येमेनची राजधानी साना येथील मध्यवर्ती तुरुंगात बंद असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया यांना मृत्युदंडापासून वाचवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ज्या महदीच्या मृत्युमुळे निमिषाला मृत्यूदंड झाला आहे, त्याच्या भावाने निमिषा प्रियाला माफ करण्यास नकार दिला आहे. निमिषाचा गुन्हा गंभीर आहे, तिला फाशी शिवाय दुसरी शिक्षा होऊच शकत नाही, असे सांगून महदीच्या कुटुंबियांनी निमिषाला माफ करण्यास नकार दिला आहे. (Talal Abdo Mahdi)
याआधी निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार होती. पण तिला वाचवण्यासाठी केरळमधील एका मुस्लिम नेत्यानं येमेनमध्ये वाटाघाटी केल्या. त्यामुळे निमिषाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. निमिषाला शिक्षा देण्याऐवजी ब्लडमनी महदीच्या कुटुंबाला देण्याची चर्चा सुरु झाली. याबाबत 8 करोड रक्कमही ठरवण्यात आली. मात्र या ब्लडमनी शब्दावर महदीच्या कुटुंबानं आक्षेप घेतला. भारतातील समाजमाध्यमात निमिषाला चांगले दाखवण्यात येत असून महदीला खलनायक करण्यात आले होते. वास्तवात निमिषानं महदीबरोबर विवाह केला होता. दोघांनी मेडिकल कॉलेज सुरु केले होते. आर्थिक वादातून निमिषानं महदीची हत्या केल्याचा आरोपही येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्या भावानं केला आहे. त्यामुळे केरळची परिचारिका निमिषा प्रिया हिला शिक्षेपासून सूट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. येमेन देशाच्या साना मध्यवर्ती तुरुंगात बंद असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला मृत्युदंडापासून वाचवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Updates)
केरळमधील मुस्लिम धर्मगुरू कांथापुरम एपी अबुबकर मुसलियर यांनी येमेनमधील धर्मगुरुंबरोबर निमिषाच्या प्रकरणावर चर्चा केली. यातून निमिषाची शिक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आली. मात्र या सर्वावर मृत तलाल मेहदीचा भाऊ, अब्देलफत्ताह मेहदीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं निमिषाला माफी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. येमेनच्या शरिया कायद्यानुसार, माफीचा अधिकार केवळ मृताच्या कुटुंबाला आहे. यात निमिषाच्या बदल्यात जी रक्कम महदीच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे, त्यासाठी अब्जाधीश एम.ए. युसूफ अली मदत करण्यास पुढे आले आहेत. तर येमेनमधून सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम हे निमिषाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वात तलाल अब्दो महदीच्या कुटुंबानं ब्लड मनीच्या मुद्द्यावरुन आक्षेप घेतल्यानं मोठी गोची निर्माण झाली आहे. (Talal Abdo Mahdi)
सध्या निमिषा येमेनची राजधानी साना येथील मध्यवर्ती तुरुंगात आहे. या तुरुंगावर हुथी या दहशतवादी संघटनेचे नियंत्रण आहे. शिक्षा देण्याची तारीख जवळ आल्यावर निमिषाला वाचवण्यात यश आले होते. मात्र महदीच्या कुटुंबाच्या नाराजीमुळे पुन्हा समस्या निर्माण झाल्या आहेत. तलाल अब्दोच्या कुटुंबाला 8 कोटी दिल्यावर निमिषाला माफी मिळणार अशा आशयाच्या बातम्या भारतातून दाखवण्यात आल्या. यावरच महदीच्या कटुंबानं आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, भारतीय माध्यमे या प्रकरणातील तथ्ये विकृत करत आहेत आणि गुन्हेगाराला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Latest Updates)
तलालच्या भावाने याबाबत नाराजी व्यक्त करुन सांगितले की, तो निमिषाला माफ करणार नसून कुठलिही तडजोड मान्य करणार नाही. शिवाय निमिषा प्रियाचे शारीरिक किंवा मानसिक शोषण झाले नाही. निमिषाचा पासपोर्ट जप्त करण्यात आला नाही किंवा तिला त्रास देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. निमिषा आणि तलाल या दोघांनी एक मेडिकल कॉलेज उघडले होते. त्यांनी लग्नही केले होते, तसेच ते चार वर्ष नात्यात रहात असल्याचे या भावानं सांगितलं असून निमिषानं पैशासाठी भावाचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिचारिका असलेली निमिषा प्रिया 2008 पासून येमेनमध्ये राहत होती. तिथे तिनं एक क्लिनिक सुरू केले. स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी तिने तलाल अब्दुल महदी या येमेनी नागरिकाबरोबर भागीदारी केल्याची माहिती आहे. (Talal Abdo Mahdi)
=============
हे ही वाचा : Yulia Sviridenko : युक्रेनच्या राजकारणात महिलांचे वाढते वर्चस्व !
==========
तलाल अब्दुल मेहदीबरोबर नंतर निमिषाचे संबंध बिघडले. तिचा पासपोर्टही त्यानं ताब्यात घेतल्याचा दावा केला जातो. 2017 मध्ये हा पासपोर्ट मिळवण्यासाठी आणि येमेनमधून पळून जाण्यासाठी निमिषानं तलाल अब्दुल मेहदीला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले. पण त्यातील औषधाच्या जास्त मात्रेमुळे मेहदीचा मृत्यू झाला. या प्रकरणात निमिषा प्रियाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय परिचारिका निमिषा प्रिया ज्या येमेनी देशात तुरुंगात आहे तो एक संघर्षग्रस्त देश आहे. युद्ध, उपासमार, गरिबी आणि रोगराईने येमेनमधील लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम केला आहे. अशाच देशात निमिषा राजधानी सना येथील मध्यवर्ती तुरुंगात बंद आहे. हा तुरुंग हुथी बंडखोरांच्या ताब्यात आहे, त्यामुळे येथील परिस्थिती खूपच कठीण आहे. निमिषाला वाचवण्यासाठी फक्त ब्लडमनीचा पर्यायच शिल्लक होता. पण त्यावरही आक्षेप घेण्यात आल्यामुळे निमिषाची शिक्षा कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. (Latest Updates)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics