Home » साउथ अभिनेता थलापति विजय राजकरणात करणार एण्ट्री?

साउथ अभिनेता थलापति विजय राजकरणात करणार एण्ट्री?

'लिओ' सिनेमातून जगभरात प्रसिद्धी मिळवणारा साउथ सुपरस्टार थलापति विजय बद्दल एक अपडेट समोर आली आहे. अभिनेता लवकरच आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतो.

by Team Gajawaja
0 comment
Thalapathy Vijay
Share

Thalapathy Vijay : साउथ सिनेमा ते राजकरणात थलापति विजय लवकरच एण्ट्री करणार आहे. थलापति विजयने आपला स्वत:चा पक्ष स्थापन करण्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. एका महिन्याच्या आतमध्ये थलापति विजयच्या पक्षाचे रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मेगा स्टार विजय तमिळनाडू आणि केरळातील काही जन कल्याण कार्यक्रमांमध्ये नेहमीच सक्रियतेने सहभागी होतो. त्याने वर्ष 2018 मध्ये थूथुकुडी पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराची भेट घेतली होती. तेव्हापासून विजय मक्कल अय्यकम राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होता आणि स्थानिक निवडणूकही त्याने लढवली आहे.

Actor Thalapathy Vijay all set for his political debut ahead of Lok Sabha  polls - India Today

लवकरच पक्षाची स्थापना होणार-सूत्र
थलापति विजयने गेल्या महिन्यात पुरग्रस्त दक्षिण जिल्ह्यात दौरा केला होता. याशिवाय पुरग्रस्तांना थलापति विजयने मदतही केली होती. तमिळनाडूमधील विरोधी पक्षातील नेत्यांना अपेक्षा होती की, मेगा स्टार वर्ष 2026 मध्ये राजकरणात एण्ट्री घेऊ शकतो. पण त्याच्या समर्थकांकडून पक्षाच्या रजिस्ट्रेशनची वाट पाहिली जात आहे. (Thalapathy Vijay)

अभिनेता विजयच्या फॅन क्लबच्या सदस्यांकडून नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सूत्रांनी पुष्टी करत म्हटले की, विजयच्या पक्षातील अध्यक्षस्थानी असल्याचेही सांगितले जात आहे. येणाऱ्या एक महिन्यात थलापति विजयच्या पक्षाचे रजिस्ट्रेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा :
अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय
नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्यावर लावला मोठा आरोप, म्हणाल्या….
आमिर खान आणि रीना दत्ता यांची अशी सुरू झाली होती लव्ह स्टोरी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.