Home » दहशतवादी हल्ल्यानंतर एखादी अतिरेकी संघटना जबाबदारी का घेते? काय होतो फायदा?

दहशतवादी हल्ल्यानंतर एखादी अतिरेकी संघटना जबाबदारी का घेते? काय होतो फायदा?

by Team Gajawaja
0 comment
Terror Attack
Share

पाकिस्तानात गेल्याच महिन्यात पेशावरजवळी मस्जिद मध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. अत्यंत सुरक्षित ठिकाणी बनलेल्या या मस्जिदीवर आत्मघाती हल्ला केल्याची जबाबदारी ही प्रथम तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांनी घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी त्यावरुन युटर्न घेतला. येथे प्रश्न उपस्थितीत राहतो की, ऐवढ्या मोठ्या हल्ल्यात आपला बात असल्याचे सांगून दहशतवादी संघटनेला काय मिळाले? खरंतर यामुळे संघटनेवर मोठी कारवाई झाली असती. अशा हल्ल्यानंतर अतिरेकी गट त्याची जबाबदारी घेतात? यामुळे त्यांना काही फायदा होतो का? (Terror Attack)

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेच ISISI, ही जगातील सर्वाधिक भयंकर अतिरेकी संघटना मानली जाते. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे, ते जगात आणि खासकरुन सीरिया आणि इराक मध्ये पूर्णपणे इस्लामिक कायदा आणू पाहत आहेत. जो कोणीही या देशासमोर आडवे येते, त्यांना इस्लामिक स्टेट संपवतो. तेव्हा कोणताही ग्रुप असो किंवा सरकार अथवा व्यक्ती. आपल्या विरोधात बोलणाऱ्या देशांवर ते कारवाई करत राहतात.

अशी घेतात जबाबदारी
अतिरेकी हल्ल्यानंतर ही संघटना जबाबदारी घेते. यांची एक खास पद्धत आहे. आयएसआयएस यांची एक न्यूज एजेंसी आहे. त्याने नाव अमाक असे आहे. यामध्ये ब्रेकिंग न्यूज ते इस्लामिक कायद्याबद्दल बोलले जाते. व्हिडिओ आणि लेखी बातम्या ही येतात. दरम्यान, ते टीव्हीवर येत नाही आणि त्यांना कोणीही पाहू शकत नाही. पण यासाठी संघटना परवानगी देते. हे एक अशा प्रकारचे आहे की, जसे की खास ग्रुप मध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही तेथे काय सुरु आहे हे पाहू शकता. हल्ल्यानंतर त्याच्या बातम्या आणि जबाबदारी अमाक न्यूज एजेंसीवर संघटना घेते.

बनावट बातम्या ही बनतात
सर्वसामान्यपणे एखाद्या आत्मघातील हल्ल्याच्या २४ तासात जर ISISI आपला हात असल्याचे सांगतो. दुसरी संघटना एक किंवा दोन दिवस घेते. दहशतवादी संघटनांमध्ये ही एकमेकांसोबत वाद असतात. काही वेळेस असे होते की, दुसरा ग्रुप धुडगूस घालून दुसऱ्याचे नाव घेतो. काही वेळेस बनावट बातम्या ही येतात. अशातच प्रत्येक संघटना आपला एक पॅटर्न तयार करते की, कशा प्रकारे हल्ल्याची जबाबदारी घेईन. जेणेकरुन त्यांच्या नावाने बनवाट बातम्या पसरवणार नाही.(Terror Attack)

जबाबदारी घेतल्यानंतर काय होते?
दहशतवादी संघटना यांचे कामच खोटे बोलणे आणि हल्ले करणे असते. तरीही हल्ल्यानंतर ही लोक खरं बोलतात का? याचे सुद्धा कारण आहे. फाउंडेशन फॉर डिफेंस ऑफ डेमोक्रेसीजच्या नुसार, अतिरेकी ग्रुप्ससाठी हे तसेच असते जसे एखादी कंपनी वर्षाच्या अखेरीस आपला नफा मोजतो. ते त्याला संधीच्या रुपात पाहत असतात. जर एखादा समूह सांगतो की, त्याने मोठ्या देशात हल्ला केलाय तर तेथे अन्य ठिकाणी भीती निर्माण होते. सरकार ही त्यांना घाबरते आणि त्यांच्यासोबत नेगोशिएट करेल असे त्यांना वाटते.

हे देखील वाचा- पाकिस्तानात सत्तेसाठी नेहमीच राहिला संघर्ष… इमरान ते भुट्टो यांच्यावर झालेत जीवघेणे हल्ले

फंडिंग मिळते
याचा आणखी एक फायदा त्यांना असा होतो की, जसे की, लहान विचार असणारे ग्रुप्स ही त्यांना जाऊन मिळतात. यामुळे त्यांची ताकद अधिक वाढली जाते. फंडिंग मिळणे ही सोप्पे होते. समान अजेंडा असणारे ग्रुप, जे बाहेरुन स्वच्छ दिसतात तेच अशा संघटनांना पैसे पुरवत असतात. यामुळे काळा पैसा सुद्धा दिसत नाही आणि काम होऊन जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.