Home » Roti Movement : इंग्रजांना हादरवणार रहस्यमयी रोटी आंदोलन काय होतं?

Roti Movement : इंग्रजांना हादरवणार रहस्यमयी रोटी आंदोलन काय होतं?

by Team Gajawaja
0 comment
Roti Movement | Top Stories
Share

1857 ची ती गोष्ट आहे, जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता हादरली होती. पण त्याआधी एक अजब गोष्ट सगळ्या उत्तर भारतात घडत होती. गावागावात रोटया फिरत होत्या! हो, रोटया ! रात्रीच्या अंधारात कोणीतरी यायचं, गावच्या चौकात किंवा कोणाच्या दारात रोटी ठेवायचं आणि गायब व्हायचं. या रोटींसोबत कधी कमळाचं फूल, कधी मटण आणि एक संदेश असायचा– “रोटी मिळाली, तर पाच रोट्या पुढे पाठवा!” ही रोटी चळवळ इतकी वेगानं पसरली, की इंग्रजांचं टेन्शन वाढलं. ही रोटी का वाटली जाते? कोण वाटतंय? हे इंग्रजांना कळतं नव्हतं काय होतं हे रोटी आंदोलन? हे जाणून घेऊ. (Roti Movement)

1857 चा तो काळ होता, जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता सगळीकडे पसरलेली होती. पण त्याचवेळी भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता. मंगल पांडेने बंड पुकारलं आणि मेरठमधून क्रांतीची सुरुवात झाली. पण या क्रांतीआधी एक विचित्र गोष्ट सगळ्या उत्तर भारतात घडत होती – रोटी चळवळ! इंदौर, ग्वाल्हेर, रोहिलखंड, अवध, इलाहाबाद, सगळीकडे रोट्या फिरवल्या जात होत्या. एक गावातून दुसऱ्या गावात, रात्रीच्या अंधारात रोट्या पोहोचायच्या. कोणीतरी यायचं, गावच्या प्रधानाला किंवा चौकीदाराला रोट्या द्यायचं आणि सांगायचं, “या पुढे पाठवा!”

या रोट्यांचा वेग इतका जबरदस्त होता, की एका रात्रीत 120 ते 160 मैल अंतर पार करत त्या दुसऱ्या गावत पोहचायच्या. आता जरा विचार करा, त्या काळात ना मोबाईल, ना टेलिग्राम, ना इंटरनेट, तरीही रोट्या इतक्या वेगानं कशा फिरत होत्या? इंग्रजांची मेल सर्व्हिसही इतकी फास्ट नव्हती! या रोट्या वाटणाऱ्यांमध्ये मध्ये फक्त गावकरी नव्हते, तर चौकीदार, वॉचमन, गावचे प्रधान, अगदी काही व्यापारी सुद्धा सामील होते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे, रोट्या वाटणाऱ्या अनेकांना खुद्द माहिती नव्हतं, की या रोट्या का वाटल्या जाता आहेत! (Roti Movement)

 Roti Movement

मथुरेचे मजिस्ट्रेट मार्क थॉर्नहिल यांना एकदा रोट्यांचा बंडल त्यांच्या टेबलावर मिळाला. त्यांना या रोटयांचं कोडं पडलं, त्यांनी चौकशी सुरू केली. रोट्या खरंच वाटल्या जातायेत, हे तर त्यांना कन्फर्म झालं, पण यामागचं कारण काय, हे त्यांना काही कळलं नाही. इंग्रजांना वाटलं, कदाचित ही काही धार्मिक प्रथा असेल किंवा एखादी सिक्रेट सोसायटी यामागे असेल. पण सत्य काय, हे त्यांना शोधूनही कळलं नाही. (Top Stories)

