Home » अमेरिकेत आहे एलियनचा मृतदेह

अमेरिकेत आहे एलियनचा मृतदेह

by Team Gajawaja
0 comment
America
Share

एलियन परग्रही… हा शब्द ऐकला की सर्वांचीच उत्सुकता ताणली जाते. परग्रहावर सजीवसृष्टी आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. अशी सजीवसृष्टी अन्य ग्रहावर असल्यास तेथील मानवीवस्ती कशी असेल याबद्दलही कमालीची उत्सुकता आहे. त्यातूनच एलिअन म्हणजे, परग्रहावर राहणारे मानव कसे दिसत असतील याची एक प्रतिमा करण्यात आली आहे. मात्र हे परग्रहावरील मानव वास्तवात कसे असतील, याची माहिती अमेरिकेला असल्याचा खुलासा झाला आहे. हा खुलासा अमेरिकेन नेव्हीच्या माजी अधिका-यांनी थेट संसदेत केला आहे.  याबाबत धक्कादायक गोष्ट म्हणजे, अमेरिकेत अलिकडच्या वर्षात नव्हे तर अगदी 1930 मध्येच एलियनचा मृतदेह आढळला होता.  तेव्हापासून या मृतदेहावर संशोधन होत असल्याचा दावाही या अधिका-यानं करताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.  

यूएफओ म्हणजेच उडत्या तबकड्या आणि एलियनबाबत अमेरिकेत (America) सध्या धुमशान चालू आहे. अमेरिकेत एलियनचे वास्तव्य आहे, असा दावा करणारा एक गट आहे.  तसेच अमेरिकेच्या लष्करी अधिका-यांबरोबर एलियनचा संवाद होतो, असाही दावा आहे. या दाव्याबाबत आणि एलियनबाबतच्या अन्य दाव्यांबाबत थेट अमेरिकेच्या संसदेत सुनावणी चालू आहे.  या सुनावणी दरम्यान अमेरिकन (America) नेव्हीचे माजी गुप्तचर अधिकारी, निवृत्त मेजर डेव्हिड ग्रुश यांनी, अमेरिका अनेक वर्षांपासून यूएफओ आणि एलियनशी संबंधित माहिती लपवत असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका या यूएफओच्या रिव्हर्स इंजिनीअरिंगवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  विशेष म्हणजे, मेजर ग्रश 2022 च्या अखेरीपर्यंत अमेरिकेच्या डिफेन्स एजन्सीसाठी यूएपी म्हणजेच यूएफओशी संबंधित संशयास्पद घटनांचे विश्लेषक म्हणून काम करत होते. त्याच मेजर ग्रुश यांनी अमेरिकेला एलियनचा मृतदेह सापडला असून त्यांचे यानही अमेरिकेच्या (America) ताब्यात असल्याचे सांगितले. या दोघांवरही अमेरिकेचे शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत, आणि तसेच यान निर्मितीचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा मेजर ग्रुश यांनी केला आहे. मेजर ग्रुश यांनी हा दावा करताच अमेरिकेत एकच खळबळ उडाली.  सोशल मिडियावर मेसेजचा पाऊस सुरु झाला.  हा लोंढा एवढा वाढला की ,अमेरिकेच्या संरक्षण विभागाला पेंटागॉनला त्याबाबत खुलासा करावा लागला.  पेंटागॉननं असे कुठलेही एलियनवर संशोधन चालू असल्याचा इन्कार केला आहे.  

पेंटागॉननं या सर्वांचा इन्कार केला असला तरी अमेरिकेत (America) चालू असलेली परकीय जीवनावरील संसदेतील सुनावणी वारंवार पाहिली जात आहे.  कारण संसदेत कुठल्याही गोष्टीची माहिती देतांना त्यामध्ये सत्यता नसेल तर संबंधितावर गुन्हा होऊ शकतो.  याची माहिती असूनही मेजर ग्रुश यांनी अगदी तारखेनुसार एलियन सापडल्याचा खुलासा केला आहे. मेजर ग्रुश यांनी सांगितल्यानुसार 1930 च्या अपघातात दुसर्‍या ग्रहावरील अंतराळयान सापडले होते.  या यानात एक मृतदेहही सापडला होता.  हा देह माणसासारखा नव्हता.  त्यानंतर लगेच यान आणि मृतदेह लष्कराच्या अधिका-यांनी ताब्यात घेतला. अमेरिकन (America) सरकार 1930 पासून या दोघांवर संशोधन करीत आहे. मेजर ग्रुश यांनी हे सर्व सांगताना आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगून अधिक खळबळ उडवून दिली आहे.  कारण या एलियनच्या देहाला अत्यंत गुप्त जागी ठेवण्यात आले आहे. ही जागा उघड करण्यासाठी त्यांना विचारणा होत आहे, तसेच ही जागा उघड केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील अशीही धमकी मिळत आहे.  यामुळे आपल्या जीवास धोका असून आपल्या जवळची माहिती अधिक घातक असल्याचे मेजर ग्रुश यांनी संसदेत सांगितले आहे. मेजर ग्रुश व्यतिरिक्त संसदेतील सुनावणीला माजी नौसेना कमांडर डेव्हिड फ्रेव्हर आणि निवृत्त नौदल पायलट रायन ग्रेव्हज देखील उपस्थित होते.  या सुनावणी दरम्यान या दोघांनीही एलियन स्पेसक्राफ्ट पाहिल्याचा दावा करुन मेजर ग्रुश यांना पाठिंबा दिला आहे. 

=========

हे देखील वाचा : पृथ्वीला गूढ ग्रहापासून धोका

=========

2020 मध्ये, यूएफओच्या दाव्याबाबत तपासणी करण्यासाठी अमेरिकन टास्क फोर्सने एक अहवाल प्रसिद्ध केला होता.  या अहवालात 2004 ते 2021 दरम्यान तब्बल 144 वेळा परग्रहावरील यान दिसल्याची माहिती देण्यात आली. पेंटागॉनने याला अनआयडेंटिफाइड एरियल फेनोमेना म्हणजेच UAP असे नाव दिले.  याआधीही 1947 ते 1969 दरम्यान अमेरिकन एअर फोर्सने प्रोजेक्ट ब्लू बुक नावाचे एक तपास ऑपरेशन चालवले होते. यातही एलियन दिसल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या.  त्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि पायलट केनेथ अरनॉल्ड यांचा अनुभवही नोंदवण्यात आला होता.  केनेथ यांनी आकाशात एकाचवेळी व्ही पॅटर्नमध्ये 9 तेजस्वी वस्तू एकत्र उडताना पाहिल्या. त्याचा वेग ताशी 2700 किमी होता, जो त्या काळातील कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा तीनपट अधिक होता.  केनेथ यांच्या या दाव्यामुळेही खळबळ उडाली होती.  पण नंतर हे सर्व अहवाल आणि त्यावरील संशोधन संशयास्पदरित्या बंद करण्यात आले.  मात्र आता पुन्हा अमेरिकेत (America) एलिअन आणि त्यांचे वास्तव्य यावर वाद सुरु झाले आहेत.  मेजर ग्रुश यांच्या दाव्यावर आणखीन चर्चा अपेक्षित आहे.  यातून अनेक रहस्ये बाहेर येतील, अशी आशा यासंदर्भात अभ्यास करणारे व्यक्त करीत आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.