Home » चुकून मोबाइलमधील क्रमांक डिलिट झालेत? बॅकअपसाठी वापरा ही ट्रिक

चुकून मोबाइलमधील क्रमांक डिलिट झालेत? बॅकअपसाठी वापरा ही ट्रिक

तुमच्या फोनमधील सर्व मोबाइल क्रमांक अचान डिलिट झाल्यानंतर ते पुन्हा कसे मिळवायचे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण यावर उपाय असून त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

by Team Gajawaja
0 comment
Recharge Plans
Share

Technology News : एक काळ असा होता जेव्हा घरातील मंडळी किंवा मित्रांचे मोबाइल क्रमांक तोंडपाठ असायचे. पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे फार कमी जणांना एकमेकांचे मोबाइल क्रमांक तोंडपाठ असतील. आता लोक मोबाइलमध्येच फोन क्रमांक सेव्ह करून ठेवतात. एखाद्याला फोन लावायचा झाल्यास तर सेव्ह केलेल्या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला थेट फोन लागला जातो. पण अचानक फोनमधील सर्व मोबाइल क्रमांक डिलिट झाले तर काय करायचे? अशातच तुम्ही डिलिट झालेले सर्व मोबाइल क्रमांक पुन्हा मिळवू शकता. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

Google Account ची मदत घ्या
तुमच्या फोनमध्ये Gmail अॅप असल्यास गुगल अकाउंटही असेल. येथे तुम्ही डिलिट झालेले मोबाइल क्रमांक गुगल अकाउंटच्या माध्यमातून पुन्हा परत मिळवू शकता. यासाठी पुढील काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
-फोनमध्ये Google Contact अॅप डाउनलोड करा
-या अॅपमध्ये ज्या गुगल आयडीवर मोबाइल क्रमांक सेव्ह आहेत त्याचे लॉग इन करा
-खालच्या बाजूस Fix & Manage आयकॉनवर टॅप करा
-आता तुम्हाला मोबाइल क्रमांक इंपोर्ट, एक्सपोर्ट आणि रीस्टोर करण्याचे ऑप्शन दाखवले जाईल
-येथे Restore Contact ऑप्शनवर क्लिक करा
-आता Restore बटणावर क्लिक करा
-जे काही मोबाइल क्रमांक डिलिट झाले आहेत ते तुम्हाला परत मिळतील,

Phone Backupचा वापर
तुम्ही फोनचा बॅकअप घेतला असल्यास डिलिट झालेले मोबाइल क्रमांक पुन्हा मिळवू शकता. यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा
-फोनमध्ये सेटिंग्स सुरू करा
-Backup & Restore ऑप्शनवर जा
-Restore ऑप्शनवर क्लिक करा
-Contacts ऑप्शन निवडा

तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल त्यामध्ये डिलिट झालेले मोबाइल क्रमांक पुन्हा हवेत की नकोय असा पर्याय दाखवला जाईल.

Third Party App चा वापर
तुमच्याकडे गुगल अकाउंट किंवा फोन बॅकअप नसल्यास तुम्ही थर्ट पार्टी अॅपचा वापर करू शतता. याच्या माध्यमातून डिलिट झालेले सर्व मोबाइल क्रमांक पुन्हा मिळवू शकता. या अॅपमध्ये फोनला स्कॅन करून डिलिट झालेले मोबाइल क्रमांक शोधण्याची सुविधा मिळते. (Technology News)

थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करताना हे लक्षात ठेवा की, तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरुनच डाउनलोड करा. याशिवाय रेटिंग स्टार आणि रिव्हूही तपासून पाहा.


आणखी वाचा :
WhatsApp वरील या शॉर्टकर्ट्स तुम्हाला माहितेयत का?
Income Tax Refundच्या नावाखाली नागरिकांची लूट, हा मेसेज आल्यानंतर क्लिक करू नका
अशा पद्धतीने सुधारा तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.