Home » ताजमहालावर दिव्यांची रोषणाई का केली जात नाही?

ताजमहालावर दिव्यांची रोषणाई का केली जात नाही?

by Team Gajawaja
0 comment
Taj mahal lighting
Share

देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. विविध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय संस्था ते स्मारके ही तिरंग्याच्या रोषणाईने सजवली जात आहेत. परंतु ताजमहलावर कोणत्याही प्रकारची रोषणाई करण्यात आलेली नाही. ऐवढ्या मोठ्या दिवसाच्या वेळी सुद्धा ताजमहल हा अंधारातच आहे. अशाच काही प्रश्न उपस्थितीत राहतात की, देशभरातील संरक्षित स्मारकांना रोषणाईने सजवले जातेय पण ताजमहालाला का रोषणाई करण्यात आलेली नाही? यामागे एक खास कारण असून त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात.(Taj mahal lighting)

दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात प्रथम केली होती दिव्यांची रोषणाई
ताजमहालावर सर्वात प्रथम दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान दुधी रंगाची रोषणाई केली होती. तेव्हा दुसरे महायुद्ध जिंकल्याने मित्र देशांच्या सेनेकडून ताजमहालावर रात्रीच्या वेळी रोषणाई करण्यात आली नव्हती तर आतमध्ये सुद्धा विजय साजरा करण्यात आला होता. ताजमहल देशातील असे पहिले स्मारक होते ज्यावर रात्रीच्या वेळी दिव्यांची रोषणाई केली होती. ८ मे १९४५ रोजी मित्र देशांच्या सेनांच्या समोर जर्मनीच्या सेनेने आत्मसमर्पण केले होते. तो दिवस मित्र देशांनी ‘वीई डे’ च्या नावे साजरा केला. युनाइटेड किंगडम आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या सेनेकडून प्रत्येक वर्षी वीई डे साजरा केला जातो. या दिवशी ताजमहलावर फ्लड लाइट्स लावण्यात आल्या होत्या.

ताजमहलावर शेवटीची रोषणाई कधी करण्यात आली?
ताजमहलावर शेवटची रोषणाई ही २० ते २४ मार्च, १९९७ च्या रात्रीच्या वेळी करण्यात आली होती. तेव्हा प्रसिद्ध युनानी पियानोवादक यान्नी यांच्या शो दरम्यान ही रोषणाई करण्यात आली होता. ताजमहलाच्या मागील बाजूस असलेल्या आकरा सिड्डी स्मारकाच्या जवळ जगप्रसिद्ध युनानी संगीतकार यान्नी यांचा शो आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ताजमहालावर विविध रंगांची फ्लड लाइट्स लावण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम भारतातच नव्हे तर जगभरातील काही देशांमध्ये लाईव्ह ही दाखवला जात होता.

Taj mahal lighting
Taj mahal lighting

ताजमहालावरील दिव्यांची रोषणाई करणे का बंद केले?
खरंतर यान्नी यांच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी ताजमहलाच्या परिसरात काही कीडे मेलेले मिळाले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने याचे रासायनिक सर्वे केला. त्याच्या तपासात असे समोर आले की, या किड्यांमुळे ताजमहालावर त्यांची निशाण राहतात. यामुळे संगमरवराचे नुकसान होते. त्यानंतर ताजमहलावर रोषणाई करणे बंद करण्यात आले. काही खास दिवसांसाठी दिव्यांची रोषणाई करण्याची परवानगी मागितली गेली पण त्याला मंजूरी देण्यात आली नाही.(Taj mahal lighting)

हे देखील वाचा- काबा मधील काळ्या दडगाचे रहस्य, ‘या’ कारणास्तव हज यात्रेकरु घेतात चुंबन

सुप्रीम कोर्टाने २४ मार्च १९९८ च्या आदेशात असे स्पष्ट केले होते की, ताजमहालच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा पूर्व अभ्यास केल्याशिवाय ५०० मीटरच्या परिघात कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. ऐवढेच नव्हे तर ताजमहलाच्या भिंतीवर नॅशनल इन्वायरमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इंस्टीट्युटच्या सिफारशीनुसार ५० डेसीबल पेक्षा अधिक आवाज नसावा. यान्नी यांच्या कार्यक्रमाच्या दोन वर्षानंतर १९९९ मध्ये झी टीव्ही वरीली कार्यक्रम सारेगामापा चे ताजमहालाच्या मागील बाजूस असलेल्या मेहताब बागेत शुटिंग करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सुद्धा ताजमहलाला रोषणाई करण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु ती देण्यात आली नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.