Home » उन्हाळ्याच्या सुट्टीत घ्या ‘या’ स्वस्तात मस्त ठिकाणांवर समर कॅम्पचा आनंद

उन्हाळ्याच्या सुट्टीत घ्या ‘या’ स्वस्तात मस्त ठिकाणांवर समर कॅम्पचा आनंद

by Team Gajawaja
0 comment
summer camp
Share

मुले उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्यात मुलांच्या शाळा बंद असतात, त्यामुळे ते फिरण्याचा प्लॅन बनवतात. सुट्ट्यांमध्ये, मुले त्यांच्या पालकांसह सहलीला जाण्यासाठी खूपच उत्सुक असतात. केवळ मुलेच नाही, तर प्रवासाची आवड असणारा प्रत्येक माणूस उन्हाळ्यात ट्रिपवर जाण्यासाठी आसुसलेला असतो. उन्हाळ्यात लोकांना थंड ठिकाणी जायचे असते, जिथे ते ऍडव्हेंचर करू शकतील. दैनंदिन जीवनातील व्यस्त वेळापत्रक बाजूला ठेवून, काही दिवस आरामात घालवण्यासाठीच लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट पाहत असतात.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रिपची प्लॅनिंग करत असाल, तर अशी जागा निवडा जी शांत आणि ऍडव्हेंचरसाठी देखील योग्य असेल. तसेच, त्या ठिकाणचे तापमान कमी असावे, जेणेकरून उन्हाळ्यात तुम्हाला थंडावा जाणवेल. उन्हाळ्यात लोक सहसा समर कॅम्पला जातात. यावेळी उन्हाळ्याच्या ऋतूत जर तुम्ही कुटुंब, मुले किंवा मित्रांसह समर कॅम्पला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कमी पैशात काही ठिकाणी भेट देऊ शकता. जाणून घेऊया समर कॅम्पसाठी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ठिकाणे.(Summer camp)


सोनमर्ग, जम्मू आणि काश्मीर 

जम्मू काश्मीर हे उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पण समर कॅम्पचा आनंद घ्यायचा असेल, तर सोनमर्गला नक्की भेट द्या. सोनमर्ग हे काश्मीरमध्ये स्थित एक सुंदर शहर आहे, जिथले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मोहित करेल.(Summer camp)



चंद्रताल सरोवर, हिमाचल प्रदेश 

हिमाचल प्रदेशातील शिमला- मनाली येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. परंतु उन्हाळ्यात तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या चंद्रताल सरोवराला भेट देऊ शकता. हे लाहौल आणि स्पिती खोऱ्यात वसलेले आहे, जे समुद्रसपाटीपासून ४,३०० मीटर उंचीवर आहे. अनेक पर्यटक येथे कॅम्पिंगसाठी येतात. उन्हाळ्यात, तुम्ही येथे बजेटमध्ये कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.(Summer camp)



सोलांग व्हॅली, हिमाचल प्रदेश 

तुम्ही मनाली मार्गे हिमाचल प्रदेशातील सोलांग व्हॅलीला भेट देऊ शकता, जिथे तुम्‍हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्‍या छान पद्धतीने घालवता येतील. सोलांग व्हॅली अनेक साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे दूर-दूरवरून पर्यटक कॅम्पिंगसाठी येतात.(Summer camp)



स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश 

हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीही पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. केलॉन्ग जिल्ह्यात स्थित स्पिती व्हॅली हे साहसप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे उन्हाळा. निसर्गाची सुंदर दृश्ये पाहण्यासाठी तुम्ही स्पिती व्हॅलीमध्ये कॅम्पिंग आणि ऍडव्हेंचरचा आनंद देखील घेऊ शकता.(Summer camp)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.