Teach News : आजच्या काळात एआयचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रत्येक क्षेत्रात एआयच्या वापरामुळे काही कामे करणे सोपे झाले आहे. अशातच बहुतांशजण आता गुगलएवजी उत्तर शोधण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करतात. पण चॅट जीपीचीची सर्च हिस्ट्री डिलीट करायची प्रोसेस काय आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
चॅटजीपीटीची सर्च हिस्ट्री फोनमधून कशी करावी डिलीट?
-चॅट जीपीटीची फोनमधून सर्च हिस्ट्री डिलिट करण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये चॅटजीपीटी सुरु करा.
-टॉप राइट कॉर्नरवर दोन लाइन आयकॉनवर क्लिक करा.
-येथे चॅटजीपीटी आणि एक्सप्लोर जीपीटीच्या खाली सर्च हिस्ट्री दिसेल.
-आतापर्यंत जे प्रश्न चॅटजीपीटीला प्रश्न विचारले आहेत ते तुम्हाला हिस्ट्री विंडोमध्ये दिसेल.
-हिस्ट्री डिलीट करण्यासाठी आपल्या प्रोफाइलच्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा.
-आता डेटा कंट्रोलवर क्लिक करा.
-आता पुढील विंडोमध्ये क्लिअर चॅट हिस्ट्रीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण सर्च हिस्ट्री चॅट जीपीटी मधून डिलीट होईल.
बेवसाइटवरुन कशी कराल डिलीट?
-वेबवर चॅट जीपीटी हिस्ट्री डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम स्क्रिन सुरु करा.
-आता टॉप कॉर्नवर दिसत असलेले प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
-तिसऱ्या क्रमांकावर Setting ऑप्शन दिसेल. येथे क्लिक करा.
-आता General ऑप्शनवर जा.
-सेक्शनमध्ये बॉटमला खाली Delete All Chats चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. (Teach News)
-अशाप्रकारे एकाचवेळी चॅटजीपीटी हिस्ट्री डिलीट करू शकता.