भारतात अशी काही मंदिरं आहेत जेथे देवी-देवतांची मुर्ती नव्हे तर सिनेमातील सुपरस्टार्स आणि राजकीय नेतेमंडळींची पूजा केली जाते. खरंतर त्यांची आरती ही केली जाते. हे थोडं विचित्र जरी असले तरीही त्यांची मंदिर ही भारतातच उभारण्यात आली आहेत. नक्की मंदिर कोणाची आहेत आणि कुठे आहेत हे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या डोक्यावर हातच मारालं. तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Temples of superstars)
अमिताभ बच्चन
कोलकाता मधील बालीगंज परिसरात अमिताभ बच्चन यांचे एक मंदिर आहे. हे मंदिर दोन खोल्यांचे आहे. पहिल्या खोलीत अमिताभ बच्चन यांचे काही फोटोज लावले गेले आहेत. म्हणजेच ते एक संग्रहालयच आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
तर दुसऱ्या खोलीत हिरव्या रंगाचे एक सिंहासन आहे. त्यावर अमिताभ बच्चन यांना काळ्या रंगाच्या कुर्त्यामधील फोटो आणि सफेद रंगाची बुट आहेत. हा फोटो खरंतर सिनेमातील एखादी भुमिका अमिताभ बच्चन यांनी साकारल्या प्रमाणे आहे. या मंदिराची उभारणी संजय पटोदिया नावाच्या एका चाहत्याने २००३ मध्ये केली होती. त्यासाठी अमिताभ बच्चन हे कलाकारच नव्हे तर देवासमान होते. मंदिरात अन्य मंदिराप्रमाणे पूजा ही केली जाते.
रजनीकांत
साऊथ मध्ये देव मानल्या जाणाऱ्या रजनीकांतच्य नावावर ही एक मंदिर आहे. दरम्यान, या मंदिरात त्यांचा एक फोटो आणि मुर्ती नाही. पण कर्नाटकातील कोलार जिल्ह्यत कोटिलिंगेश्वर मंदिरातच सहस्र लिंगम नावाचे हे मंदिर बनवण्यात आले होते. हे मंदिर अशावेळी बांधले गेले जेव्हा त्यांच्या चाहत्यांना रजीकांत यांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी कळली. हे मंदिर बांधण्यामागील उद्देश असे की, त्यांची उत्तम प्रकृती आणि त्यांची समृद्धी होता.
हे देखील वाचा- ‘येथे’ स्मशानभूमीत मृत शवासाठी ही द्यावे लागते भाडे, अन्यथा…
सचिन तेंडुलकर
बिहार मध्ये क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे मंदिर आहे. कैमूर जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात सचिन तेंडुलकर यांची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे मंदिर क्रिकेट मध्ये शानदार करियर आणि योगदानासाठी व सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ बनवण्यात आले होते. खास गोष्ट अशी की, या मंदिराची निर्मिती भोजपुरी अभिनेता आणि गायक मनोज तिवारी यांनी केली होती.(Temples of superstars)
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांचे फॅन-फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या अनुयायांकडून नेहमीच खास केले जाते. नरेंद्र मोदी सुद्धा मंदिराच्या या लिस्टमध्ये आहे. नरेंद्र मोदी यांचे राजकोट जवळील कोठारिया गावात आहे. मोदी यांचे हे मंदिर त्यांचे समर्थक आणि भाजपच्या नेत्यांनी मिळून उभारले. हे मंदिराला राजकोट विधानसभा निवडणूकीपूर्वी पहिल्यांदा उमेदवाराच्या रुपात सुरु होणाऱ्या मोदी यांच्या यशस्वी प्रवासाच्या रुपात बनवण्यात आले होते.
सोनिया गांधी
करीमनगर जिल्ह्यातील मलियाल शहरत सोनिया गांधी यांचे एक मंदिर उभारण्यात आले आहे. त्या मंदिरातील मुर्तीच्या एका हातात लाडूंची प्लेट ही आहे. २०१४ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते. यामागील उद्देश असा की, सोनिया गांधींना तेलंगणाच्या राज्य निर्माताच्या रुपात सन्मान देणे. या मंदिरात सोनिया गांधी यांची मुर्ति संगमरवराची बनवण्यात आली आहे.