भारतातील संस्कृती ही जगभरात प्रसिद्ध आहे. तर प्रत्येक १० पावलांवर तुम्हाला येथे काहीतरी नवे पहायला मिळते. देशाची सर्वाधिक मोठी खासियत अशी की, संस्कृतीसह लोक राहणीमान ही बदलले जाते. जर भारतीय महिलांच्या वस्रांबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यांना साडी नेसणे खुप आवडते. यामध्ये हजारो प्रकार असून प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. परंतु त्यापैकीच एक असलेल्या तमिळनाडु मधील प्रसिद्ध कोनराड साडी बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Temple Saree)
कोनराड साडीला टेम्पल साडी असे सुद्धा म्हटले जाते. ही साडी बहुतांशकरुन तमिळनाडुतील पूर्व भाग अर्नी, कांचीपुरम, कुंभकोणम, रासीपुरम, सलेम, तंजावुर आणि तिरुभुवनम सारख्या परिसरात तयार केली जाते. याची अशी ही खासियत आहे की, ती हाताने तयार केली जातेच. पण ती तयार करण्याची प्रक्रिया ही फार कठीण आहे. कोनराड साड्यांवर निसर्गासंबंधित काही विशेष डिझाइन्स असतात. या साडीच्या बॉर्डरवर असलेल्या विशेष डिझाइन्समुळे याला पेट्टू किंवा कांपी असे म्हटले जाते. जो साडीच्या किनाऱ्यावर जवळजवळ ३ सेंटीमीटरवर असतो.याला टेम्पल अथवा मुबहम साड्या असे ही म्हणतात. कारण यामध्ये साउथ मधील लोकप्रिय मंदिरांचे रुपांकन असते.
कोनराड साडीची विशेषता
-या साड्यांची बॉर्डर ही १०-१४ सेंटीमीटर असतो. त्यांना काम्पियोर पेट्टूच्या रुपात ही ओळखले जाते. त्याची बॉर्डर फार बारीक असते.
-पारंपरिक आणि हाताने तयार करण्यात येणारी कोनराड साडीच्या घेरावाला सुंदर पॅटर्न असतात. पल्लूच्या येथे गोल्डन थ्रेडने काम किंवा रुंद जर लावली जाते.
-अशा प्रकारच्या साडीमध्ये ग्रे, काळा किंवा ऑफ-व्हाइट रंग खुप दिसतो
-यामध्ये मंदिरांसह नैसर्गिक गोष्टींचा ही समावेश डिझाइन मध्ये केला जातो. त्याला कोरवई असे म्हणतात (Temple Saree)
कोनराड साड्यांचे प्रकार
-अरनी सिल्क साडी ही अत्यंत मऊ आणि टिकाऊ सिल्क साडी असते. याच्या बॉर्डरला मंदिरांचे चित्र असतात
-तंजौर साडी मध्ये सोनेरी धाग्यांनी मंदिर आणि पक्षींच्या रुपात जरीचे काम केलेले असते. ही साडी कांचीपुरम साडीपेक्षा वजनाने हलकी असते
हे देखील वाचा- हातात चांदीचे कड घालणे मानले जाते शुभ, जाणून घ्या फायदे
बाजारात तुम्हाला ही साडी ५ हजार ते ४० हजारांपर्यंत विक्री केली जाते. आता यामध्ये विविध रंग सुद्धा उपलब्ध करुन दिले जातात. मात्र आता यामध्ये नवे डिझाइन्स ही आणले गेले आहेत.