तमिळनाडूच्या राजकरणात सरकार आणि राज्यपाल आरएन रवि यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. वादाचे कारण म्हणजे राज्याचे नाव. राज्यपालांनी नुकत्याच सदनात आपल्या अभिभाषणात राज्याचे नाव तमिळनाडू ऐवजी तमिझगम असल्याबद्दल बोलले. त्यांच्या याच विधानावरुन सत्तेत असलेल्या DMK आणि त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेस आणि विदुथलाई चिरुथिगाल काची (VCK) यांनी विरोध करत गदारोळ सुरु केला. घोषणेदरम्यान, राज्यपालांनी आपले अभिभाषण मधेच थांबवले आणि सदन सोडून बाहेर निघून गेले. अभिभाषणानंतर सत्तारुढ दलांनी त्यांच्यावर एकामागोमाग एक आरोप लावण्यास सुरुवात केली. हे प्रकरण थांबलेले नाही. (Tamil Nadu controversy)
त्यानंतर पुन्हा रस्त्यांवर ‘गेट आउट रवि’ असे पोस्टर्स लावले गेले. टीपीडीक्या कार्यकर्त्यांनी कोयंम्बटूर मध्ये राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले. राजकीय पक्षांनी केंद्राला राज्यपाल आरएन रवि यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी राज्यपालांचा पुतळा ही दहन केला.
पक्षाचा आरोप आणि राज्यपालांचा तर्क
राज्यपालांच्या अपूर्ण अभिभाषणानंतर पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यपालांवर काही आरोप लावले. असे म्हटले गेले की, राज्यपाल राज्यभवनातून राज्यात RSS आणि भाजपचा अजेंडा लागू करत आहेत. आम्ही असे कधीच होऊ देणार नाही. खरंतर राज्यपालांकडे तमिळनाडूसह नागालँन्डचा ही प्रभार आहे. त्यामुळे पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधत असे म्हटले की, नागालँन्ड सारखा चतुरपणा येथे चालणार नाही.
डीएमके यांनी प्रश्न उपस्थितीत केला आङे की, राज्यपालांकडे राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार आहे का आणि ते सुद्धा कोणत्याही कारणाशिवाय? राज्यपालांचे असे म्हणणे आहे की, ५० वर्षांमध्ये द्रविड दलाने राज्याच्या जनतेसोबत फसवणूक केली आहे.
‘नाडु’ शब्दात असे काय आहे ज्यामुळे वाद निर्माण झालायं
राज्याचे नाव तमिळनाडू आहे. मात्र राज्यपालांनी त्याचा उल्लेख तमिझगम करत ते ठेवण्याचे म्हटले. नाडू शब्दाचा अर्थ असा होतो की, जमीन, इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, तमिळच्या इतिहासाची चुकीची व्याख्या आणि भाषांतरणात असलेल्या तफावतीमुळे नाडु शब्दाचा अर्थ देशा किंवा राष्ट्र-राज्य असा झाला आहे. अशा प्रकारे येथे राज्याला तमिळ राष्ट्रवादाच्या रुपात पाहिले जाते. जेव्हा राज्यपालांनी यामध्ये बदल करण्याबद्दल सांगितले तेव्हा राजकीय पक्षांना ते पटले नाही.(Tamil Nadu controversy)
राज्यपालांनी यापुर्वी सुद्धा ४ जानेवारीला राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ही त्यांनी आपला हा विचार मांडला होता. तेव्हा त्यांनी असे म्हटले होते की, तमिळनाडू बद्दल एक वेगळाच विचार निर्माण झाला आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट पूर्ण देशात लागू होते तेव्हा तमिळनाडूा उत्तर ‘न’ असे असते. यावर खुप काही लिहिले सुद्धा गेले आहे ते चुकीचे आहे. हा विचार बदलला पाहिजे. सत्याचा विजय होईल.
हे देखील वाचा- ‘या’ देशाचे झाले खायचे वांदे…
पोंगलच्या निमंत्रणावर ही घोळ
नावावरुन सुरु झालेला वाद थांबत नाही आहे. कारण राजभवनाकडून राजकीय पक्षांना पाठवण्यात आलेल्या पोंगलच्या निमंत्रणावरुन ही वाद सुरु झाला आहे. त्यावर आरएन रवि यांनी तमिझगमचे राज्यपाल असे लिहिले आहे. त्यामध्ये तमिळनाडूचा उल्लेख करण्यात आलेला नाही. CPM खासदार वेंकटेशन यांनी याचा ट्विट करत विरोध केला. त्याचसोबत टीपीडीके यांनी राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी ही केली.