Tech Tips : दररोज कोणी ना कोणी सांगत असे की, फोन चोरी झाला आहे अथवा हातातून हिसाकवून घेऊन पळाला आहे. खरंतर, अलीकडल्या काळात फोन चोरी होण्याच्या घटना दिवसागणिक वाढल्या आहेत. अशातच स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर तो शोधून काढायचा कसा हा मोठा प्रश्न उद्भवतो. यावर अनेकजण उत्तर देतात की, Find my Device फीचरचे वापर करावे. याच्या माध्यमातून फोन ट्रॅक करता येऊ शकतो.
पण तुम्हाला माहितेय का, Find My Device अशावेळीच काम करते जेव्हा तुमच्या फोनमधील इंटरनेट सुरु असते. पण फोन चोरी झाल्यानंतर चोर फोन स्विच ऑफ करतो. यामुळे इंटरनेट देखील बंद होते. अशाचच फाइंड माय डिवाइस फीचर काम करत नाही आणि फोन ट्रेस करणे मुश्किल होते. यावेळी काय करावे याबद्दलच जाणून घेऊया…. फोनमध्ये काही अशा सेटिंग्स करायचा आहेत, ज्यामुळे फोन चोरी झाल्यानंतरही तुम्हाला ट्रेस करता येईल. (Tech Tips)
करा या सेटिंग्स
सर्वप्रथम फोनमधील सेटिंग्स सुरु करा. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला गुगल ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. गुगलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Find My Device चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर लगेच तुम्हाला Find Your Offline Device असे ऑप्शन दाखवले जाईल. या देखील ऑप्शनवर क्लिक केल्यास अन्य देखील ऑप्शन दिसतील. यापैकी तुम्हाला Without Network चे ऑप्शन ऑन करायचे आहे. या ऑप्शनमध्ये लिहिलेले दिसेल की, हे फीचर फोनच्या जवळचे लोकेशन कोणते आहे. याच्या मदतीने तुम्हाला फोन ट्रेस करण्यास मदत होईल.