हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या सोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे झळकणार आहे.
अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेत आहे.
====
हे देखील वाचा: निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार ‘विशू’ची प्रेमकहाणी
====
‘’जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे”, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने याचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे.
ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तर, मुळची मराठी असलेल्या तेजस्वीनीने गेली अनेक वर्षे संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का आणि त्यानंतर बिग बॉस 15 मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी सिनेमात दिसून येणार आहे.
====
हे देखील वाचा: १५ मे पासून भेटीला येणार मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’
====
लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. या सिनेमाचे संगीतही खास असेल, टाईम्स म्युझिक या सिनेमाशी जोडले गेले आहेत. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या सिनेमाचे चित्रीकरण संपूर्ण पणे मुंबईत झाले आहे.