदोलनाला जोर येत होता, पण वन विभागाने एक चाल खेळली. त्यांनी गावकऱ्यांना मोबदला देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या गावात बोलावलं, आणि आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी दुसऱ्या गावात बोलावलं. गावात फक्त बायका आणि पोरं उरले. ठेकेदारांना हीच संधी हवी होती. ते मजुरांना घेऊन जंगलात घुसले.

पण त्यांना काय माहीत या बायका सुद्धा त्यांना भारी पडणार आहेत, एका छोट्या मुलीने त्यांची ही चाल पाहिली. तिने धावत जाऊन गावातील एक बाई गौरा देवीला सांगितलं. गौरा देवीने 21 बायका आणि काही पोरांना घेऊन जंगलात धडक मारली. तिथे गेल्यावर त्यांनी ठेकेदार आणि मजुरांना थेट सुनावलं, “हे आमचा माहेर आहे, यातून आम्हाला जडीबुटी, लाकूड, फळं-भाज्या मिळतात. ही झाडं कापली तर पुर येईल, आमचं सगळं वाहून जाईल!” ठेकेदारांनी धमक्या दिल्या, बंदुका काढल्या, पण गौरा देवी डगमगली नाही. ती पुढे उभी राहिली आणि म्हणाली, “मार गोळी, पण आमची झाडं कापायची नाही!” (Chipko Movement)

त्या 21 बायकांनी झाडांना मिठी मारली. “आम्हाला कापा, पण ही झाडं कापायची नाही!” असा नारा दिला. त्यांचा हा लढा पाहून मजुरांचं धैर्य खचलं. ठेकेदारांनी खूप प्रयत्न केले, पण गौरा देवी आणि तिच्या साथीदारांनी हार मानली नाही. शेवटी ठेकेदारांना माघार घ्यावी लागली. ही बातमी रैंणी गावापासून पसरत गेली. दुसऱ्या दिवशी आसपासच्या गावातले लोक रैंणीत जमले. आता हा लढा फक्त रैंणीचा नव्हता, तर संपूर्ण उत्तराखंडचा झाला होता!

================

हे देखील वाचा : Tilbhandeshwar Temple : तिलभांडेश्वर महादेव मंदिराचे रहस्य, दरवर्षी वाढते शिवलिंग

================

या आंदोलनाचं नाव पडलं चिपको आंदोलन. कारण बायका झाडांना कापण्यापासून वाचवण्यासाठी मिठी मारून चिपकल्या होत्या! हा लढा फक्त झाडं वाचवण्याचा नव्हता, तर पर्यावरण आणि गावकऱ्यांच्या आयुष्याचा होता. 1970 साली आलेल्या भयंकर पुराणे सगळं उद्ध्वस्त केलं होतं. गावकऱ्यांना माहीत होतं, ही झाडं नसती तर पुरामुळे सगळं वाहून गेलं असतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं, “आम्ही आमची झाडं वाचवणार!”

गौरा देवी, जी फक्त पाचवीपर्यंत शिकली होती, ती या आंदोलनाची हिरो बनली. तिच्या हिम्मतीने चिपको आंदोलन देशभर पसरलं. हिमाचल, कर्नाटक, राजस्थान, बिहारपर्यंत या आंदोलनाचा आवाज पोहचला. इतकंच काय, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हिमालयातल्या जंगलात 15 वर्षांसाठी झाडं तोडण्यावर बंदी घातली. चिपको आंदोलनाने पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा सगळ्या देशात मोठा केला. (Chipko Movement)

पण यात सगळ्यात खास काय होतं? बायकांचा सहभाग! पहाडी बायका जंगलाशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांना जंगलातून चारा, लाकूड, पाणी, सगळं मिळायचं. झाडं तोडली गेली, तर त्यांचं आयुष्यच उध्वस्त होणार होतं. म्हणून गौरा देवी आणि तिच्या साथीदारांनी हा लढा लढला. त्यांनी फक्त झाडं वाचवली नाहीत, तर त्यांनी दाखवून दिलं की “आम्हीही लढू शकतो!” (Top Stories)

चिपको आंदोलनाने सगळ्या जगाचं लक्ष वेधलं. गौरा देवीला “चिपको वुमन फ्रॉम इंडिया” म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या आंदोलनाने दाखवून दिलं की, पर्यावरण आणि माणसाचं नातं किती खोल आहे. आजही चिपको आंदोलन आपल्याला प्रेरणा देतं, की आपण आपल्या निसर्गाला आपणच वाचवायला हवं. तुम्हाला ही गौरा देवी आणि चिपको आंदोलनाची गोष्ट कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.