वायुदल, नौदल आणि भूदल या तिन्ही दलांमध्ये सैनिक वेगवेगळ्या प्रकाराने सॅल्युट करून मानवंदना देत असतात. या तिन्ही दलांच्या सॅल्यूट करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत.
वायुदल, नौदल आणि भूदल हे देशाच्या सुरक्षेबाबत कायम सतर्क असून आपल्या शौर्याने देशाचा अभिमान उंचावत असतात. सागरी सीमा सुरक्षित ठेवणारे नौदल, उंच आकाशातून शत्रूवर करडी नजर ठेवणारे वायुदल आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आत घुसणाऱ्या अतिरेक्यांचा खत्मा करणारे भूदल, हे भारतीय देशाचे वीर शिलेदार आहेत. या सर्वांबद्दल तमाम भारतीयांच्या मनात प्रचंड आदर तर आहेच, परंतु, यांच्या कामाबद्दल तुलनेने माहिती कमी असल्यामुळे कुतूहल देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय सैन्यदलाच्या सॅल्युट करण्याच्या विविध पद्धती आणि त्याची कारणे.
भारतीय सैन्यदलाच्या सॅल्युट करण्याच्या पद्धती
भूदल –
भूदल म्हणजे भारतीय लष्कर. हे जमिनीवरील देशाच्या सीमा सुरक्षा भागात कायम सतर्क असतात. भूदलाची पद्धत सर्वांनाच माहिती आहे. या दलात सॅल्युट करताना सैनिकांचा तळहात स्पष्टपणे दिसत असतो. हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली असतात आणि हाताच्या मधल्या बोटाने टोपी किंवा भुवयांना स्पर्श केला जातो. याचा अर्थ असा की समोर असलेला झेंडा किंवा वरिष्ठ यांना मी निःशस्त्र होऊन नम्रपणे मानवंदना देत आहे.
नौदल –
सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सागरी सुरक्षा दलात सॅल्युट विषयीचे नियम थोडे वेगळे आहेत. सागरी सीमा सुरक्षा रक्षक सॅल्युट करत असताना त्यांचा तळहात जमिनीच्या दिशेला ९०° काटकोनात असतो. याचे कारण असे की शिपवर असताना अनेक कामांमुळे आपले हात खराब होतात आणि अशा हातांनी वरिष्ठांना किंवा झेंड्याला मानवंदना देणे अपमानास्पद समजले जाते. म्हणून आपला तळहात न दाखवता सॅल्युट दिला जातो.
हे ही वाचा: अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…
Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही
Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!
वायुदल –
हवाईमार्गाने लढाऊ विमानामार्फत देशाची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणाऱ्या वायुदलाच्या सॅल्युटमध्येही इतर दोन दलांप्रमाणे बदल आहेत. वायुदलात सॅल्युट देताना हात ४५° कोनात असतो. कारण सॅल्युटची स्थिती हे विमानाचे प्रतीक समजले जाते. म्हणुनच वरिष्ठांविषयी आणि झेंड्याविषयी माझ्या मनात विमानाच्या झेपेप्रमाणेच उच्च आणि पराकोटीचा आदर आहे, असे समजण्यात येते.