Home » २७ मार्च: जगातील सर्वाधिक मोठ्या विमान अपघाताची साक्षीदार

२७ मार्च: जगातील सर्वाधिक मोठ्या विमान अपघाताची साक्षीदार

by Team Gajawaja
0 comment
Tenerife airport disaster
Share

२७ मार्च म्हणजे जगातील सर्वाधिक भयंकर विमान अपघाताची तारीख. वर्ष १९७७ याच दिवशी एक मोठा विमान अपघात झाला आणि जेव्हा या दुर्घटनेला आठवले जाते तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. या दिवशी स्पेनच्या रनवेवर दोन बोइंग विमान एकमेकांना धडकली होती आणि या दुर्घटनेत ५८३ लोकांचा मृत्यू झाला होता. विमान अपघाताचे फोटो आजही सोशल मीडियात पहायला मिळतात. ते फोटो पाहून अपघाताचा अंजाद लावणे सुद्धा मुश्किल होते. तर स्पेन मधील टेनेराइफ द्वीपवर लॉस रोडियोस विमान तळाच्या रनवेवर ही दुर्घटना झाली. विमानताळांच्या इतिहासात हा सर्वाधिक विनाशकारी अपघात असल्याचे बोलले जाते. (Tenerife airport disaster)

ज्या दोन विमानांचा अपघात झाला त्यामध्ये एक होते KLM फ्लाइट 4805, ज्याने एम्सटर्डम येथून उड्डाण केले होते. तर दुसरे Pan Am अमेरिकन फ्लाइट 1736 होते जे अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे येणार होते. दोन्ही विमानांना एकाच विमानतळावर लँन्डिंग करायचे होते. मात्र प्रवासी परिसरात एक स्फोट झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सर्व हालचाली ठप्प झाल्या. विमानतळाचे मार्ग बंद झाले. विस्फोटाच्या कारणास्तव एअर ट्राफिक वळवावे लागले.

KLM चे विमान प्रथम विमानतळावर उतरले होते. त्याच्या मागे लॉस-एंजिलिस येथून येणारे अमेरिकन विमान. वातावरण खराब होते. दोन्ही पायलटांना काही स्पष्ट दिसत नव्हते. रिपोर्टनुसार ज्यावेळी अमेरिकीन विमान रनवेवर आले तेव्हा विजिबलिटी जवळजवळ ५०० मीटर होती. त्यानंतर कमी होत १०० मीटर पेक्षा कमी झाली.

दोन्ही एकाच रनवेवर उतरले होते आणि याची कोणालाच माहिती नव्हती. वातावरणात बिघाड झाल्याने केएलएम विमानाने टेकऑफसाठी सुरुवात केली आणि अमेरिकन विमानाशी त्याच वेळी टक्कर झाली. दोन्ही विमानांचा जोरदार स्फोट झाला. चारही बाजू्ंनी आग लागली गेली आणि विमानात बसलेले ५८३ लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकन विमानाला केवळ ६१ लोकांचा जीव वाचवण्यात यश आले. (Tenerife airport disaster)

या अपघातानंतर आंतरराष्ट्रीय विमान परिचालनच्या क्षेत्रात काही नवे नियम लागू करण्यात आले. विमान चालक आणि एअर ट्राफिक कंट्रोल दरम्यान संचार व्यवस्थांमधील अडथळा दूर करण्यात आला. विमान परिचालनासाठी वापरण्यात येणाऱ्या काही शब्दांमध्ये ही बदल केला गेला. खरंतर टेकऑफच्या ऐवजी डिपार्चर. याच्यासोबत क्रू संसाधन प्रबंधन सुद्धा झाले.

हे देखील वाचा- दलाई लामांनी दिला चीनला धक्का…

सन् १९७७ च्या या दुर्घनेचा तपास करण्यासाठी जवळजवळ ७० तज्ञांचा समावेश होता. ज्यामध्ये अमेरिका, नीदरलँन्ड्स आणि दोन्ही एअरलाइन्स कंपन्यांचे प्रतिनिधी होती. तथ्यांवरुन असे कळते की, केएलएमच्या पायलटने विचार केला की, त्याला टेकऑफसाठी परवानगी दिली गेली आहे. तर टेनेराइप कंट्रोल टॉवरचे असे मानणे होते की, केएलएम ७४७ रनवेवर स्थिर होते. हिच चुक झाली आणि दोघांमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.