मध्यप्रदेशची राजधानी इंदौरमध्ये 17 वे प्रवासी भारतीय संमेलन (Indian Conference) सुरु झाले आहे. तीन दिवस असणा-या या प्रवासी भारतीय संमेलनात 70 देशांतील 3200 अनिवासी भारतीय सहभागी होत आहेत. या संमेलनात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली हे प्रमुख पाहुणे तर सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ऑस्ट्रेलियन हाऊस ऑफ संसदेचे सदस्य जेनेटा मॅस्क्राहेन्स या सुद्धा या संमेलनात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. या संमेलनाची (Indian Conference) सुरुवात ‘रोल ऑफ डायस्पोरा युथ इन इनोव्हेशन अँड न्यू टेक्नॉलॉजी’ या विषयावर झालेल्या परिसंवादानं झाली. यात परदेशातून आलेल्या तरुणांनी स्वतःबद्दल माहिती दिली. यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, गेल्या आठ वर्षांत भारतातील तरुण हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश बनला आहे. भारतात 80 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. जग कोरोनाशी लढत असताना, भारतातील तरुण आपल्या स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा मिळवून देण्यासाठी काम करत होते. त्यावेळी भारतातील 50 स्टार्टअप्सना युनिकॉर्नचा दर्जा मिळाला, अशी माहिती दिली.

या एनआरआय संमेलनासाठी (Indian Conference) देशातील सर्वात स्वच्छ सुंदर शहर असा बहुमान मिळालेल्या इंदौर या शहराचं अवघं रुप बदललं आहे. शहरातील प्रमुख चौकात अनिवासी भारतीयांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे. प्रवासी भारतीय दिवस संमेलन आयोजित करण्याचा मुख्य उद्देश परदेशी भारतीय समुदायाच्या कामगिरीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना जगासमोर आणणे हा आहे. स्वच्छतेच्या बाबतीत इंदौर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सलग सहा वर्षे स्वच्छ शहराचा पुरस्कार इंदौरला मिळाला आहे. तसेच हे भारतातील पहिले 7 स्टार कचरामुक्त शहर आहे. या सर्वाचे ब्रँडिंग प्रवासी भारतीय संमेलनांतर्गत केले जात आहे. स्वच्छतेबाबत मोठमोठे पोस्टर-बॅनर लावण्यात आले आहेत. एनआरआय संमेलनाच्या दृष्टीने इंदौरी जेवणाचीही माहिती दिली जात आहे. पोहे-जलेबी, सराफा की चाट, दही बडा, छोले टिकिया, आलू-खोबरा पॅटीस, साबुदाणा खिचडी, माळवा फूड, डाळ-बाटी, डाळ-पाणिया, चुरमा आदी खाद्यपदार्थ देखील ब्रँडेड केले गेले आहेत.
इंदौर व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील धार्मिक क्षेत्रांनाही या संमेलनात आलेले पाहुणे भेट देणार आहेत. त्यामध्ये उज्जैनचा क्रमांक पहिला आहे. उज्जैन व्यतिरिक्त ओंकारेश्वर आणि धारचे मांडू देखील ब्रँडेड केले जात आहे. त्याचबरोबर खजुराही शिल्प, ग्वाल्हेर किल्ला, ओरछा किल्ला या स्थानांचेही ब्रँडिंग करण्यात आले आहे. शहरात तीनशेहून अधिक छोट्या-मोठ्या आयटी कंपन्या आहेत. यामध्ये 50 हून अधिक कंपन्या आहेत, ज्यांची सुरुवात इंदौरपासून झाली आणि आता त्यांचे कार्य आणि कार्यालये जगभरात आहेत. यामध्ये 50 हजाराहून अधिक तरुणांना रोजगार मिळत आहे. या संमेलनानिमित्तानं (Indian Conference) शहरातील तीनही प्रमुख आयटी पार्कमध्ये गर्दी झाली आहे. जगातील नामवंत कंपन्याही आता इंदौरमध्ये आल्या आहेत. इंदौरमध्ये सुमारे 700 स्टार्ट-अप आहेत. त्यांची जाहिरातही एनआरआय अधिवेशनांतर्गत केली जात आहे.