जॉन विलियम शेरर नावाच्या एका ब्रिटिश ऑफिसरनं आपल्या ‘डेली लाइफ ड्यूरिंग द इंडियन म्युटिनी’ या पुस्तकात लिहिलंय, की काही इंग्रजांना वाटायचं, हा सगळा प्रकार फक्त त्यांना चिडवण्यासाठी आहे. क्रांती पेटल्यानंतर तर त्यांना पक्कं वाटायला लागलं, की ही रोटी चळवळ इंग्रजांना चॅलेंज करायला आहे. थोडक्यात, त्या काळची ट्रोलिंगच म्हणूया ना! पण ट्रोलिंग असो वा नसो, या रोट्यांनी इंग्रजांना पुरतं हैराण केलं होतं. (Roti Movement)

आता या रोटी चळवळीचं क्रांतीशी काय कनेक्शन होतं का? तर देशभरात गावागावात क्रांतिकारी आपलं काम करत होते त्या क्रांतिकार्यांना गावागावात रसद पुरवायचं या रोटया काम करत होत्या. क्रांतिकारी लांबच्या प्रवासात गावात थांबायचे, तिथं त्यांना रोटी आणि गूळ मिळायचं. कदाचित रोटी चळवळीचा हा खरा उद्देश होता – लोकांना एकत्र आणणं आणि क्रांतीसाठी तयार करणं.

पण यात एक ट्विस्ट आहे. काही गावकऱ्यांना वाटायचं, की या रोट्या इंग्रजंचं वाटतायत! का? कारण त्याकाळी बंदुकीच्या कारतूसात गाय आणि डुकराची चरबी आहे, अशी अफवा पसरली होती. मग रोट्यांबाबतही असंच काहीसं बोललं जाऊ लागलं, की इंग्रजांना रोटीच्या पिठात गाय आणि डुक्करांच्या हाडांची पाऊडर मिसळलंय. आणि म्हणूनच रोट्या वाटल्या जातायत. खरं-खोटं काहीही असो, पण तेव्हा या रोट्यांनी सगळ्यांचं डोकं फिरवलं होतं. (Top Stories)

===============

हे देखील वाचा : China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !

===============

आणखी एक गोष्ट – 1857 मध्ये प्लासीच्या लढाईला 100 वर्षं पूर्ण झाली होती. त्या काळात एक भविष्यवाणी खूप पसरली होती, की 100 वर्षांनंतर इंग्रजांचा अंत होईल. काहींचं म्हणणं होतं की, रोटी चळवळ याच भविष्यवाणीशी जोडलेली होती. आणि हो, असंही नाही, की भारतात असं काही वाटण्याची प्रथा पहिल्यांदा घडली. आदिवासी समाजात विशेष प्रसंगी पानं, नारळ, मातीची भांडी वाटण्याची प्रथा आधीपासून होती. 1857 मध्ये फक्त याच प्रथेचा वापर लोकांना एकजूट करण्यासाठी झाला. (Roti Movement)

पण इंग्रजांना हे सगळं काही कळलं नाही. त्यांना वाटायचं, क्रांतीसाठी कागद, किंवा वृत्तपत्रं बंदूक वापरली जाऊ शकते, पण रोटी? रोटी कशी काय आंदोलनाचा हिस्सा होऊ शकते? इंग्रजांनी तेव्हा कागद, वृत्तपत्रं यावर बंदी घातली, पण रोटीवर बंदी कशी घालणार? आणि म्हणूनच रोटी पसरत गेली, आणि इंग्रजांच्या विरोधातल्या पहिल्या मोठ्या बंडाचं हत्यार बनली. (Top Stories)

इंग्रजांच्या काळातल्या अनेक आंदोलनाच्या कथा आपण ऐकल्यात पण रोटी चळवळ हे एक वेगळंच आंदोलन होतं. पण ही रोटी चळवळ सत्य आणि कल्पनेचं एक मिश्रण आहे. काही म्हणतात, ती क्रांतीचा आधार होती, तर काही म्हणतात, ती फक्त अफवा होती. पण एक गोष्ट पक्की – या रोट्यांनी इंग्रजांना चांगलाच घाम फोडला होता.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.