Tech News : मेटाने भारतात आपला एआय चॅटबॉट रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता युजर्सला फ्री मध्ये मेटाच्या एआय चॅटबॉटचा वापर करता येणार आहे. युजर्सला या चॅटबॉटचा वापर फेसबुकव्यतिरिक्त सर्व प्लॅटफॉर्म म्हणजेच व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजवर पैसे खर्ज केल्याशिवाय वापर करता येणार आहे.
मेटाच्या एआय चॅटबॉटची खास गोष्ट अशी की, हे टेक्स्ट व्यतिरिक्त युजर्सला इमेजही जनरेट करण्यास मदत करणार आहे. यामुळे युजर्सला आपले काम अधिक उत्तम पद्धतीने करता येणार आहे. याचा व्हॉट्सअॅपवर कसा वापर करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
व्हॉट्सअॅपवर कसे वापराल मेटा एआय?
जेव्हा तुम्ही सर्च बारमध्ये टाइप कराल तेव्हा तुमच्या चॅट्ससोबत प्रश्नही दाखवले जातील, जे तुम्ही मेटा एआयला विचारू शकता. मेटा एआय आतापर्यंत तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय एखाद्या मेसेजला कनेक्ट करुन देत नव्हता. आता व्हॉट्सअॅपवर सर्च फीचरचा वापर करणे सुरुच राहणार आहे. सर्च बारमध्ये जाऊन आधीप्रमाणे चॅट्स मेसेज, फोटो, व्हिडीओ, लिंक,ऑडिओ, पोल्स आणि डॉक्युमेंट्सबद्दल सर्च करता येऊ शकते. यामुळे तुमच्या पर्सनल चॅट्सला कोणतेही नुकसान होणार नाही. (Tech News)
Meta AI च्या माध्यमातून कसे सर्च कराल?
-चॅट लिस्टमध्ये सर्वात वरती असलेल्या सर्च फिल्डवर टॅप करा
-सुचवण्यात आलेल्या प्रॉम्पवर टॅप करा आणि आपला प्रॉम्प टाइप करुन नंतर सेंड बटणावर क्लिक करा
-प्रॉम्प्ट टाइप करताच तुम्हाला Meta AI ला प्रश्न विचारा आणि सेक्शनमध्ये सर्चसंबंधित काही पर्याय दिसतील
-पुढे काही अटी वाचून स्विकार करा
-सर्च संदर्भातील कोणत्याही पर्यायावर क्लिक करा