Tax Free : देशात कर (Tax) भरणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी मानली जाते. भारतात तर इनकम टॅक्स, GST, प्रॉपर्टी टॅक्स यांसारखे अनेक कर भरावे लागतात. पण जगात काही देश असेही आहेत जिथे नागरिक लाखों-कोटींची कमाई करत असले तरी त्यांना कोणताही आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे हे देश नोकरी, बिझनेस किंवा सेटलमेंटसाठी अत्यंत लोकप्रिय होत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे टॅक्स-फ्री देश आणि त्यामागचं कारण काय आहे. (Tax Free )

Tax Free Countries
टॅक्स-फ्री देश म्हणजे नेमकं काय? टॅक्स-फ्री देश म्हणजे जे देश त्यांच्या नागरिकांकडून किंवा काम करणाऱ्या व्यक्तीकडून इनकम टॅक्स आकारत नाहीत. अर्थात याचा अर्थ असा नाही की त्या देशात एकही कर नसतो. काही ठिकाणी VAT, सेवा कर किंवा इतर शुल्क आकारले जातात. पण पगार, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न यावर कोणताही कर लागत नाही. त्यामुळे जास्त कमाई करणाऱ्या लोकांसाठी अशी ठिकाणं स्वर्गाप्रमाणे मानली जातात. (Tax Free )

Tax Free Countries
यूएई (UAE) – कमाईचा स्वर्ग गेल्या काही वर्षांत दुबई, अबूधाबी आदी शहरांमध्ये भारतीयांची संख्या झपाट्याने वाढलीय. कारण अगदी सोप्पं – इथे इनकम टॅक्स शून्य! त्यामुळे जास्त वेतन मिळणाऱ्या नोकऱ्या, व्यापार, रिअल इस्टेट गुंतवणूक यासाठी यूएई हा सर्वात आकर्षक देश मानला जातो. उच्च पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि जागतिक तंत्रज्ञानामुळे इथे काम करण्याची सुवर्णसंधी मिळते. (Tax Free )
कतार, कुवेत आणि ओमान मध्यपूर्वेचे टॅक्स-फ्री हब मध्यपूर्वेत बहुतेक देश तेलसंपत्तीने समृद्ध आहेत. त्यामुळे सरकारचं आर्थिक उत्पन्न तेल निर्यातीवरूनच मोठ्या प्रमाणात मिळतं आणि नागरिकांवर कर लावण्याची गरज राहत नाही. कतार, कुवेत व ओमान हे देश चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, फायदे व करमुक्त उत्पन्नामुळे भारतीय कामगारांसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
बहारीन आणि सौदी अरेबिया संधी आणि करमुक्ती दोन्ही या देशांमध्ये आर्थिक वाढ वेगाने होत आहे. विशेषतः वित्तीय सेवा, आरोग्य आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच पगारावर कर नसल्यामुळे जास्त बचत करता येते. मात्र काही देशांमध्ये स्थानिक नियम कडक असल्याने तिथे राहण्याआधी आणि नोकरी स्वीकारण्याआधी सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे.(Tax Free )
करमुक्त उत्पन्नाचा उलट बाजू
जरी हे सर्व ऐकायला खूप आकर्षक वाटत असलं तरी टॅक्स-फ्री देशांमध्ये राहण्याचे काही तोटेही आहेत.
जास्त महागाई
कठोर कामकाज नियम
नागरिकत्व मिळणं अवघड
सामाजिक सुरक्षा सुविधांची मर्यादा
=======================
हे देखील वाचा :
Post Office : एकदाच गुंतवणूक आणि दर महिन्याला निश्चित इनकम! पोस्ट ऑफिसची कमाल योजना
Loan Guarantor : लोन गॅरंटर होण्यापूर्वी जाणून घ्या हे ५ मोठे धोके; नाहीतर होईल आयुष्यभर पश्चात्ताप!
========================
म्हणूनच तिथे जाण्यापूर्वी तुमच्या करिअर, कुटुंब आणि जीवनशैलीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. इनकम टॅक्स न आकारणारे देश हे कमाई वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी देतात. मात्र सुवर्णसंधी मिळते तिथे काही आव्हानेही असतात. त्यामुळे अशा देशात काम किंवा सेटल होण्यापूर्वी आर्थिक नियोजन आणि माहिती गोळा करणं अधिक फायदेशीर ठरतं.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics.
