आजच्या काळात प्रत्येक घरात एक कार आपल्याला दिसते. पूर्वी कार घेणे खूपच अवघड वाटायचे मात्र आज मनात आणले तर कार घरात अशी परिस्थिती आहे. आजच्या काळात कार घेणे मोठी गोष्ट उरलेली नाही. अनेकांना तर कारचे वेडच असते. त्यामुळे असे लोकं सतत कार बदलत असतात. आज कारमध्ये देखील अनेक लक्झरी ऑप्शन ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कंपन्या देखील ग्राहकांची मागणी, कंफर्ट, सोयी, गेज आदींनुसार आपल्या कारमध्ये बदल करत नवनवीन व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करत असतात.(Tata Altroz)
गाडीचे येणारे प्रत्येक व्हर्जन हे जुन्या व्हर्जनपेक्षा अधिक चांगले आणि मॉडर्न असते. ग्राहक देखील आपल्या गरजेनुसार गाडी निवडण्यास प्राधान्य देतात. मधल्या काही काळापासून एका गाडीची मार्केटमध्ये कमालीची चर्चा सुरु होती. ही गाडी म्हणजे Tata Altroz Facelift. टाटा मोटर्स कंपनीने ऑल-न्यू अल्ट्रोजच्या लाँच केली. आकर्षक डिझाइन, लक्झरीअस इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्ट्यांनी ऑल-न्यू अल्ट्रोज सुसज्ज आहे. या गाडीची सुरूवातीची किंमत ६.८९ लाख रूपये आहे. पाहूया या कारची काही वैशिष्ट्ये. (Latest Marathi News)
> पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच अल्ट्रोजमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पॉवरट्रेन व्यतिरिक्त, या कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ही कार ड्यून ग्लो, एम्बर ग्लो, रॉयल ब्लू, प्युअर ग्रे आणि पांढरा रंग या ५ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच एएमटी गिअरबॉक्सची सुविधा मिळेल. (Top Marathi Headlines )
> अल्ट्रोजमध्ये नवीन सॉफ्ट-टच डॅशबोर्डसह नवीन लेआउट देण्यात आले आहे. 10.25-इंचाची Harman कडून तयार केलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम यात Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह मिळणार आहे. तसंच 10.25-इंचाचा फुल डिजिटल HD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यामुळं इंटिरियर अधिक प्रीमियम दिसत आहे. (Todays Marathi News)
> अल्ट्रोज ही भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे जी 1.2 लिटर पेट्रोल (मॅन्युअल, डीसीए, नवीन एएमटी), 1.2 लिटर आयसीएनजी (ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानासह) आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह येते. 5 स्टार सुरक्षेसह, अल्ट्रोझ अजूनही ALFA आर्किटेक्चरवर बनलेली भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक आहे. यात 6 एअरबॅग्ज आणि ESP आहेत. (Latest Marathi Headline)
> नवीन अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील आहे ज्यावर ग्लॉस-ब्लॅक पॅनेलमध्ये इल्यूमिनेटेड टाटा लोगो आहे. त्यात स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग क्रूझ, ऑडिओ आणि फोन कॉल सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. (International News)
> अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये पुल-टाइप फ्रंट डोअर हँडल्सऐवजी टाटा कर्व्हसारखे फ्लश-टाइप डोअर हँडल्स आहेत, ज्यात इल्युमिनेशन आहे. मागील बाजूस, टाटा कारमध्ये पूर्वीप्रमाणेच सी-पिलर-माउंट केलेले दरवाजाचे हँडल कायम आहेत.
> अल्ट्रोझ कारमध्ये सेफ्टीसाठी, कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP, सनरूफ, 3 पॉइंट सीट बेल्ट, फ्लश डोअर हँडल, ऑल डोअर पॉवर विंडो, 16 इंच टायर्स, एलईडी टेल लॅम्प, स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग व्हील, प्रोजेक्टर हेडलॅम्प, पुश स्टार्ट बटण आणि पूर्णपणे नवीन इंटीरियर असेल. यावेळी नवीन अल्ट्रोज पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहे. (Social News / Updates)
> शिवाय या कारमध्ये 360° कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरसोबतच व्हॉइस कमांड ऑपरेटेड इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल 65W टाइप-सी फास्ट चार्जिंग, एअर प्युरिफायर्स आणि एक्सप्रेस कूलिंग आणि आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी – 50+ फीचर्स देण्यात आले आहेत.
===========
हे देखील वाचा : Sarah and Yaron : बुंदुकीच्या दोन गोळ्यांनी संपवली एक प्रेमकहाणी !
===========
अल्ट्रोझ कारच्या किंमती :
पेट्रोल एमटी स्मार्ट: ₹ ६.८९ लाख
पेट्रोल एमटी प्युअर: ₹ ७.६९ लाख
पेट्रोल एमटी क्रिएटिव्ह: ₹ ८.६९ लाख
पेट्रोल एमटी पूर्ण झाले : ₹ ९.९९ लाख
पेट्रोल-सीएनजी एमटी स्मार्ट: ₹ ७.८९ लाख
पेट्रोल-CNG MT शुद्ध: ₹ 8.79 लाख
पेट्रोल-सीएनजी एमटी क्रिएटिव्ह: ₹ ९.७९ लाख
पेट्रोल-सीएनजी एमटी पूर्ण झाले : ₹ ११.०९ लाख
डिझेल एमटी प्युअर: ₹ ८.९९ लाख
डिझेल एमटीने पूर्ण केलेली एस: ₹ ११.२९ लाख