Tata Flight Booking App : विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचा विचार करत असल्यास टाटा कंपनीने नवा अॅप आणला आहे. याच्या मदतीने विमानाचे तिकीट घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासाठी काय करावे आणि अॅपबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टाटा डिजिटल
Tata Neu नावाने एक अॅप लाँच करण्यात आला होता. यामध्ये काही शानदार फीचर्स युजर्सला दिले जाता. याची वेबसाइट देखील आहे. याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही सुविधेचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला विमानाचे तिकीट बुकिंग करायचे असल्यास सर्वप्रथम वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला विमान प्रवासाचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही विमान प्रवासाचे तिकीट बुक करु शकता.
दरम्यान, Tata Neu Credit Card असल्यास तुम्हाला अधिक उत्तम ऑफर्स मिळू शकतात. याशिवाय डिस्काउंटही दिला जाऊ शकतो. या अॅपची खासियत अशी की, याचा Interface खूप चांगला आहे. म्हणजेच तुम्हाला तिकीट बुकींग अगदी सोप्या पद्धतीने करता येते. (Tata Flight Booking App)
असे करा विमानाचे तिकीट बुक
विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फ्लाइट्सच्या ऑप्शनमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला कोठून ते कुठ पर्यंत प्रवास करायचा आहे याची माहिती द्यावी लागेल. यानंतर फ्लाइट्सची सविस्तर माहिती दाखवली जाईल. अशातच तुमच्या सोयीनुसार फ्लाइटचे तिकीट बुक करु शखता. येथे पेमेंट आणि ऑफर्स देखील दाखवल्या जातील. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास वेगळा डिस्काउंटही दिला जाईल.