Home » ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे अमेरिकेन आर्मीमध्ये वकील

ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे अमेरिकेन आर्मीमध्ये वकील

by Team Gajawaja
0 comment
अकिला नारायणन (Akila Narayanan)
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धानं अवघ्या जगावरच युद्धाचे ढग जमा झाल्यासारखे वातावरण आहे. या युद्धानं तिसरं महायुद्ध भडकलं, तर किती भयानक वातावरण निर्माण होईल याची झलक जगाला दिसली आहे. 

या दाहकतेचा अनुभव येत असतानाच तामिळ चित्रपटातील एका अभिनेत्रीनं अनोखा विक्रम केला आहे.  ‘अकिला नारायणन (Akila Narayanan)’ नावाची ही अभिनेत्री चक्क अमेरिकेच्या आर्मीमध्ये वकील म्हणून रुजू झाली आहे. अकिलाची नियुक्ती वकील म्हणून झाली असली तरी तिला सर्व प्रकारचे लष्करी शिक्षण पूर्ण करावे लागले.   

अकिलाला यूएस आर्मी कॉम्बॅट ट्रेनिंग घ्यावे लागले. जगभरातील लष्करी प्रशिक्षणात सर्वात कठिण प्रशिक्षण म्हणून याचा उल्लेख आहे. या कठिण प्रशिक्षणानंतरच तिची एन्ट्री युएस आर्मीमध्ये झाली आहे. अकिलानं अभिनयाला रामराम करुन थेट लष्करी सेवेतच प्रवेश केल्यानं आर्श्चयही व्यक्त होत आहे आणि तिचे कौतुकही होत आहे.   

====

हे देखील वाचा: Russia -Ukraine Crisis: रशिया – यूक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका कोणती?

====

गेल्या वर्षी आलेल्या ‘कादमपरी’ या भयपटातून अकिला नारायणन (Akila Narayanan) हिने तामिळ चित्रपट सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. दिग्दर्शक अरुल यांच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गायब झालेली सुंदर आणि नाजूक अकिला थेट अमेरिकन आर्मीमध्येच सामिल झाल्याची बातमी आली. 

अमेरिकन आर्मीमध्ये सामिल होण्यासाठी अकिला अनेक महिने प्रशिक्षण घेत होती. त्यामध्ये शस्त्र चालवण्याचाही समावेश होता. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अकिला वकील म्हणून अमेरिकन सैन्यात रुजू झाली आहे.

तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये जन्म झालेली अकिला नारायणन (Akila Narayanan) आता अमेरिकेची रहिवासी आहे. 2021 मध्ये कोरोना काळात तिनं ‘कादमपरी’ या चित्रपटात भूमिका केली. अकिला चांगली गायिकाही आहे. ती ऑनलाईन म्युझिक स्कूल चालवते. नाइटिंगले स्कूल ऑफ म्युझिक असं तिच्या स्कूलचं नाव असून सोशल मिडीयात ते चांगले प्रसिद्ध आहे. सोशल मिडीयाबरोबर अकिला अनेक सामाजिक संस्थांबरोबरही काम करते.  

====

हे देखील वाचा: नाटो (NATO) म्हणजे काय आणि त्याची स्थापना कशासाठी करण्यात आली? 

====

अशा अनेक आघाड्यांवर व्यस्त असलेली ही सुंदरी आता अमेरिकी सैन्यामध्ये कायदेविषयक सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहे. भारतीय वंशाच्या अकिलाचे हे यश भारतासाठीही अभिमानास्पद आहे.  आपण ज्या देशात रहातो, त्या देशाच्या सैन्यासाठी काहीतरी करायचे, अशी भूमिका अकिलाची होती.  तिच्या कुटुंबियांनीही तिला या वेगळ्या वाटेवर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सध्या हे सगळे नारायणन कुटुंबिय अमेरिकेमध्ये कौतुकाचा विषय ठरले आहे.  

अकिलाचे अमेरिकेत भलेमोठे कुटुंब आहे. सुमति नारायणन, नारायणन नरसिंगम, ऐश्वर्या नारायणन, सहगर कुंडवादिवेलु, उमा सहगर, आदित्य सहगर, अरविंद सहगर हे तिचे सर्व कुटुंबिय सध्या स्वतःला एका सैनिकाचे कुटुंबिय म्हणवून घेतायत. अकिलाबाबत आपला अभिमान व्यक्त करीत आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.