Home » Jaish-e-Mohammed : पाकिस्तानमध्ये २०० हून अधिक महिला दहशतवादी !

Jaish-e-Mohammed : पाकिस्तानमध्ये २०० हून अधिक महिला दहशतवादी !

by Team Gajawaja
0 comment
Jaish-e-Mohammed
Share

कोविडच्या महामारीनंतर जगभर ऑनलाइन संस्कृती वाढली. कोविडच्या काळात दोन वर्ष जगभर शाळा ऑनलाइन झाल्या. त्यानंतर ही ऑनलाइन संस्कृती ख-या अर्थानं विकसित झाली. अनेक ऑनलाइन कौशल्य विकास वर्ग जागतिक स्तरावर उपलब्ध झाले. अगदी गाण्यापासून ते जेवणापर्यंत आणि नृत्यापासून ते गणितापर्यंत अनेक विषय ऑनलाइन आले. पण आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये जो ऑनलाइन अभ्यासक्रम आला आहे, त्यामुळे सर्वांच्याच डोक्यावर आढ्या आल्यात, कारण पाकिस्तानात पुढच्या महिन्यात चक्क एक ऑनलाइन जिहाद अभ्यासक्रम सुरु होत आहे. या अभ्यासक्रमात महिलांना बॉम्ब तयार  करण्यापासून त्यांचा स्फोट करण्यापर्यंत शिकवले जाणार आहे. फक्त एवढेच नाही तर, बॉम्बस्फोटात अधिकाधिक निष्पाप लोकांना कसे मारायचे, याचेही प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार आहे. अर्थात हा अभ्यासक्रम पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी फक्त १५६ रुपये शुल्क आहे. रोज ४० मिनिटांचा हा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. (Jaish-e-Mohammed)

या अभ्यासक्रमासाठी मुख्यतः दहशतवाद्यांच्या विधवांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. २०१६ मध्ये पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याच्या बहिणीकडे या ऑनलाइन दहशतवादी प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने आता महिलांचीही भरती सुरु केली आहे. फक्त भरतीच नाही, तर महिलांना आता दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महिलांची भरती करण्यात येणार आहे. या दहशतवादी होण्याच्या अभ्यासक्रमासाठी आता निधीही उभारण्यात येत आहे. ‘तुफत अल-मोमिनत’ नावाच्या या कोर्समधील प्रशिक्षक म्हणून दुसरे तिसरे कोणी नसून मसूद अझहरच्या बहिणी आणि उमर फारूखची पत्नी असणार आहे. “तुफत अल-मोमिनत” या जिहादी अभ्यासातंर्गत दररोज ४० मिनिटांचा वर्ग असणार आहे. (International News)

यात महिलांना दहशतवादी धर्माचे कसे रक्षण करतात, याची माहिती देण्यात येणार आहे. मसूद अझहरने या महिला ब्रिगेडची जबाबदारी त्याची बहीण सादिया अझहरला का दिली आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. मसूद अझहरच्या बहिणीचा नवराही दहशतवादी होता. युसूफ अझहर याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार केले. त्याची पत्नी साफिया आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर फारूकची पत्नी आफ्रिरा फारूक या मसूद अझहरच्या बहिणी आता महिला ब्रिगेडची जबाबदारी सांभाळणार आहेत. सादिया ही मसूद अझहरची धाकटी बहिण आहे. भारतीय सैन्याविरोधात सादिया ही मसूदपेक्षा अधिक कडवट विचारांची असल्याचे सांगण्यात येते. तिच्या पतीला मारल्यामुळे सादिया भारतीयांचा अधिक करु लागली आहे. आता भारताविरोधात हिच सादिया महिलांची ब्रिगेड उभी करत असून त्यांना बॉम्ब बनवण्यापासून ते बॉम्ब स्पोट करण्यापर्यंत आणि त्यात जास्तीत जास्त लोकांना ठार मारण्यापर्यंतचे प्रशिक्षण देणार आहे. (Jaish-e-Mohammed)

या महिला दहशतवादी ब्रिगेडमध्ये जे दहशतवादी ठार झाले आहेत, त्यांच्या पत्नी आणि बहिणांना संधी देण्यात येणार आहे. जैशच्या बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मानसेहरा कॅम्पमध्ये राहणाऱ्या महिला आणि कमांडरच्या पत्नींनाही दहशतवादी मसूद अझहरच्या महिला ब्रिगेडमध्ये भरती केले जात आहे. या महिलांना ऑनलाईन बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेच, सोबत त्यांना कट्टर धार्मिकचेही धडे देण्यात येणार आहेत. ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी सहभागी महिलांकडून ५०० पाकिस्तानी रुपये घेण्यात येणार आहेत. भारतात याचे मुल्य १५६ आहे. (International News)

=======

हे देखील वाचा :

Louis de Bourbon : फ्रान्सच्या नागरिकांना पुन्हा राजेशाहीची ओढ !

======

अर्थात भूतकाळात पाकिस्तानमध्ये महिला दहशतवादी बनण्याची घटना नवीन नाही. यापूर्वी अनेक संघटनांनी महिलांना दहशतवादी म्हणून भरती करण्याचे प्रयोग केले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीची महिला ब्रिगेड खूपच धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या टीटीपीच्या महिला ब्रिगेडने खैबरमध्येही कहर केल्याच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाच्या मते, एकट्या खैबर प्रांतात ६७ महिला दहशतवादी आहेत. संपूर्ण पाकिस्तानमध्ये २०० हून अधिक महिला दहशतवादी आहेत. बलुचिस्तानमध्ये, महिला दहशतवाद्यांनी २०२४ मध्ये १५ घटना घडवल्या आहेत. याच महिला ब्रिगेड पाहून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने महिलांची ब्रिगेड सुरु कऱण्याचे ठरवले आहे. (Jaish-e-Mohammed)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.