Home » तमन्ना भाटियाने विराट कोहलीला डेट केले होते?

तमन्ना भाटियाने विराट कोहलीला डेट केले होते?

by Team Gajawaja
0 comment
Tamanna Relationship
Share

बॉलिवूड मधील अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या आपली वेब सीरिज ‘लस्ट स्टोरीज-२’ मुळे चर्चेत आहे. या सीरिजमधून पहिल्यांदाच आपला पार्टनर विजय वर्मा सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. एका प्रमोशनल इंटरव्यू दरम्यान तिने विजय सोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली. सुंदर दिसणाऱ्या तमन्नाचे नाव विजय सोबत जोडण्यापूर्वी भारतीय टीम मधील स्टार क्रिकेटर विराट कोहली सोबत ही जोडले गेले होते. त्यावेळी त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर काहीच रिअॅक्ट केले नव्हते. मात्र या जुन्या अफवांवर आता तमन्नाने मौन सोडले आहे. (Tamanna Relationship)

तमन्ना आणि विराट कोहलीचे नाव एकेकाळी फार चर्चेत आले होते. दोघांनी २०१२ मध्ये एकत्रित एका जाहिरातीत काम केले होते. त्यावेळी या अफवा पसरल्या गेल्या होत्या. आता लस्ट स्टोरीज-२ च्या अभिनेत्रीने यावर उत्तर दिले आहे. तिने एबीपी सोबत बोलताना असे म्हटले की, जाहिरात शूट करताना तिने विराट कोहलीला चार गोष्टी सांगितल्या होत्या. ती आज ही मानते की, विराट सोबत काम करण्याचा अनुभव सुंदर होता. तमन्ना त्या जाहिरातच्या शूटनंतर कधीच एकमेकांना भेटले नाही. तमन्ना असे म्हणते की. या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही.

Tamanna Relationship
Tamanna Relationship

दरम्यान, विराट कोहलीने डिसेंबर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न केले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत राहतात. या व्यतिरिक्त अनुष्का शर्माने मॅच दरम्यान स्टेडियममध्ये पाहिले जाते. या दोघांना वामिका नावाची मुलगी आहे.

विराट व्यतिरिक्त तमन्ना हिचे नाव आणखी एका क्रिकेटरसोबत जोडले गेले होते. तो पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक होता. दोघांचे एकमेकांसोबतचे एका ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर अशी अफवा पसरली गेली होती, ते दोघं लग्न करणार आहेत. यासाठीच ते दोघं शॉपिंग करतायत. परंतु यामध्ये सुद्धा काही तथ्य नसल्याचे तमन्नाने म्हटले. केवळ ज्वेलरीच्या शॉपच्या ओपनिंग इवेंटवेळी बोलावण्यात आल्याचे तिने सांगितले. या व्यतिरिक्त आमच्यामध्ये काहीही नाही असे तिने स्पष्ट केलेयं. (Tamanna Relationship)

हेही वाचा- ‘या’ Celebrity नी ब्रेकअपनंतर एक्स पार्टनरचे केलेयत हैराण करणारे खुलासे

दरम्यान, सध्या तमन्ना ही अभिनेता विजय वर्मा याला डेट करत आहे. तमन्नाने काही इंटरव्यूमध्ये असे सुद्धा सांगितले आहे की, ती त्याच्यावर किती प्रेम करते. लस्ट स्टोरीज-२ च्या या अभिनेत्रीने विजयला आपली हॅप्पी प्लेस म्हटले आहे. तसेच त्याच्या पर्सनालिटीचे सुद्धा ती नेहमी कौतुक करत असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.