15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. यानंतर अफगाणिस्तानमध्ये अमुलाग्र बदल झाला. एरवीही या देशात महिलांना फारसा अधिकार नव्हता. मात्र तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि येथील महिलांनी जिवंतपणीच मारण्यात आलं. रोज महिलांवर नव्या बंधनांची घोषणा होत गेली. यात तेथील महिलांचे शिक्षण बंद झाले. येथील महिलांनी शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असा अबाया घालणे बंधनकारक घातले. आता तर या महिलांवर आणखी नवे बंधन आणले आहे, ते म्हणजे, अफगाणिस्तानमधील महिलां त्यांच्या घराच्या खिडकीतूनही बाहेर बघू शकणार नाहीत. (Afghanistan)
यासाठी महिलांचा त्या घराच्या खोलीतील खिडक्याच बंद करण्याचा आदेशही तालिबान सरकारनं काढला आहे. तालिबानचे राज्य आल्यापासून अफगाणिस्तानमधील महिलांना घरातच कैद करण्यात आले आहे. तालिबानच्या या वाढत्या आक्रमणाबाबत अफगाणी महिलांच्या संतापात वाढ होत आहे. अफगाणिस्तानमधील महिलांसाठी तालिबान राजवटानं आणखी एक गंभीर फर्मान जाहीर केलं आहे. यानुसार येथील महिलांना आपल्या घराच्या खिडकीतूनही बाहेरही डोकावता येणार नाही. तालिबान राजवट अफगाणिस्तानमध्ये लागू झाल्यावर रोजच महिलांच्या बाबत एक फर्मान काढून त्यांचा कोंडमारा करण्याचा प्रयत्न केला आहे. (International News)
आधीच येथील बहुतांश महिला शिक्षण संस्था बंद करण्य़ात आल्या आहेत. तसेच महिलांच्या पोशाखावरही बंधने आणण्यात आली आहेत. महिलांना बाजारात जातांनाही काही नियम पाळावे लागतात. आता याच महिलांनी आपल्या घरात कसे राहवे, हेही तालिबानी ठरवणार आहेत. कारण तालिबानी महिलांना खिडक्यातून बाहेर डोकवण्यात बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने महिला जर खिडकीतून बाहेर डोकावत असतील तर त्यामुळे ‘अश्लील कृत्ये’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यातून बाहेर काय चालले आहे, हे बघण्याचा प्रयत्नही करु नये. महिला घराच्या खिडकीतून बाहेर डोकावू नयेत म्हणून या खिडक्याच बंद कराव्यात असेही या सर्वोच्च नेत्यानं सांगितले आहे. (Afghanistan)
अर्थात फक्त महिलांसाठी हे फर्मान काढून हा सर्वोच्च नेता शांत राहिला नाही, तर या फर्मानाचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यानं काही अधिका-यांवर नेमली आहे. आता हे अधिकारी घराघरात जाऊन महिलांचा वावर घरातील ज्या भागात जास्त असतो, तेथील खिडक्याच कायमस्वरुपी बंद करणार आहेत. यातही कुठली महिला खिडकीतून डोकवतांना दिसली तर तिला कोडे मारण्याची शिक्षाही देण्यात येणार आहे. तालिबान 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आल्यापासून महिलांचे सार्वजनिक आयुष्य संपुष्टात आले आहे. आता त्यांच्या घरातील वावरावरही बंधने आली आहेत. जणू महिलांना त्यांच्या घरातच बंदीवासात ठेवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमधील महिलांवर होणा-या या अत्याचाराबाबत संयुक्त राष्ट्र संघानेही निषेध केला आहे. (International News)
आधीच महिलांना स्थानिक रेडिओ स्टेशन आणि दूरचित्रवाणीमध्येही बंदी घालण्यात आली आहे. महिला काय मुलींनाही येथील बागांमध्ये जाण्यास बंदी आहे. बाहेर जायची वेळ आलीच तर पूर्ण शरीर झाकूनच महिलांना बाहेर पडावे लागते. अगदी डोळ्यावरही पातळ पडदा घ्यावा लागतो. असा पूर्ण वेश नसेल तर महिलांना सार्वजनिक जागी चाबकाचे फटके खावे लागत आहेत. तालिबानच्या या कठोर आदेशाच्या विरोधात अनेक महिलांना आंदोलने केली. मात्र त्या सर्व महिलांना तालिबानी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तालिबान राजवटीचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी महिलांनी कुठल्याही प्रकारे आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना कठोर शासन करण्यात येईल असे जाहीरपणे सांगितले आहे. (Afghanistan)
====================
हे देखील वाचा :
Dalai Lama : कोण आहे दलाई लामांचा उत्तराधिकारी !
Manmohan Singh : जेव्हा देशहितासाठी एकत्र आले होते ते तिघे!
====================
गंभीर गोष्ट अशी की महिलांनी कुठल्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना अटक करण्यात येते. अशा महिलांना सोडवण्यासाठी त्यांच्या कुटंबियांना कर्ज काढावे लागत आहे. याशिवाय पुरुष साथीदार आणि हिजाबशिवाय महिला घराबाहेर पडणार नाही, अशा आशयाचे पत्र पोलिस स्थानकात लिहून द्यावे लागत आहे. वयाची 12 वर्ष पूर्ण केलेल्या मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर मुलींचे शिक्षण पूर्णपणे बंद झाले आहे. शिवाय महिला करत असलेले सर्व व्यवसायही बंद करण्यात आले आहेत. महिलांचे पार्लर, दवाखाने, बेकरी बंद करण्यात आले आहेत. या सर्व महिला घरातून काही काम करतील तर तीही आशा आता नाही. कारण महिलांना घराच्याबाहेर काही बोर्डही लावता येणार नाहीत. त्यांच्याच घरातील सर्व खिडक्याच बुझवण्यात येत असल्यामुळे अफगाणिस्तानच्या महिला घरातच एकांतवासाची शिक्षा भोगत आहेत. (International News)
सई बने