चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे की त्याचे सेवन योग्य आहे? दीर्घ काळापासून हा चर्चेचा विषय राहिला आहे. अभ्यासातही संमिश्र परिणाम आढळून आले आहेत. काही संशोधने असे सांगतात की, चहाचे जास्त सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू शकतात. तर काहींचे असे मत आहे की, चहाचे मध्यम सेवन आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही देखील या गोष्टींबद्दल गोंधळलेले असाल, तर आज आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करत, चहा आरोग्यदायी कसा बनवायचा याबद्दल सांगणार आहोत. (Tea benefits)
आपला सुखदायक सुगंध आणि ताजेतवान्या अनुभूतीसाठी, चहा जगभरात प्रिय आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की, चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जरी मध्यम प्रमाणात चहाचे सेवन बहुतेक लोकांसाठी आरोग्यदायी मानले जात असले, तरी जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चहाच्या अतिसेवनामुळे चिंता, डोकेदुखी, पचनाच्या समस्या आणि झोपेची पद्धत बिघडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मात्र, चहा किती फायदेशीर किंवा हानिकारक आहे, हे त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. (Tea benefits)
चहाबद्दल अभ्यासात काय आढळले?
अनेक अभ्यास दर्शवतात की, वेगवेगळ्या प्रकारच्या चहामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चहामध्ये काही औषधी मिसळून त्याचे सेवन केल्यास किंवा विशिष्ट प्रकारच्या चहाच्या सवयीमुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि कर्करोग व हृदयविकारापासून संरक्षण होते. चहा तुमच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो, कोणत्या प्रकारच्या चहाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यासाठी फायदे मिळू शकतात, त्याबद्दल जाणून घेऊया. (Tea benefits)
हे देखील वाचा : पावसाळ्यात तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ‘अशी’ घ्या काळजी
आले आणि काळी मिरीचा चहा
आल्याचा चहा लोकांची पहिली पसंती आहे. तो केवळ चवीच्या बाबतीतच चांगला नाही, तर त्यात वापरण्यात येणारी औषधी शरीराला अनेक फायदे देऊ शकते. चहामध्ये आलं घातल्याने रिफ्रेश होण्यास मदत होते, तसेच घशाचे इन्फेक्शन आणि रक्तदाब कमी होतो. याशिवाय काळी मिरी सारख्या औषधिंमुळे शरीरातील संसर्गाचा धोका कमी होतो. (Tea benefits)
ब्लॅक टी
ऑक्सिडाइज्ड पानांपासून बनवलेली ब्लॅक टी तज्ज्ञ अनेक प्रकारे फायदेशीर मानतात. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, हा चहा फुफ्फुसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासोबत स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो. आले, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची यांसारख्या औषधी वनस्पती घालून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय म्हणून, ब्लॅक टीचा वापर केला जाऊ शकतो. (Tea benefits)
ग्रीन टी
ग्रीन टी शरीरासाठी आरोग्यदायी चहाच्या प्रकारांपैकी एक मानली जाते. अनॉक्सिडाइज्ड चहाच्या पानांपासून बनवलेल्या ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हा चहा मेंदूचे कार्य सुधारू शकतो, वजन कमी करण्यात मदत करू शकतो, रक्तातील साखर नियंत्रित करू शकतो, तसेच शरीरात अनेक प्रकारचे गंभीर संक्रमण होण्यापासून रोखू शकतो. ग्रीन टीवरील अभ्यासात तिचे अनेक आरोग्य फायदे सांगितले आहेत.