रेल्वेच्या तत्काळ सेवेत प्रवाशांना किती मदत मिळते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तत्काळ सेवा ऐवढी लोकप्रिय झाली आहे की, रेल्वेने प्रीमियम तत्काळ सेवेचा ऑप्शन देण्यास ही काही ठिकाणी सुरुवात केली आहे. अशातच तत्काळचा फायदा भारत सरकारने पासपोर्ट बनवणाऱ्यांना सुद्धा घेता येईल असे जाहीर केले आहे. या प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला पासपोर्ट प्रथम दिला जातो आणि नंतर वेरिफिकेशन केले जाते. (Tatkal Passport)
परराष्ट्र मंत्रालयाने गेल्याच वर्षात पासपोर्ट अर्जांवर तत्काळ उपाय काढण्यासाठी हा नवे नियन बनवले होते. त्याला तत्काळ प्लॅन असे नाव दिले गेले. यामध्ये त्या लोकांना फार मदत मिळाली ज्यांना अगदी लवकरात लवकर प्रवास करायचा होता आणि त्यासाठी पासपोर्टची गरज होती. आता पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. विभागानुसार, जसा तुमचा अर्ज स्विकारला जाईल त्याच्या तीन दिवसातच तुम्हाला पासपोर्ट दिला जाईल.
महत्वाची कागदपत्र
वेबसाइटवर तुम्हाला कागदपत्रांची एक लिस्ट दिली जाते. त्यामधअये एनेक्सर एफ अंतर्गत वेरिफिकेशन सर्टिफिकेट, मतदान कार्ड, शस्र परवाना, रेशन कार्ड, जन्म प्रमाण प्रत्र, गॅस कनेक्शन बिल, बँक पासबुक, वाहन परवाना, सर्विस फोटो आयडेंटिटी, विद्यार्थी आयडी, प्रॉपर्टी कागदपत्र, पेंन्शन कागदपत्र, पॅन कार्ड, रेल्वे आयडी आणि एससी/एसटी/ओबीसी सर्टिफिकेट.(Tatkal Passport) )
दरम्यान, तुम्ही या सर्व कागदपत्रांपैकी कोणतीही तीन कागदपत्र सादर करु शकता. पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटनुसार, तुमचे वय १८ पेक्षा कमी असेल तर तुम्हाला दोन कागदपत्र जमा करावे लागतात. परंतु तत्काळ मध्ये ३५ पानांचा पासपोर्ट तयार केला जातो. तसेच तुमचे वय १८ पेक्षा अधिक असेल तर तु्म्हाल ३५०० रुपये खर्च करावे लागतील अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला आणखी काही महत्वाची ही माहिती मिळेल.
हे देखील वाचा- आपल्या देशातच आहे ‘या’ ठिकाणी स्विझरलॅंड….
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा कराल?
-सर्वात प्रथम पासपोर्ट विभागाची अधिकृत वेबसाइट https://passportindia.gov.in/ website येथे भेट द्या
-आता पासपोर्ट सेवेच्या पोर्टलवर रजिस्टर करा
-आयडी पासवर्ड जो रेजिस्ट्रेशनवेळी तयार केला आहे त्याने लॉग इन करा
-फ्रेश किंवा रीइश्यू मधील एक ऑप्शन निवडा.
त-स्किम टाइप प्लाइन अंतर्गत दिलेला तत्काळ ऑप्शन निवडा
-आता अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि अर्ज भरा
-फॉर्म सबमिट करा आणि पेमेंट करा
-ऑनलाईन पेमेंटची रिसिप्ट प्रिंट करुन तुमच्याकडे ठेवा
-त्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करा.