ChatGPT या तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या सोशल मिडियाच्या सीईओंवर त्यांच्याच सख्या बहिणीनं शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या आऱोपातील गंभीर गोष्ट म्हणजे, बहिण अवघी तीन वर्षाची होती, तेव्हापासून तिचे शारीरिक शोषण होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असून ChatGPIT बनवणाऱ्या OpenAI या कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यावर चहूबाजुनं टिका कऱण्यात येत आहे. मात्र सॅम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून आपल्या बहिणीला मानसिक त्रास असल्याचे सांगितले आहे. सॅम यांनी आपल्या बहिणीनं केलेल्या या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे. सॅम ऑल्टमन यांच्या प्रसिद्धीला त्यांच्या सख्या बहिणीच्या खळबळजनक आरोपांमुळे ग्रहण लागले आहे. ChatGPIT बनवणाऱ्या OpenAI या कंपनीचे सीईओ असलेले सॅम ऑल्टमन यांच्यावर त्यांची सख्खी बहिण ॲनी हिने शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. (Sam Altman)
नुसता आरोप करून ॲनी थांबलेली नाही तर तिने फेडरल कोर्टात दावाही दाखल केला आहे. या सर्व आरोपांना सॅम ऑल्टमन यांनी उत्तर दिले आहे. सोबत सॅम यांना त्यांची आई आणि दोन भावांनीही साथ दिली असून ॲनी यांचे मानसिक संतूलन ढळल्याचे कारण सांगितेले आहे. सॅमचे यांची आई कोनी आणि लहान भाऊ मॅक्स आणि जॅक यांनी यासर्व आरोपांवर एक निवेदन जाहीर करत यामध्ये सॅम यांचा कुठलाच दोष नसल्याचे सांगितले आहे. एवढे सगळे होऊनही ॲन यांच्या आरोपांमुळे जी खळबळ निर्माण होणार होती ती झालीच आहे. सॅम यांची बहीण ॲनी ऑल्टमनने गंभीर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सॅम यांनी 1997 ते 2006 दरम्यान तिचे लैंगिक शोषण केल्याचे त्यांनी कार्टासमोर सांगितले आहे. तेव्हा ॲनी अवघी तीन वर्षाची होती. मिसूरी येथील घरात सॅम अनेक वेळा आपला लैंगिक छळ करत असल्याचा ॲनीचा आरोप आहे. ॲनीने यापूर्वी 2021 मध्ये सोशल मीडियावरही असेच आरोप केले होते. मात्र तेव्हा त्यांनी कोणतीही कायेशीर कारवाई केली नव्हती. (International News)
आता मात्र यांनी ॲनी यांनी थेट फेडरल कोर्टात धाव घेतल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळन मिळाले आहे. या सर्वात आपले बालपण हरवल्याची तक्रार ॲनीने केली आहे. मोठा मानसिक आणि भावनिक हल्ला आपल्यावर झाल्याचे ॲनी यांनी कोर्टात सांगितले आहे. ॲनीने या सर्व कालावधीत आपल्या मनावर अनेक आघात झाल्याचे सांगितले आहे. तीन वर्षापासून मोठा भाऊ रहात्या घरातच अत्याचार करत असल्यानं त्यांच्यावर मोठं दडपण आल्याचेही ॲनीने सांगितले आहे. ॲनीने सॅम यांच्याकडे $ 75,000 भरपाईची मागणी केली आहे. शिवाय ज्युरी ट्रायलद्वारे केसची सुनावणी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांना प्रतिसाद म्हणून सॅम ऑल्टमनने X वर पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी या आरोपांमुळे आपण दु:खी असल्याचे सांगितले आहे. ॲनीला मानसिक आजार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आमचे कुटुंब ॲनीवर प्रेम करते आणि तिच्या आरोग्याची काळजी घेत आहे, मानसिक आरोग्याच्या आव्हानांचा सामना करत असलेल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेणे हे सर्वात कठीण काम असल्याचेही सॅम यांनी सांगितले आहे. (Sam Altman)
========
हे देखील वाचा : Ramgiri Maharaj : टागोरांनी जन-गण-मन ब्रिटिश राजासाठी लिहिलं होतं ?
OYO ने अचानक नियम का बदलले ? कपल्सचं की ओयोचं नुकसान ?
======
शिवाय ॲनीच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले आहेत. वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. एवढेच नाही तर ॲनीने केलेल्या शॉपिंगचे बिलही भरल्याचे सॅम यांनी सांगितले आहे. सॅम ऑल्टमन यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या संपत्तीमधील बराचसा भाग बहिणीच्या उपचारावर खर्च होत असल्याचे सॅम यांचे म्हणणे आहे. असे असूनही ॲनी आमच्याकडे आणखी पैशांची मागणी करत आहे आणि यासाठी ती आमच्या कुटुंबाची बदनामी करणारे खोटे आरोप करत आहेत, हे अतिशय दुःखदायक असल्याचे सॅम यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. तसेच सॅम यांनीही आता आपल्या बहिणीवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व प्रकरणामुळे सॅम यांच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असून ते यातून बाहेर पडतात की अधिक अडकतात, याकडे लक्ष लागले आहे. (International News)
सई बने