Home » Tanushree Dutta : Me Too नंतर तनुश्री दत्ता करते त्रासाचा सामना, रडत सांगितली आपबिती

Tanushree Dutta : Me Too नंतर तनुश्री दत्ता करते त्रासाचा सामना, रडत सांगितली आपबिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tanushree Dutta
Share

आशिक बनाया आपने या सिनेमातून रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या इंडस्ट्रीमधून गायब आहे. मध्ये काही वर्षांपूर्वी तिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत शोषणाचा आरोप केला होता. तेव्हा ती खूपच गाजली, मात्र मधली काही काळापासून तनुश्री लाइमलाईटपासून खूपच दूर होती. पण आता अचानक तनुश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ. (Marathi News)

हो…सध्या तनुश्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच रडताना दिसत आहे. तनुश्रीने सांगितले की, तिला तिच्याच घरात त्रास दिला जातोय आणि यामुळे त्रस्त होऊन तिने पोलिसांना बोलावले. या व्हिडिओमध्ये तनुश्री दत्ताने लोक तिच्या घराबाहेर येतात आणि तिला त्रास देतात. तिने ओरडून ओरडून लोकांना मदत करण्याची विनंती केली असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्याच घरात तिला मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत तिला मदतीची गरज आहे असे देखील तिने म्हटले आहे. (Todays Marathi Headline)

व्हिडिओमध्ये तनुश्री म्हणते की, “मला माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. मी नुकताच पोलिसांना फोन केलाय, मी निराशेतून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय, जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही. (Bollywood News)

मला एवढा त्रास देण्यात आला आहे की, मागील ४ ते ५ वर्षांत, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही… त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आला आहे. ते यायचे आणि माझ्या घरामध्ये चोरी करुन निघून जायचे… मला सर्व कामं स्वतःच करावी लागत आहेत… मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे… प्लीज कुणीतरी माझी मदत करा…” (Celebrity News)

तनुश्रीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी या छळाला कंटाळलेय. २०१८ च्या ‘Me Too’ पासून हे सुरू आहे. आज, कंटाळून मी पोलिसांना फोन केला. कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा.” आता तिच्या या व्हिडिओवर पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. (Top Stories)

============

हे देखील वाचा : Saiyaara : चारच दिवसात ‘सैयारा’ची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

============

दरम्यान २०१३ मध्ये एका मुलाखतीत तनुश्री दत्ताने सांगितले होते की, ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी तिला एक विचित्र नृत्य करण्यास भाग पाडले गेले होते, जे तिच्या कराराचा भाग नव्हते. तनुश्री दत्ताने आधी नाना पाटेकर आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले होते. तिने आरोप केला होता की, ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटात एक विचित्र नृत्य करण्यास तिला भाग पाडलं गेलं. एका मोठ्या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, तनुश्रीने सांगितले होते की, नाना पाटेकर यांच्या वर्तनामुळे ती सेटवर अस्वस्थ वाटत होते. तनुश्री दत्ता यांनी आशिक बनाया आपने, चॉकलेट: डीप डार्क सीक्रेट्स, 36 चायना टाउन, भागम भाग, रिस्क, रकीब, ढोल, गुड बॉय बॅड बॉय, सास बहू और सेन्सेक्स, अपार्टमेंट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.