ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला नमवत पहिल्यांदाच जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे जेतेपद पटकावले. कसोटीचे विश्वविजेते ही मोहर त्यांनी आपल्या नावापुढे लावली. कसोटी अजिंक्यपदानंतर आता त्यांची नजर प्रतिष्ठेच्या अॅशेज मालिकेवर असेल. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या मालिकेत विजय नोंदवून आपली बावीस वर्षांची प्रतीक्षा संपवण्यास ऑस्ट्रेलिया उत्सुक असेल. इंग्लंडच्या भूमीवर जाऊन इंग्लंडला हरवणे ऑस्ट्रेलियाला मागच्या बावीस वर्षांत जमले नाही. इंग्लंडला हरवत विक्रमी कामगिरी करण्यास ऑस्ट्रेलिया उत्सुक असेल. (Ashes 2023)
मागच्या अशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्या घरी इंग्लंडला ४-० ने नमवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड उत्सुक असेल. १६ जूनपासून बर्मिंगहॅम येथे या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. अशेज मालिकेच्या इतिहासाकडे नजर टाकायची झाल्यास आतापर्यंत झालेल्या ७२ मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने ३४ तर इंग्लंडने ३२ मालिका जिंकल्या आहेत. बाकी मालिका दोन्ही देशांच्या पदरात पडत बरोबरीत सुटल्या आहेत.(Ashes 2023)
दोन्ही देशांच्या मायदेशातील आणि प्रतिस्पर्धी देशातील भूमीवरील कामगिरीबाबतचा लेखाजोखा बघायचा झाल्यास ऑस्ट्रेलियाने मायदेशात एकूण ९९ सामन्यांत तर इंग्लंडमध्ये ५५ कसोटी सामन्यांत विजय मिळवला आहे. दुसरी बाजू बघायची झाली तर इंग्लंडने मायदेशात ५३ तर ऑस्ट्रेलियामध्ये ५७ कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये याआधी रंगलेली अखेरची अशेज मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकलेला ऑस्ट्रेलियाचा संघ जबरदस्त फार्मात दिसत आहे. तसेच आपल्या घरच्या मैदानावर अगदी आक्रमकपणे खेळत इंग्लंड मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. जगभरातील प्रतिष्ठेच्या द्विपक्षीय मालिकांत अशेजचे स्थान फार प्रतिष्ठेचे आहे. जगभरातील क्रिकेट वर्तुळाचे लक्ष या मालिकेकडे लागून असते. कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच असेल. (Ashes 2023)
=======
हे देखील वाचा : जेव्हा ‘या’ महान खेळाडूने Olympic गोल्ड मेडल नदीत फेकले होते
======
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळलेलाच जवळपास ऑस्ट्रेलियन संघ या अशेजसाठी उतरेल. Pat कमिन्स संघाचे नेतृत्व करेल. मार्कस haris, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमरन ग्रीन, मिशेल मार्श, अलेक्स कॅरी, जोस इंग्लिस, स्कॉट बोलंड, जोश हजेलवूड, नाथन लायन, tod मर्फी, मिशेल स्टार्क या खेळाडूंचा ऑस्ट्रेलियन संघात सामावेश करण्यात आला आहे.(Ashes 2023)
बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करेल. जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टूअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डूकेट, डॅन लॉरेन्स, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड या खेळाडूंचा इंग्लंडच्या संघात समावेश आहे.