प्रवासी भारतीय संमेलनासाठी (Indian Conference) असलेल्या ब्रिलिअंट या स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य असे स्वागत गेट उभारण्यात आले आहे. तिथे सौर झाडे लावली गेली आहेत. ही सौर झाडे खास बेंगळुरूहून आणली गेली आहेत. लोक बसू शकतील अशा 4 भव्य तंबू आहेत. या तंबूमध्ये राहणारा प्रकाश फक्त सौरच असेल. हे देखील बेंगळुरूहून आणले आहे. याबरोबर विमानतळाबाहेरील दीड किलोमीटरचा रस्ता, पदपथ, पथदिवे यासह आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शहरात वेगवेगळ्या थीमवर आधारित प्रकाशयोजनेचे काम केले आहे. प्रवासी भारतीय संमेलनात जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी खास ज्यूटच्या पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यूटच्या पिशवीत नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जाणार आहेत. त्यात केळीचा कागदही असेल. पाहुण्यांना ज्या पिशव्या दिल्या जातील त्यात देवास येथील बांबूपासून बनवलेला बॉक्स असेल. या बॉक्समध्ये 3 मीटर लांबीचे ज्यूट-सिल्कपासून बनवलेले खास कापड ठेवण्यात येणार आहे. शिवाय या रेशमी कापडावर हाताने भरतकाम केलेली गोंड कला असणार आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या संस्कृतीसोबतच त्याच्या वैशिष्ट्याची झलकही पाहायला मिळणार आहे. यामध्ये धार जिल्ह्यातील बॅग प्रिंटचे कामही करण्यात आले आहे. बाग प्रिंट कशी केली जाते याचे प्रात्यक्षिकही कार्यक्रमस्थळी दाखवले जाणार आहे. बांबूच्या गिफ्ट बॉक्सची लांबी 9 इंच आणि रुंदी 5 इंच आहे. त्याची उंची 2 इंच आहे. संपूर्ण देशात प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया इंजिनीअर बांबू बॉक्स प्रथमच तयार केल्याचे सांगण्यात आले आहे.
संमेलनाचे (Indian Conference) निमित्त साधत इंदौर शहर भरातीलचौक आणि दुभाजक हिरवे ठेवण्यासाठी पुण्याहून खास तयार गवत मागवण्यात आले आहे. त्यावर एक ते दीड फूट आकाराचे डिव्हायडर बसवण्यात आले आहेत. या समेलनाअंतर्गत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज एमपी (AIMP) च्या वतीने हॉटेल लॉ ओम्नी गार्डन येथे 10 जानेवारी पर्यंत ‘काईट कार्निव्हल’चे आयोजन केले आहे. या सर्वात भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या तिळाचे लाडू, गजक, फोड, खिचडी असे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मेहता यांनी सांगितले की, इंदूरच्या सुंदर डिझाईन केलेल्या पतंगांव्यतिरिक्त पाहुण्यांसाठी गुजरातचे मोठे पतंग असतील, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले खास मोठे पतंग आहेत.
=========
हे देखील वाचा : आत्मचरित्राच्या प्रसिद्धीच्या आधीच ब्रिटीश राजघराण्यात आग
=========
भारतीय नागरिक जे नोकरी किंवा शिक्षणासाठी 6 महिन्यांसाठी तात्पुरते दुसऱ्या देशात गेले आहेत. यातील काही भारतीय नागरिक परदेशात स्थायिक होऊन त्या देशाचे नागरिकत्व मिळवतात, अशांना एनआरआय म्हणतात. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसाठी 2002 मध्ये प्रथम PIO कार्ड लाँच करण्यात आले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या तिसऱ्या पिढीशी जोडणे हा त्याचा उद्देश होता. OCI कार्ड 2005 मध्ये लागू करण्यात आले. यामध्ये पीआयओ कार्डपेक्षा अधिक फायदे देण्यात आले. हे कार्ड आयुष्यभर वैध होते. 2015 मध्ये, भारत सरकारने PIO कार्ड योजना मागे घेतली आणि ती OCI मध्ये विलीन केली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अहवालानुसार, जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये 3.2 कोटी भारतीय आहेत. गेल्या 28 वर्षांत देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 346% वाढ झाली आहे. 1990 मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या 9 दशलक्ष होती. ब्रिटन, पोर्तुगाल आणि आयर्लंड या जगातील तीन देशांमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये, लिओ वराडकर आयर्लंडमध्ये आणि अँटोनियो कोस्टा पोर्तुगालमध्ये पंतप्रधान आहेत. यासोबतच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस याही भारतीय वंशाच्या आहेत. गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली आणि सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे देखील भारतीय वंशाचे आहेत. त्याच वेळी, सुमारे 30 देशांतील 285 हून अधिक खासदार भारतीय वंशाचे आहेत. इंदौरमध्ये होणा-या एनआरआय संमेलनानिमित्त भारताबाहेर रहाणा-या नागरिकांच्या कतृत्वाची माहिती पुन्हा एकदा देशवासियांना मिळणार आहे.