बदलते ऋतू आणि फॅशन याकडे नेहमीच लक्ष दिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये टॅटू काढणे किंवा पिअरसिंग करण्याचा ट्रेंन्ड फार वाढला गेला आहे. त्यामुळे बहुतांशजण ट्रेंन्डला फॉलो करण्यासाठी टॅटू किंवा पिअरसिंग करत आहे. मात्र तुम्हाला माहितेय का, पावसाळ्यात तुमची ही फॅशन जीवघेणी ठरू शकते. (Tattoo aftercare tips)
टॅटू काढण्यापूर्वी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तु्म्ही अल्कोहोल किंवा कॅफेनचे अधिक सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आपल्या शरिरातील रक्त पातळ होते. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तर टॅटू काढताना खुप रक्तस्राव अधिक होण्याची शक्यता असते. त्याचसोबत टॅटू काढण्याआधी एक आठवडा तरी भरपूर प्रमाणात पाणी प्या.
पावसाळ्यात टॅटू किंवा पिअरसिंग करण्याचा विचार करत असाल तर थांबा. यामुळे एलर्जी होण्याची खुप शक्यता असते. त्याचसोबत टॅटू काढण्यासाठी जी पर्मेनेंट इंकचा वापर केला जातो त्यात काही रसायने मिक्स केली जातात. यामधील रसायन काही वेळेस अचनाक रिअॅक्शन करू शकतात. मात्र टॅटूवर जखम किंवा खाज येण्याच्या स्थितीत त्याची इंक ही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
अशी घ्या काळजी
-टॅटू स्वच्छ आणि ओलसर होऊ देऊ नका
पावसाळ्यात सर्वात प्रथम टॅटू संदर्भात लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, तो स्वच्छ आणि ओलसर होऊ न देणे. पावसाळ्यात ओलसरपणा अधिक वाढला जातो. त्यामुळे बॅक्टेरिया ही अशा वातावरणात वाढले जातात. अशातच त्यांचा टॅटूशी संपर्क आला तर तुम्हाला संक्रमण होण्याची शक्यता अधिक असतो.
-बँडेज काढू नका
टॅटूवर लावण्यात आलेले बँडेज जवळजवळ ३ तास काढू नका. यामुळे तुमची त्वचा सुरक्षित राहिल आणि कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन सुद्धा होणार नाही. यामुळे टॅटू हिल होण्यास मदत होईल. त्याचसोबत ती बँन्डेड काढल्यानंतर टॅटूचा भाग अधिक ओलसर होणार नाही याची काळजी घ्या. (Tattoo aftercare tips)
-हात स्वच्छ ठेवा
टॅटू काढल्यानंतर एका आठवड्यापर्यंत टॅटू्ला वारंवार स्पर्श करू नका. तसेच स्वच्छ हात धुत रहा. कारण आपली त्वचा अधिक संवेदनशील असते. यामुळे एलर्जी आणि इंन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
-मॉइश्चराइजर लावा
टॅटू काढल्यानंतर तु्म्हाला नेहमीच एखादे लोशन किंवा पेट्रोलियम जेली लावण्यास सांगितले जाते. कारण त्याला मॉइश्चराइज केले नाही तर तेथील जागा सुकून खाज येण्याची अधिक शक्यता असते.
हेही वाचा- Skin Cancer Symptoms: शरीरावर अचानक आलेला तीळ किंवा मस त्वचेचा कर्करोग तर नाही? जाणून घ्या अधिक
या व्यतिरिक्त टॅटू काढल्यानंतर स्विमिंग करणे किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. यामुळे सुद्धा नुकसान पोहचू शकते. त्यामुळे कमीतकमी तीन आठवडे तरी तु्म्हाला सांगिललेल्या सुचनांचे पालन करण्यास विसरु नका.