आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने शिक्षण दिन साजरा होत आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेवढे महत्व आपल्या आईवडिलांना आहे तेवढेच महत्व शिक्षकांना देखील आहे. आपल्या शैक्षणिक जीवनाचा भक्कम पाय घालताना प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थाला पुस्तकीच शिक्षण देत नाही तर त्याला जीवनात यश मिळवण्यासाठी कायम मार्गदर्शन करत असतात. विद्यार्थ्यांना सतत चांगले आणि वाईट यातला फरक देखील दाखवत असतात. अशा या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. (Teachers Day)
दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी देशात शिक्षक साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या दिवशी देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि राजकीय नेते म्हणून २०व्या शतकातील शिक्षण आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध व प्रभावी भारतीय विचारवंतांपैकी ते एक होते. त्यांना भारत सरकारने पहिला भारतरत्न पुरस्कार दिला होता. आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल. (doctor sarvepalli radhakrishnan)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीद्वारे पूर्ण केले. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पूर्ण केले आणि त्यानंतर १९१८ ‘फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ हे पुस्तक प्रकाशित केले. शालेय जीवनात ते खूप हुशार विद्यार्थी होते. त्याचबरोबर पुढे त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ वर्षं पर्यंत म्हणजे ४० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . (Marathi News)
५ सप्टेंबर १८८८ रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म गरीब तमीळ ब्राह्मण कुटुंबात झाला. आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मूळ गाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले. राधाकृष्णन यांनी त्यांचे पुढील शिक्षण तिरुपती या गावी घेतले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमधून घेतले. ते तत्त्वज्ञान विषय घेऊन प्रथम क्रमांकाने पास झाले. पुढे एम्.ए. साठी राधाकृष्णन यांनी नितीशास्त्र विषय घेतला. त्याकाळी मद्रासच्या ब्राह्मण कुटुंबात लहान वयातच विवाह होत असे. रितीनुसार राधाकृष्णन यांचा देखील विवाह वयाच्या १६ व्या वर्षी शिवकामु नावाच्या त्यांच्या एका दूरच्या बहिणीशी झाला होता. (Todays Marathi Headline)
सर्वपल्ली राधाकृष्णन मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९१७ पर्यंत कार्य केले. १९३९ मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. त्यांनी म्हैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठासह अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या तुलनात्मक धर्म आणि तत्त्वज्ञानावरील कार्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाची पाश्चात्य जगाला ओळख झाली. समाजासाठी परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षण असते, या तत्वावर त्यांची निष्ठा होती. राधाकृष्णन यांनी १९४९ ते १९५२ पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारतीय राजदूत म्हणून कार्य केले. डॉ. राधाकृष्णन हे १९५२ ते १९६२ या काळात भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. १९६२ ते १९६७ या काळात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. (Latest Marathi Headline)
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ३५व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या ‘चेअर ऑफ फिलॉसॉफी’ या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना ‘नाईटहूड’ने सन्मानित केले होते. मुख्य बाब म्हणजे ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा मानांकन मिळाले होते. राधाकृष्णन यांच्याबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यातले काही जाणून घेऊया. (Top Trending News)
एकदा क्लार्कने सर्वपल्ली यांना टॅक्सी आणि रेल्वेचे भाडे असे मिळून साडेतीन रुपये परत दिले होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी त्यातले ५० पैसे परत दिले होते. तेव्हा क्लार्कने कारण विचारण्याआधीच त्यांनी सांगितले की, हे पैसे मी माझ्या खाजगी खर्चासाठी वापरले होते ते परत घ्या. जेव्हा सर्वपल्ली राधाकृष्णन बनारस हिंदू विद्यापीठात शिकवण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काही अटी घातल्या होत्या. तिथे वेतन न घेता त्यांनी कुलगुरु पदाची जबाबदारी सांभाळली. खरंतर आठवड्यातून तीन दिवस आणि जास्तीजास्त तीन वर्षेच मी इथे सेवा करेन असे त्यांनी आधीच कुलगुरु महामना यांना सांगितले होते. मात्र बनारस हिंदू विद्यापीठात आल्यानंतर ते अटच विसरून गेले. त्यांनी पुढची नऊ वर्षे बीएचयूमध्ये सेवा केली. (Top Marathi News)
राधाकृष्णन हे १९४९ ते १९५२ या काळात ते भारताचे USSR चे राजदूत म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९५२ पासून १९६२ पर्यंत भारताच्या उपराष्ट्रपती पदावर होते. पुढची पाच वर्षे १९६२ ते १९६७ ते देशाचे राष्ट्रपती झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी १९५४ त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरव केला. (Latest Marathi News)
======
Teachers Day :५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा होतो?
======
स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) सर्वपल्ली राधाकृष्णन अध्यक्ष देखील होते. शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय प्रेम आणि जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा, ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो, असे त्यांचे मत होते. अशा या महान शिक्षकाचे निधन दीर्घ आजाराने १७ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics