Home » सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळे…

सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळे…

by Team Gajawaja
0 comment
Banking Crisis
Share

अमेरिकेच्या आर्थिक क्षेत्रात सध्या खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेमधील 16 वी सर्वात मोठी बॅंक म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती सिलिकॉन व्हॅली बॅंक (Banking Crisis) बंद होत आहे. सिलिकॉन व्हॅली बॅंक म्हणजे, सीव्हीबी हीचे मुख्य कार्य नवीन उद्योगव्यवसायांना निधी उपलब्ध करुन देणे हे होते. आता हिच बॅंक बुडीत म्हणून  घोषित होत आहे. सतत तोटा आणि निधीच्या अभावामुळे या बॅंकेचे शेअर्स 60% घसरले आहेत.  अमेरिकन इतिहासातील बँक बुडण्याची दुसरी मोठी घटना आहे. आता फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन बॅंक ताब्यात घेणार आहे.  (Banking Crisis)

अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बॅंक म्हणून जिचा गौरव होतो त्या सिलिकॉन व्हॅली बँकेला (Banking Crisis) नियामकांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने हा आदेश जारी केला आहे. बँकेची मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स कोसळल्यावर व्यवहार बंद करण्यात आला. 2008 च्या आर्थिक संकटानंतर अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अपयश असल्याचे मानले जाते. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात मंदीची चाहूल लागल्याचीही चर्चा आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को बे एरियाचा दक्षिणेकडील भाग सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला, येथे सिलिकॉनचे इंटिग्रेटेड सर्किट्स तयार करणार्‍या कंपन्या मोठ्या संख्येने होत्या. सिलिकॉन व्हॅलीमध्ये 6000 हून अधिक कंपन्या आहेत.  त्यात अपल, फेसबुक, गुगल, हेवलेट पॅकार्ड, इंटेल सारख्या मान्यवर कंपन्या आहेत. (Banking Crisis)  

आता याच सिलिकॉन व्हॅलीमधील मानाच्या सिलिकॉन व्हॅली बँकेला (Banking Crisis) मदत पॅकेज देण्यास अमेरिकन सरकारनंही नकार दिला आहे.  मात्र ही बातमी समजल्यावर भारतासह इतर देशांच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. एसव्हीबीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गेल्या 2 दिवसांत यूएस बँकांचे शेअर बाजारात $100 बिलियनचे नुकसान झाले आहे.  युरोपियन बँकांनाही 50 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. सिलिकॉन बँक ठराविक दिवसांनी उघडल्यावर सर्व विमाधारक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.  पण ही बातमी ठेवीदारांसाठी चिंता वाढवणारी आहे. (Banking Crisis) या बॅंकेत भारतीयांसह अनेक देशांतील नागरिकांची खाती आहेत.  बँकेत ज्या हजारो खातेदारांच्या ठेवी आहेत, यात अनेक स्टार्टअप्सचाही सहभाग आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार सिलिकॉन व्हॅली बँक बंद होण्यामागचे कारण म्हणजे तिचे सतत होणारे नुकसान आणि निधीची कमतरता आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यानंतर कॅलिफोर्नियाच्या आर्थिक संरक्षण विभागाने बँकेच्या समोरील गेटवर नोटीस लावली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक आपले पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर दिसत आहेत. (Banking Crisis)

सिलिकॉन व्हॅली बँकेकडे (Banking Crisis) 2021 मध्ये $189 अब्ज ठेवी होत्या. सिलिकॉन व्हॅली बँकेने गेल्या 2 वर्षांत आपल्या ग्राहकांच्या पैशाने अनेक अब्ज डॉलर्सचे रोखे खरेदी केले. परंतु कमी व्याजदरामुळे या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळाला नाही. त्यामुळेच बॅंक बुडीत निघाल्याचे सांगण्यात येते.  बँक बंद झाल्यामुळे अनेक भारतीय स्टार्टअपवरही परिणाम होणार आहेत.  एसव्हीबीने भारतातील सुमारे 21 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. एसव्हीबीची भारतातील सर्वात लक्षणीय गुंतवणूक SAAS-unicorn iSertis मध्ये आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, एसव्हीबीने या कंपनीमध्ये सुमारे $150 दशलक्ष गुंतवणूक केली. याशिवाय एसव्हीबीने Bluestone, Paytm, One97 Communications, Paytm Mall, Naaptol, CarWale, InMobi आणि Loyalty Rewardz सारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.  2008 च्या आर्थिक संकटानंतर अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे. त्याचवेळी बँक बुडवण्याचे हे आणखी एक मोठे प्रकरण आहे.  अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक (Banking Crisis) दिवाळखोरीच्या बातमीने जगभर खळबळ उडाली आहे. 2008 च्या मंदीच्या काळात वॉशिंग्टन म्युच्युअल आणि लेहमन ब्रदर्सच्या पतनानंतर हे सर्वात मोठे आर्थिक संकट मानले जाते. 

========

हे देखील वाचा : तुम्हाला सुद्धा Google AI मुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? ‘या’ सेक्टरला बसू शकतो फटका

========

याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही चिंता व्यक्त केली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (Banking Crisis) दिवाळखोरीमुळे जगभरातील तंत्रज्ञान उद्योगावर परिणाम होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.  ही बातमी म्हणजे, जागतिक बाजारात जागतिक मंदीचे संकेत मानले जात आहेत.  जगभरातील बँकिंग क्षेत्रातील समभागांना याचा फटका बसणार आहे. अमेरिका आणि युरोपातील बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात घसण झाल्यावर आता जगभरात त्याचे काय परिणाम होतील, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.