पॅन कार्ड बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचा वापर ही काही शासकीय कामांसाठी केला जातो. मात्र तुम्ही टॅन कार्ड (TAN Card) बद्दल ऐकले आहे का? काहींना पॅन कार्ड आणि टॅन कार्ड मधील फरक कळत नाही आणि ते दोन्ही एकच असल्याचे मानतात. दरम्यान, ते दोन्ही वेगवेगळी कार्ड आहेत. याचा वापर ही वेगळ्या कारणास्तव केला जातो. अशातच आम्ही तुम्हाला टॅन कार्ड म्हणजे काय याच बद्दल सांगणार आहोत.
पॅन कार्ड बँकिंग संदर्भातील गोष्टींसाठी केला जातो. ते इनकम टॅक्स विभागाकडून जारी केले जाते. हे विशेष रुपात नोकरदार लोकांसाठी महत्वाचे असते. इनकम टॅक्स डिपार्टमेंट पॅन कार्डच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यावर नजर ठेवतात. मात्र टॅन कार्ड हे यापेक्षा फार वेगळे असते.
टॅन कार्ड म्हणजे काय?
टॅन कार्डवर सुद्धा पॅन प्रकारे एक १० अंकांचा अल्फान्युमेरिक कोड असतो. यामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडूनच दिले जातो. टॅनचा अर्थ Tax Deduction and Collection Account Number असा आहे. हे अशा लोकांसाठी फार महत्वाचे आहे जे टॅक्समध्ये कपात किंवा त्यामध्ये जमा करतात. सोप्प्या शब्दात बोलायचे झाल्या, पॅन टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी असते. तर टॅन कार्ड हे टॅक्स कापणाऱ्यांसाठी असते. अशी लोक जी एखाद्या कामाच्या बदल्यास पैसे देतात तर त्यांची जबाबदारी असते की, ते टॅक्स कापनू पैसे देतील. यासाठी कॅटेगरी बनवण्यात आली आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या लोकांना किंवा कंपन्यांसाठी टॅन बनवणे गरजेचे असते.
टॅन कार्ड हे पॅन कार्डपेक्षा कसे वेगळे आहे?
जी लोक इनकम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड तयार केले जाते. तर ज्यांचा टॅक्स कापला जातो किंवा जमा होते त्यांच्यासाठी टॅन क्रमांक असणे गरजेचे आहे. पॅनचा अर्थ परमनेंट अकाउंट क्रमांक. तर टॅनचा अर्थ टॅक्स डिडक्शन अकाउंट क्रमांक आहे. डीटीएसच्या संबंधित सर्व कागदपत्र आणि इनकम टॅक्स विभागाकडून टीडीएस संबंधित सर्व प्रकारच्या टॅन क्रमांकाचा उल्लेख करणे जरुरीचे असते. (TAN Card)
हे देखील वाचा- देशात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली होती?
टॅन कार्डसाठी कशा प्रकारे करु शकता अर्ज?
टॅन कार्डसाठी तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तर टॅनसाठी तुम्हाला फॉर्म 49B भरावे लागणार आहे. त्याचसोबत तुम्हाला ६२ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा नेट बँकिंगपैकी कोणताही ऑप्शन निवडू शकता.