Tech Tips : स्मार्टफोनचा केवळ लॉक लावणे पुरेसे नाही. पण डिवाइसमध्ये काही अशा सेटिंग्स असतात ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन अगदी सुरक्षित राहू शकतो. हेच कारण आहे की, सध्याच्या काळात मोबाइल सेफ्टी फार महत्वाची आहे. पण तुम्ही फोनच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंतेत आहात का? अशाच एका फीचरबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो.
असा सेट करा पासवर्ड
पासवर्ड क्रिएट करुन लावल्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय तुमचा फोन स्विच ऑफ होणार नाही. हे काम करण्यासाठी काही सिंपल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
पहिली स्टेप म्हणजे फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे सेटिंग सुरु केल्यानंतर सर्च बारमध्ये Password असे लिहा. येथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, एखाद्या डिवाइसमध्ये फीचर पासवर्ड अथवा फिचर Power Off नावाने तुम्हाला ते दाखवले जाईल. हे फीचर रिअलमी, ओप्पो, व्हिवोसारख्या स्मार्टफोनमध्ये अगदी सहज मिळतील. जसे तुम्ही सर्च कराल तेव्हा Require Password to Power Off नावाने ऑप्शन मिळेल. या ऑप्शनवर क्लिक करा. (Tech Tips)
या फीचरमुळे फोनमध्ये इनबिल्ड असते. पण फिचर ऑन केल्यानंतर तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो. एखाद्याने फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला स्क्रिन पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल.
असा तयार करा स्ट्राँग पासवर्ड
हॅकर्सपासून तुमचा फोन सुरक्षित रहावा म्हणून मजबूत पासवर्ड तयार करणे अत्यावश्यक आङे. यासाठी लहान-मोठे कॅरेक्टर्स आणि क्रमांक अशा सर्व गोष्टी मिक्स करुन एक पासवर्ड तयार करू शकता. यामुळे अकाउंटचा पासवर्ड अधिक मजबूत बनला जाईल. याशिवाय हॅकर्सला ही तुमचा पासवर्ड क्रॅक करणे मुश्किल होईल.
पासवर्ड तयार करताना काय काळजी घ्याल?
काही साइट्स पासवर्ड तयार करताना रंगाचे इंडिकेटर्स देतात. अशातच मजबूत पासवर्ड नसल्यास लाल रंग दाखवला जाईल. ठिकठाक पासवर्ड असल्यास पिवळा आणि मजबूत पासवर्ड असल्यास हिरवा रंग दाखवला जाईल.