Home » समुद्रातील ‘या’ मंदिराची सुरक्षा करतात साप

समुद्रातील ‘या’ मंदिराची सुरक्षा करतात साप

by Team Gajawaja
0 comment
tanah-lot-temple
Share

आपल्या देशातच नव्हे तर जगात सुद्धा अशी काही मंदिर आहेत जी शेकडो वर्ष जुनी आहेत. या मंदिरांमागील काही ना काहीतरी कथा किंवा रहस्य आहेत. अशातच आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत जे समुद्रात तयार करण्यात आलेले आहे. याची सुरक्षा चक्क साप करतात. या मंदिराची निर्मिती ६०० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही सापांकडे आहे. हे मंदिर इंडोनेशियातील समुद्रात आहे. तनाह लोत मंदिराने ते फार प्रसिद्ध आहे.(Tanah Lot Temple)

हे मंदिर समुद्रातील एका पर्वतावर आहे. असे सांगितले जाते की, या जेथे हे मंदिर आहे तेथे हजारो वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याच्या भरती-अहोटीने काही भाग खचला गेला आहे. त्यचसोबत मंदिरासंदर्भात काही कथा सुद्धा आहेत. इंडोनेशियातील बाली बेटावर हे मंदिर आपल्या सौंदर्यासाठी फार प्रसिद्ध आहे. स्थानिक भाषेत तनाह लोत याचा अर्थ समुद्र भुमी किंवा समुद्रात जमीन असा होतो.

tanah-lot-temple
tanah-lot-temple

खरंतर मंदिर बाली बीचच्या त्या सात मंदिरांपैकी एक आहे ज्याची निर्मिती एका श्रृंखलेच्या रुपात करण्यात आले होते. या मंदिराचे सर्वाधिक मोठे रहस्य असे की, प्रत्येक मंदिर हे पहिल्या मंदिरातून अधिक स्पष्टपणे दिसते. या मंदिराची निर्मिती ज्या खडकातून केला गेला होता तो १९८० च्या दशकात कमजोर होऊ लागला होता. मात्र नंतर जापानच्या सरकारने याला सुरक्षित करण्यासाठी इंडोनेशियाची मदत केली. त्यानंतर त्याचा एक तृतीयांश हिस्सा कृत्रिम खडकाने झाकला गेला आणि त्याला नवे रुप दिले गेले.

असे मानले जाते की, या मंदिराची निर्मिती १५ व्या शतकात निरर्थ नावाच्या एका पुजाऱ्याने केली होती. हा पुजारी समुद्राच्या तटावरुन किनाऱ्या-किनाऱ्याने चालत येथे आला होता. त्यानंतर त्याने येथे मंदिर उभारण्याचा निश्चय केला. कारण पुजाऱ्याला तेथील ठिकाणाचे सौंदर्य फार आवडले गेले.(Tanah Lot Temple)

हेही वाचा- तालिबान आणि बुद्ध मुर्ती

असे सांगितले जाते की, त्या रात्री पुजारी तेथेच राहिला. सकाळी झाल्यानंतर पुजाऱ्याजवळ असलेल्या मच्छिमारांनी येथे समुद्र देवतेचे मंदिर उभारण्यास विरोध केला. परंतु असे म्हटले जाते की. वाईट आत्मा आणि वाईट लोकांपासून या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या शिलेखाली राहणारी विषारी साप याची सुरक्षा करतात. तर पुजारी निरर्थने आपल्या शक्तीने एक विशाल समुद्री साप निर्माण केला होता. जो आज पर्यंत या मंदिराची सुरक्षा करतो असे मानले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.