Tatkal Passport Service- भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांना तत्काळ सेवेमुळे खुप फायदा होता. त्याचप्रमाणे पासपोर्टसाठी सुद्धा आता तत्काळ पासपोर्ट दिला जाणार असल्याची सुविधा ही प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टचे अर्ज लवकरात लवकर मान्य करण्यासंदर्भात सुविधा घेऊन आले आहे. या सुविधेमुळे अशा प्रवाशांचा फायदा होणार आहे ज्यांना तत्काळ प्रवास करण्याची गरज भासते आणि कमी वेळात सुद्धा पासपोर्ट मिळवायचा असतो.तत्काळ पासपोर्ट हा एका सामान्य पासपोर्टसारखाच असतो. परंतु एखाद्या कारणास्तव तातडीने पासपोर्ट हवा असेल तर त्याला प्रथम त्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर काही शुल्क देऊन तुम्हाला तीन दिवसात पासपोर्ट हा दिला जातो.
तत्काळ पासपोर्ट मिळवण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी
-पेमेंटची प्रोसेस
नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तत्काळ पासपोर्ट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यावेळी पेमेंटसाठी तुम्हाला नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि एसबीआय बँक चलानच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट गेटवेच्या माध्यमातून करता येऊ शकते.
-तत्काळ पासपोर्टसाठी लागणारी महत्वाची कागदपत्र
ऑनलाईन तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतात. त्यानुसार वेरिफिकेशन प्रमाण पत्र, मतदान कार्ड, राशन कार्ड, शस्र परवाना, जन्म दाखला, तुमचा फोटो, रेल्वे आयडी, पॅन कार्ड, स्वतंत्रता सेनानी आयडी (जर असेल तरच) अशी एकूण कागदपत्र द्यावी लागतात.
हे देखील वाचा- DigiYatra App च्या माध्यमातून करता येणार विमानाने पेपरलेस तिकिटाचा प्रवास

तत्काळ पासपोर्टसाठी कसा अर्ज कराल?
-प्रथम पासपोर्ट विभागाची अधिकृत वेबसाइट https://passportindia.gov.in येथे भेट द्या
-पासपोर्ट सर्विसच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितले जाईल
-आपला आयडी आणि पासवर्डसह पोर्टलवर लॉग इन करा
-स्क्रिनवर तुम्हाला फ्रेश आणि री-इश्यू असे दोन ऑप्शन दिसतील. त्यामधील अॅप्लीकेबलचचा ऑप्शन निवडा
-या व्यतिरिक्त दिल्या गेलेल्या योजनेच्या प्रकाराअंतर्गत तत्काळ हा ऑप्शन दिसेल त्यावर क्किल करा
-आता अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा आणि संपूर्ण डिटेल्स भरा
-फॉर्म सबमिट करण्यासाठी पुढे जा
-ऑनलाईन पेमेंट केल्याच्या रिसिप्टची सुद्धा प्रिंट घ्या
-पुढील प्रोसेससाठी तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये तुमची अपॉइंटमेंट बुक करा. (Tatkal Passport Service)
पुढील लोक बनवू शकत नाहीत तत्काळ पासपोर्ट
परराष्ट् मंत्रालायाच्या पासपोर्ट विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुढील चार कॅटेगरीत येणाऱ्या भारतीयांना तत्काळ योजनेअंतर्गत पासपोर्ट बनवता येणार नाही.
-परदेशात जन्मलेले असे नागरिक ज्यांचे पालक भारतीय आहेत
-असा व्यक्ती ज्याला परराष्ट्र मंत्रालयाद्वारे रजिस्ट्रेशन आणि दुसऱ्या पद्धतीने भारतीय नागरिकता दिली गेली आहे
-असा अर्जदार ज्याला सरकारच्या खर्चामुळे भारतात आणले आहे
-अर्जदाराला भारत/आपत्कालीन सर्टिफिकेट केसमध्ये प्रत्यार्पित केलेले आहे