Tech News : एलॉन मस्क प्रत्येक दिवशी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X संदर्भात काही ना काही बदल करत असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात. अशातच मस्क यांनी प्लॅटफॉर्म संदर्भात एक मोठा बदल केला आहे. तुमच्या पोस्टव्यतिरिक्त कोणत्याही युजर्सला लाइक पोस्टबद्दल कळणार नाही. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या पोस्टवर किती लाइक आलेत हे सर्वकाही खासगी राहणार आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया….
प्लॅटफॉर्म लाइक्स दिसणार नाहीत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या इंजिनिअरिंग ग्रुपच्या पोस्टनुसार, यंदाच्या आठवड्यानंतर हा बदल दिसून येणार आहे. यामुळे पोस्टवरील लाइक खासगी होणार आहेत. म्हणजेच तुमच्या पोस्टला तुमच्याव्यतिरिक्त दुसऱ्या युजरला किती लाइक्स आलेत हे कळणार नाहीये.
नोटिफिकेशन येणार का?
एक्स पोस्टनुसार, तुम्हाला प्रत्येक लाइ, कमेंटचे नोटिफिकेशन जरुर येईल. तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये नोटिफिकेशन दिसतील की, कोणी तुमची पोस्ट लाइर केली आहे. अथवा किती लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (Tech News)
Important change: your likes are now private https://t.co/acUL8HqjUJ
— Elon Musk (@elonmusk) June 12, 2024
युजरला फायदा
या बदलावामुळे युजर्सच्या प्राव्हेसीला धोका निर्माण होणार नाहीये. याचा फायदा असा होणार आहे की, तुमच्या पोस्टवर लाइक आणि तुम्ही कोणाची पोस्ट लाइक केलीय हे कोणालाही कळणार नाही. म्हणजेच फक्त तुम्हालाच लाइकबद्दल कळणार आहे. यामुळे प्रायव्हेसीची अधिक सुरक्षितता राखली जाणार आहे.