हिंदू (Hindu) धर्मातील लोकांसाठी मंदिरं (Temple) हे आपल्या आयुष्याचा अनन्यसाधारण भाग आहे. काही लोकं अगदी दररोज, काही लोकं वेळ मिळेल तेव्हा, काही लोकं खास दिवशी मंदिरांमध्ये जात देवाचे दर्शन घेतात. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण प्रसाद घेतो आणि सोबतच तिथे असलेल्या दानपेटीमध्ये (Donate) आपल्या इच्छेनुसार काही पैसे टाकतात. काही धनिक लोकं तर सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू देखील या दानपेटीमध्ये टाकतात.
सध्या एक किस्सा, एक घटना चांगलीच रंगत आहे, जी याच दानपेटीशी संबंधित आहे. विचार करा तुम्ही दानपेटीमध्ये पैसे टाकताय आणि चुकून तुमचे पाकीटच त्यात पडले तर?, पैसे टाकतात इतर महत्वाची गोष्ट दानपेटीत पडली तर? किंवा दानपेटीत पैसे टाकताना तुमचा महागडा आयफोन दानपेटीत पडला तर? अशीच एक घटना नुकतीच चेन्नईमध्ये (Chennai) घडली आहे.
तामिळनाडूतील (Tamilnadu) तिरुपोरूरमधील (Tiruporur) अरुलमिगु कंदास्वामी मंदिरातील (Arulmigu Kandaswamy temple) एक अशीच घटना आहे. तामिळनाडूमधील चेन्नई जवळील अरुलमिगु कंदास्वामी मंदिरात एका भाविकाच्या खिशातून चुकून त्याचा आयफोन (iphone) देवाच्या दानपेटीत पडला. यावरून आता एक मोठा वाद उभा राहिला आहे.
अरुलमिगु कंदास्वामी मंदिरातील दानपेटीत एका भाविकाचा चुकून आयफोन पडला. त्या भाविकाने तो परत मागितला. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून आता ही ईश्वराची संपत्ती असल्याचे सांगत फोन देण्यास नकार दिला. या विचित्र घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
iPhone accidentally fell into the temple’s hundi..
The temple administration refused to return it the owner, saying it belonged to the temple.pic.twitter.com/4VgfcRk0Ib
— Vije (@vijeshetty) December 20, 2024
विनायकपुरमचे मूळ निवासी असणारे दिनेश (Dinesh) त्यांच्या पत्नी आणि मुलांसह काही दिवसांपूर्वी या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. प्राप्त वृत्तानुसार पूजा केल्यानंतर हुंडीमध्ये अर्थात दानपेटीमध्ये दान स्वरुपात काही पैसे टाकण्यासाठी त्यांनी खिशात हात टाकला. पण, तेव्हाच त्यांचा iPhone सुद्धा चुकून हुंडीमध्ये पडला. ही हुंडी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळीसुद्धा होती. त्यामुळे दिनेश यांना त्यातून फोन काढता आला नाही.
दिनेश यांनी लगेच मंदिर प्रशासनाशी संपर्क केला आणि त्यांना आयफोन परत देण्याची विनंती केली. प्रशासनाने मंदिराची हुंडी उघडल्यावर त्यात दिनेश यांचा आयफोन मिळाला. मात्र मंदिर प्रशासनाने त्यांना फोन न देता सांगितले की, ते फोनचा डेटा घेऊ शकतात. परंतु फोन त्यांना परत मिळणार नाही. दिनेश यांनी डेटा घेण्यास नकार दिला. त्यांनी फोनच परत देण्याची विनंतीवजा मागणी केली.
=======
हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
=======
विश्वस्तांनी दिनेश यांना फोन देण्यास नकार देताना पुन्हा तेच सांगितले की, दानपेटीत एकदा गोष्ट गेली की ती मंदिराची संपत्ती होते. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानंतर दिनेश यांनी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एन्डॉमेंट्स कायद्यानुसार तक्रार दाखल केली. त्यावेळी आयफोन नाही पण सिमकार्ड परत देऊ शकतो. यातून तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकता, असे मंदिर प्रशासनाने सांगितले.
हे प्रकरण इथेच थांबले नाही तर ते थेट मंत्री पी के शेखर बाबू (P.K. Shekhar Babu) यांच्याकडे गेले. त्यांनी यावर बोलताना म्हटले आहे की, “हुंडीत जे काही अर्पण केले जाते, ते ईश्वराचे होते. मग अर्पण केलेली वस्तू चुकून केली असली तरी ती ईश्वर दरबारी जमा होते.” मंदिराच्या नियमानुसार हुंडीत टाकलेली वस्तू परत मिळत नाही. तसेच मंत्री बाबू यांनी पुढे म्हटले की, “या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच भाविकाला काही भरपाई देता येईल का? त्याचाही विचार केला जाईल.”