परंपरेचे पालन करत निंगमा संप्रदायाने हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती येथे राहणाऱ्या एका साडेचार वर्षाच्या मुलाला दिवंगत तिबेटीयन लामा तकलुंग सेतरुंग रिनपोछे यांचा अवतार मानले आहे. नवांग ताशी राप्टेन हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती मध्ये स्पिती घाटीतील ताबो क्षेत्राच्या रंगरिक गावात राहणारा आहे. या मुलाच्या आई-वडिलांसह आपल्या घरी अशा मुलाचा जन्म झाल्याने खुप आनंदत आहेत. जे औपचारिक रुपात तिबेटियन बुद्धांचे सर्वाधिक मोठे गुरु आहेत. या मुलाचे नुकतेच धार्मिक आयुष्य सुरु झाले आहे. त्याचे धार्मिक शिक्षण शिमलातील पंथाघाटी स्थित दोरजीदक मठात सुरु होणार आहे. नवांश ताशी याच्या आजोबांनी असे सांगितले की, सर्वात प्रथम मला काहीच कल्पना नव्हती की,माझा नातू हा तिबेटीयन लामा यांचा अवतार आहे. जेव्हा गुरु आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, पुढील लामा तुमच्याजवळ आहे.(Taklung Setrung Rinpoche)
समारोहाला आलेल्या एका बुद्ध भिक्षुकाने असे म्हटले की, आज त्याचे मुंडन आणि कपडे बदलण्याचा समारोह आहे. जेव्हा तो सर्व लामांचा आशीर्वाद घेईल तेव्हा त्याचे शिक्षण सुरु होईल. तो बुद्धांच्या जगातील लोकांसाठी फार महत्वाची घटना आहे कारण यासाठी त्यांना ७ वर्ष वाट पहावी लागली. दोरजीदक मध्ये तिबेटीयन बुद्ध भिक्षुक आणि अन्य लोकांसह हिमाचल प्रदेशातील हिमालयी क्षेत्रातील अन्य बुद्ध शिष्यांनी शिमलातील नवांग ताशी याचे स्वागत केले.
आईने दिली अशी प्रतिक्रिया
त्याच्या आईने प्रतिक्रिया देत असे म्हटले की, आम्हाला या बद्दल काहीच माहिती नव्हते ना आम्ही अशा गोष्टीसाठी तयार होतो. जेव्हा एका वर्षापूर्वी दोरजीदक मठातील लोक आमच्याकडे आले. ते दलाई लामा आणि नंतर शाक्य त्रिचेन रिनपोछे यांच्याकडे गेले आणि नंतर त्यांच्याशी चर्चा आणि पुर्नजन्मच्या अनुष्ठानानंतर नवांग ताशी याला अवतार मानले.(Taklung Setrung Rinpoche)
तसेच आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार यामुळे वाईट ही वाटले. पण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की, सर्वात मोठ्या धर्म गुरुंनी आमच्या घरी जन्म घेतला आहे. माझी दोन मुलं आहेत. तो लहान आहे आणि त्याला एक मोठी बहिण आहे. मी आनंदित आहे कारण तो लोकांना शिक्षण देणार आणि त्यांच्या भल्यासाठी काम करणार. मला स्वत: ला नशीबवान असल्याचे वाटत आहे की, मी या मुलाला जन्म दिला.
हे देखील वाचा- भारतातील ‘ही’ आहेत भुताटकी मंदिर, तेथे जाणे म्हणजे थरकाप उडवणार अनुभव येणे
वडिलांसाठी आनंदाचा क्षण
नवांश ताशी याचे वडिल लामा सोनम चोपेल यांनी असे म्हटले की, हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, कारण तिबेटीयन लमा तकलुंग सेतरुंग रिनपोछे यांच्या अवताराचा पिता आहे. मी कधीच याचा विचार केला नव्हता. तो जेव्हा आधी शाळेत होता पण त्यांच्या अवतार आणि शाक्य ठिचेन रिनपोछे यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर आम्हाला त्याचे शिक्षण थांबवावे लागले.