Home » Sudan : म्हणून होतेय, दुबईवर बहिष्कार घालण्याची मागणी !

Sudan : म्हणून होतेय, दुबईवर बहिष्कार घालण्याची मागणी !

by Team Gajawaja
0 comment
Sudan | Top Marathi Headlines
Share

सुदान हा आफ्रिकन देश गेल्या दोन वर्षांपासून विनाशकारी गृहयुद्धाच्या विळख्यात सापडला आहे. सरकारी दल आणि बंडखोर संघटना रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यातील संघर्ष टिपेला पोहचला आहे. काही दिवसांपूर्वीच बंडखोर संघटना रॅपिड सपोर्ट फोर्सेसनं सरकारी दलांचा शेवटचा बालेकिल्ला असलेले अल-फॅशर ताब्यात घेतले. त्यानंतर तेथील जनतेची सामुहिक हत्या करण्यात आली. या बंडखोर सैनिकांनी महिला, मुले आणि वृद्धांना गोळ्या मारुन ठार केले. हे हत्याकांड एवढे भयानक होते की, सॅटेलाईटच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रातही हा भाग लाल रंगाचा दिसत होता. यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. या बंडखोर संघटनेला सर्वार्थाने मदत युएई करत आहे. त्यामुळे आता सोशल मिडियावर युएईवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुदानमध्ये जे विनाशकारी युद्ध सुरु आहे त्याला, आणि बंडखोर निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसला युएईचा पाठिंबा आहे. दुबईमधील सोन्यापैकी मोठा वाटा या सुदानमधून येतो. हेच सोने स्वस्तदरात मिळवण्यासाठी दुबईचे शासक सुदानमधील बंडखोरांना मदत करत असून त्यांच्यामार्फेत दुबईत स्वस्त सोनं येत असल्याचा आरोप आहे. (Sudan)

=

#BoycottUAE आणि #BoycottForSudan सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. दुबई आणि युएई ही पर्यटनासाठी आणि खरेदीसाठी महत्त्वाची शहरे मानण्यात येतात. जगभरातील पर्यटक दुबईमध्ये असतात. मात्र आता याच दुबई आणि युएई मधील पर्यटनावर बहिष्कार घालून या शहरांचा आर्थिक कणा मोडावा अशी मोहीम सोशल मिडियावर सुरु आहे. आकर्षक आखाती शहर दुबई हे संयुक्त अरब अमिराती मधील सर्वात मोठे शहर आहे. पण या दुबईमधून मोठ्या प्रमाणात पैसा सुदानमधील रॅपिड सपोर्ट फोर्सेसला पाठवण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे दुबई आणि युएईवर बहिष्कार घालण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे. त्याला कारण सुदानमधील नागरिकांचे होणारे हत्याकांड ठरले आहे. एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये सुदानीज आर्मी आणि आरएसएफ यांच्यातील संघर्ष सुरू आहे. (Latest International News)

काही दिवसांपूर्वीच आरएसएफने सरकारी दलांचा शेवटचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर दारफुरची राजधानी, अल-फॅशर ताब्यात घेतले. त्यानंतर आरएसएफ सैनिकांनी केलेल्या कृत्यामुळे अवघ्या जगाला जबर धक्का बसला. आरएसएफच्या सैनिकांनी अल फॅशरमधील एकही घरातील एकाही व्यक्तिला जीवंत सोडले नाही. अगदी वृद्ध, महिला, लहान मुले, या सर्वांवर गोळ्या मारण्यात आल्या. जेव्हा सॅटेलाइट छायाचित्रामध्ये रक्ताने माखलेले रस्ते आणि जळणारी घरे दिसली तेव्हा जगभरातील मानवतावादी संघटना खडबडून जाग्या झाल्या. त्यानंतर सुदानमधील परिस्थितीवर आवाज उठवायला सुरुवात झाली आहे. काही संघटनांच्या मते, आत्तापर्यंत फक्त गाजामध्ये असलेल्या संकटाची जाणीव जगाला करुन देण्यात येत आहे. मात्र यात सुदानमधील परिस्थितीचा आढावा घेण्याचा कधी प्रयत्नही झाला नाही, हे दुःखदायक आहे. सुदानमध्ये माणसाची अवस्था अत्यंत कठीण असून महिला आणि लहान मुलांचे जीवन नरकाहून वाईट झाले आहे. (Sudan)

सुदानमधील या आरएसएफला शस्त्रे आणि आर्थिक मदत युएईतर्फे होत आहे. सुदानमधील सोन्याच्या खाणींवर सत्ता मिळवण्यासाठी युएई या बंडखोर सैनिकांना आपल्या ताब्यात ठेवत असल्याचा आरोप आहे. सध्या सुदानच्या अनेक सोन्याच्या खाणी बंडखोर गटांच्या नियंत्रणाखाली आहेत या खाणींमधून काढलेले सोने युएईद्वारे जागतिक बाजारपेठेत पोहोचते. ही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी युएई या बंडखोरांना शस्त्र आणि मोठी आर्थिक पोहचवत असल्याची माहिती आहे. युएई अप्रत्यक्षपणे सुदानमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत आता सोशल मिडियावर युएई आणि दुबईविरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. (Latest International News)

================

हे देखील वाचा : Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

================

प्रसिद्ध रॅपर मॅकलमोरने याबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्याचा दुबई येथे होणारा संगीत कार्यक्रम रद्द केला आहे. त्यानं सोशल मिडियावर पोस्ट शेअऱ करत आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, लाखो लोक उपाशी आहेत, २.५ दशलक्ष लोक उपासमार आणि आजाराने मरु शकतात, आणि हे ज्यांच्या पैशानं होत आहे, त्यांच्याकडून पैसे घेऊन गाणे म्हणणे हे माझ्या नैतिकतेमध्ये बसत नाही, अशा शब्दात मॅकलमोरनं मेसेज शेअर केल्यावर जगभर खळबळ उडाली आणि सुदानमधील संकटाकडे लक्ष वेधले गेले आहे. आरएसएफचे बंडखोर सैनिक महिलांवर लैंगिक हिंसाचार करीत असून अनेक महिलांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अर्थात बायकॉट दुबई आणि युएई ही मोहीम सुरु झाल्यावर युएई सरकारने सुदान संघर्षात सहभागी असल्याच्या आरोपांचे वर्णन “निराधार आणि निराधार” अशा शब्दात केले आहे. (Sudan)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.