आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा सध्या बोलबाला झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनेक जुन्या घटना नव्यानं पाहण्याची संधी मिळत आहे. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे आभार मानावे, असे काहीसे झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवघ्या हिंदूच्या ह्दयात असलेल्या प्रभू श्रीरामांच्या छायाचित्राचा अविष्कार करण्यात आला आहे. प्रभू रामांचे नाव हे रामभक्तांसाठी मोठा आधार आहे. याच प्रभू रामांचे रुप कसे असेल याची उत्सुकता त्यांच्या भक्तांना होती. ‘सावळा ग राम माझा’ असं प्रभू श्रीरामांच्या (Shriram) रुपाचं वर्णन करण्यात येतं. प्रभू श्रीराम खरेच सावळ्या रंगाचे होते का? या प्रश्नाचे उत्तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारानं मिळाले आहे. या तंत्रज्ञानानं प्रभू श्रीराम (Shriram) वयाच्या 21 व्या वर्षी कसे दिसत असतील याचे छायाचित्र तयार झाले आहे. अत्यंत सुंदर असे हे श्रीरामांचे रुप सोशल मिडियावर झळकले आहे. प्रभू श्रीरामांच्या (Shriram) या सुंदर रुपाचा व्हिडीओ समोर आल्यावर लाखो रामभक्तांनी त्याला लाईक केले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सोशल मिडीयावर आलेल्या एका व्हिडिओनं लाखो करोडोंच्या मनात आनंद निर्माण केला आहे. भगवान राम 21 व्या वर्षी कसे दिसत होते? हे सांगणारा प्रभू श्री रामांच्या (Shriram) सुंदर रुपाचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अलीकडच्या काळात अनेक चित्रे तयार झाली आहेत. ही चित्रे वेळोवेळी सोशल मीडियावर दिसतात. इतिहासात ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली अशा व्यक्ती कशा दिसत होत्या? त्याची छायाचित्रे जाहीर झाली आहेत. तसेच ती व्यक्तिमत्वे आता असती तर कशी दिसली असती? याचीही छायाचित्रे जाहीर झाली आहेत. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानानं पुढचा टप्पा गाठला आहे. यातून चक्क प्रभू श्री रामांचा (Shriram) फोटो जाहीर करण्यात आला आहे. 21 व्या वर्षी प्रभू रामांचे हे छायाचित्र पाहून त्यांचे करोडो भक्त पुन्हा प्रभू रामांच्या प्रेमात पडले आहेत.
2023 च्या सुरुवातीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान खूप चर्चेत आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोकांना कठीण प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत. तर काही त्यातून मनोरंजक चित्रे तयार करत आहेत. नुकतीच दिल्ली आणि कोलकाता येथील बर्फवृष्टीची छायाचित्रे या माध्यमातून तयार करण्यात आली होती आणि ती मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली होती. तसेच आपल्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या नेत्यांनी सेल्फी घेतला असता तर तो कसा असता, अशी छायाचित्रेही जाहीर करण्यात आली आहेत. आता भगवान श्रीरामांचे वयाच्या 21व्या वर्षीचे फोटो जाहीर झाले आणि हे फोटो सोशल मिडियामध्ये वा-याच्या वेगानं पसरले आहेत. या चित्रात प्रभू रामांचे मोहक रुप दिसत आहे. चेह-यावर मंद हास्य असणारे हे प्रभू रामांचे रुप बघून अनेकांनी पुन्हा प्रभू रामांच्या प्रेमात पडल्याची कबूलीच देऊन टाकली आहे. प्रभू रामांच्या एका भक्तानं हे छायाचित्रप ‘वाल्मिकी रामायण, रामचरितमानस यासह विविध ग्रंथांमध्ये दिलेल्या तपशीलांनुसार तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे छायाचित्र सोशल मिडीयावर जाहीर करतांना त्यांनी, आजपर्यंत भगवान श्रीराम (Shriram) यांच्यासारखा देखणा कोणताही देव या पृथ्वीतलावर जन्माला आलेला नाही, असा मेसेजही शेअर केला आहे.
=======
हे देखील वाचा : मिस्रमध्ये सैनिकांना ट्रॉफी प्रमाणे दिला जायचा दुश्मनांचा कापलेला हात
======
वास्तविक, ही प्रतिमा तयार करण्यामागील तंत्रज्ञानाला जनरेटिव्ह एआय म्हणतात. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे. यातून प्रतिमा, संगीत आणि मजकूर यांसारखी क्रिएटिव्ह सामग्री तयार केली जाऊ शकते. अगदी मानवी प्रयत्नांशिवाय संपूर्ण व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान मोठ्या डेटा सेटचे विश्लेषण आणि शिकण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करते. मग ते आपल्या ज्ञानाने नवीन सामग्री तयार करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मानव आणि इतर प्राण्यांच्या बुद्धिमत्तेच्या विरूद्ध मशीनद्वारे प्रदर्शित केलेली बुद्धिमत्ता आहे. त्यामध्ये उच्चार ओळखणे, संगणक दृष्टी, भाषांतर आदींचा समावेश होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात 1956 पासून झाली. मात्र आता 2023 पर्यंत सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दबदबा निर्माण झाला आहे. आता या माध्यमातून प्रभू रामचंद्राचे छायाचित्र पहायला मिळाल्यामुळे रामभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
सई बने..