Home » ताजमहाल प्रकरणाबाबत अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यानां फटकारले

ताजमहाल प्रकरणाबाबत अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यानां फटकारले

by Team Gajawaja
0 comment
Taj Mahal
Share

ताजमहालच्या (Taj Mahal) 22 खोल्या उघडण्यासंदर्भातील याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली. न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली असल्याने यावेळी न्यायमूर्ती डीके उपाध्याय यांनी याचिकाकर्त्याला फटकारले.

जनहित याचिकांच्या व्यवस्थेचा गैरवापर होता कामा नये, असे ते म्हणाले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे म्हणत हायकोर्टाने फटकारले.

याचिकार्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, देशातील नागरिकांना ताज महालबाबत सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही माहितीच्या अधिकारातंर्गत  माहिती मागितली. मात्र, ती माहिती देण्यात आली नाही.

ताज महालमध्ये एखादी वस्तू लपवण्यात आली असेल तर त्याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. ताज महालची जमीन कोणाची आहे, हा आमचा मुद्दा नसून या बंद खोलीत काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटले. 

आगरा: ताजमहल के 22 कमरों का क्या है राज? जानिए विवाद की पूरी कहानी - Agra  Taj Mahal Controversy Know All Detail What is in 22 Rooms Hindu Temple  Tejomahalay lclv - AajTak

====

हे देखील वाचा: भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

====

हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकरात म्हणाले की, ताजमहाल शहाजहानने बांधला नाही असे तुम्हाला वाटते? आम्ही इथे निकाल देण्यासाठी आलो आहोत का? जसे की तो कोणी बांधला किंवा ताजमहालचे वय किती आहे?

तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींचे संशोधन करा. एमए करा, पीएचडी करा, कोणतीही संस्था तुम्हाला संशोधन करण्यापासून रोखत असेल तर आमच्याकडे या. उच्च न्यायालयाने म्हटले की, ताजमहालच्या 22 खोल्यांची माहिती तुम्ही कोणाकडून मागितली?

यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही प्राधिकरणाकडून माहिती मागवली होती. तेव्हा हायकोर्टाने सांगितले की जर त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खोल्या बंद असल्याचे सांगितले असेल तर ती माहिती आहे. तुम्ही समाधानी नसाल तर आव्हान द्या.

न्यायालयात याचिकाकर्त्याने त्या खोल्यांमध्ये जाण्याची परवानगी मागितली. त्यावर हायकोर्टाने तिखट टिप्पणी करत उद्या तुम्ही येऊन म्हणाल की आम्हाला माननीय न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जावे लागेल. जनहित याचिकेची खिल्ली उडवू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Orders that set the bar: How Allahabad HC stood for civil rights | Latest  News India - Hindustan Times

====

हे देखील वाचा: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित

=====

ताजमहालाचा इतिहास

जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक समजला जातो. पांढऱ्या शुभ्र संगमरवरानं बांधलेली यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेली ही वास्तू पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताज महालाचं सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात.

ताज महालाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मुघल बादशाह शाहजहान यांचं आपली पत्नी मुमताजवर प्रेम होतं. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताज महाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल 21 वर्षांचा अवधी लागला होता. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.