Home » राजस्थानच्या मिर्ची बड्याचा स्वाद लंडनमध्ये

राजस्थानच्या मिर्ची बड्याचा स्वाद लंडनमध्ये

by Team Gajawaja
0 comment
Chili Pepper
Share

राजस्थानची खाद्य संस्कृती मोठी स्वादिष्ठ आहे. राजस्थानी थाळी म्हटल्यावर पहिला येतो तो दाल बाटी चूरमा, गट्टे की सब्जी, लाल मास, मावा कचोरी,  कांदा – टोमॅटो भाजी, शेव भाजी, ज्वारीच्या छोट्या भाक-या, कांद्याची कचोरी,  दह्याची कडी आणि या सर्व चवींमध्ये सरस ठरतो मिरची बडा (chili pepper).  हा मिरची बडा नसेल तर राजस्थानी थाळी अपूर्ण मानण्यात येते.  मोठ्या मिरच्यांमध्ये उकडलेला बटाटा आणि भरपूर असे मसाल्यांचे मिश्रम चण्याच्या पिठात डूबवून तळण्यात येतं.  पहिल्यांदा अगदी सामान्य वाटणारा हा मिरची बडा एखदा का चाखला की त्याच्या चवीची वाहवा केल्याशिवाय अस्सल खवय्या पुढे जाऊच शकत नाही. राजस्थानच्या प्रत्येक शहरात हा मिरची बडा अगदी नाक्या नाक्यावर बनवला जातो. मारवाडच्या जेवणाची शान म्हणून त्याची ओळख आहे.  आता हाच मिरची बडा (chili pepper) लंडनमध्येही  तेवढाच प्रसिद्ध झाला आहे.  लंडनमध्ये चक्क मिरचीबडा फेस्टिवलच साजरा होतो. यात राजस्थानमधील कुटुंब एकत्र येत आपल्या देशातला हा भन्नाट पदार्थ करतात आणि इतरांनाही खाऊ घालतात.  लंडनचे नागरिकही या मिरची बड्याच्या प्रेमात पडले आहेत.  

मारवाडच्या जेवणाची स्वतंत्र अशी ओळख आहे.  राजस्थानच्या जोधपूरमध्ये होणा-या मिरची बड्याची रेसिपी अनोखी आहे. याच जोधपुरी मिरची बड्यानं आता लंडनमध्ये,  सातासमुद्रापार आपल्या चवीचा ठसा उमटवला आहे. राजस्थानचा हा मिरची बडा (chili pepper)लंडनमध्ये मिळत आहे.  काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये मिरचीबडा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतीयांसह लंडनचे नागरिकही मिरची बड्याचा स्वाद घेण्यासाठी मोठ्यासंख्येनं सहभागी झाले होते. लंडनमध्ये जोधपूरपासून सुमारे साडेसहा हजार किमी दूर रहाणा-या राजस्थानी कुटुंबांनी एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा केला. राजस्थान असोसिएशन ऑफ युनायटेड किंगडम या राजस्थानी प्रवासी संघटनेच्या पुढाकाराने हा मिरची बडा फेस्टिवल आयोजित केला होता.

या मिरची बडा (chili pepper) उत्सवासाठी 300 हून अधिक राजस्थानी कुटुंब एकत्र आली होती.  त्यांनी एकत्र येत आपल्या देशातील या लोकप्रिय पदार्थाला बनवले.  या मिरची बडाचे वितरणही तसेच अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं.  मिरची बडासोबत गोडी बुंदी खाल्ली जाते.लंडनमध्ये मिरची बडा फेस्टिवल  करणा-या राजस्थानी कुटुंबांनी ही बुंदीही बनवली.  मग या मिरची बडा आणि बुंदीची पाकीटं तयार करण्यात आली. ही पाकीटं लंडनहून केंब्रिज, ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम येथे पाठवण्यात आली. भारतीयांसोबतच त्यांच्या परदेशी मित्रांनीही ही मिरची बडे-बूंडी चाखली आणि त्याच्या चवीला दाद दिली.

=========

हे देखील वाचा : चहा गरम करताना सावधान…

=========

लंडनमध्ये राहणाऱ्या जोधपूर आणि मारवाडमधील लोकांनी आपल्या खाद्यसंस्कृतीला कायम पहिलं स्थान दिलं आहे.  त्यातूनच या मिरची बडा फेस्टिवलची कल्पना पुढे आली. मिरचीबाडा फेस्टिव्हल  काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला.आता हा फेस्टिवल लंडनमधील प्रवासी भारतीयांसह लंडनमधील लोकांचा आवडता झाला आहे. कोरोनाच्या काळात मदत म्हणून घरोघरी मिरची बडाचे (chili pepper) वाटप करण्यात आले होते.  राजस्थान असोसिएशन ऑफ यूकेचे स्वयंसेवक अतिशय पद्धतशीरपणे या महोत्सवाचे आयोजन करतात.  त्यासाठी नोंदणी एक महिना अगोदर केली जाते.  त्यात नोंद केलेली कुटुंब एकत्र येत मिरची बडा आणि बुंदी तयार करतात.  मग या मिरचीबडा आणि बूंडीची पाकिटे तयार करून बर्मिंगहॅम, केंब्रिज, ऑक्सफर्ड, वॅटेज, रीडिंग, स्विंडन, न्यूबरी, स्लो, विंडसर, कोलचेस्टर, चेम्सफोर्ड, केंट येथील नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्यात येतात.  

मिरची बडा (chili pepper) हा राजस्थानचा एक प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहे.  सकाळी रोज हा नाश्ता येथील प्रत्येक हॉटेलमध्ये केला जातो.  तसेच घरातही मिरचीबडा केला जातोच.  विशेष करुन थंडीच्या दिवसात घराघरात हा मिरचीबडा केला जातो. मिरचीबडा करतांना मिरच्यांमध्ये बटाटा आणि मसाला भरून बेसन पिठात टाकून त्यांना सोनेरी होईपर्यंत तळले जाते. कोथिंबीर पुदिना चटणी आणि मसाला चहा सोबत असे मिरचीबडे मग खाल्ले जातात.   आपल्या शहरातील आवडीचा पदार्थ दुस-या देशात तेवढ्याच आवडीनं बनवायचा आणि ते इतरांनाही खाऊ घालायचा यालाच खाद्यसंस्कृतीवरील प्रेम म्हणतात.  राजस्थानच्या खवय्यांनी आपली खाद्यसंस्कृती अशापद्धतीनं परदेशातही जपली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.