संपूर्ण जग जवळजवळ ३ वर्ष झाली तरीही कोरोनाचा सामना करत आहे. करोडो लोकांना यामुळे आपला जीव ही गमवावा लागला आहे. ऐवढेच नव्हे तर आता महारोगाचे नाव काढली तरी लोक घाबरतात. यामध्ये सर्वाधिक वरच्या स्तरावर असलेला म्हणजे मधुमेह. सध्याच्या काळात प्रत्येक वयोगटातील व्यक्तिला मधुमेहाचा आजार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. संपूर्ण जगभरात करोडोंच्या संख्येने लोक याचा सामना करत आहेत. हैराण करणारी बाब अशी की, या आजारावर ठोस असा तोगडा नाही आहे. याला फक्त नियंत्रणात ठेवता येऊ शकते. मधुमेहासंदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला आणि त्यासंदर्भातील रिपोर्ट हा अगदी हैराण करणारा आहे. या अभ्यासात T1D बद्दल असे काय सांगितले आहे की, जो आता चर्चेचा विषय बनला आहे.
TD1 संदर्भात मोठा खुलासा
टाइप १ मधुमेहाला T1D असे म्हटले जाते. हा आजार कमी वयोगाटील लोकांमध्ये ऑटइम्यून सिस्टिम मध्ये गडबड झाल्याने होतो. बहुतांश लोक ही समस्या जेनेटिक असल्याचे मानतात. यामध्ये लोकांच्या शरिरात इंन्सुलिन तयार होणे बंद होते आणि रक्तातील साखर वाढू लागते. मात्र टाइप २ मधुमेहाच्या तुलनेत यांचा आकडा कमी असतो. परंतु पुढील २० वर्षात हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा खुलासा लेसेंट डाइबिटीज अॅन्ड एंडोक्राइनोलॉजीमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आला आहे. यामध्ये जी आकडेवारी सांगण्यात आली आहे ती ऐकून सर्व हैराण झाले आहेत.

२०४० वर्षापर्यंत १.७४ कोटींवर टी१डी चा आकडा जाऊ शकतो
एजेएमसीच्या रिपोर्ट्सनुसार, रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांनी अनुमान लावले आहे की, वर्ष २०४० पर्यंत जगभरात टाइप १ मधुमेहाची आकडेवारी दुप्पट होऊ शकते. वर्ष २०२१ मध्ये टी१डी (T1D) च्या रुग्णांचा आकडा जवळजवळ ८४ लाख होता. जो २०४० मध्ये १.७४ कोटी होऊ शकतो. या अभ्यासात १५ देशांचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे. तो अॅनालिसिस केल्यानंतर संशोधकांनी हे जाहीर केले आहे. अभ्यासात हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, सध्याच्या काळात टाइप १ मधुमेहाशी सामना करत असलेल्या १५ लाख लोकांचे वय हे २० वर्षांपेक्षा ही कमी आहे. तर ५४ लाख लोकांचे वय २० ते ५९ वर्षादरम्यान आहे.
हे देखील वाचा- गुडघे दुखत असतील तर ‘ही’ योगासनं देतील आराम
भारतात टी२डी सुद्धा वाढण्याची शक्यता
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इंन्फॉर्मेशनच्या रिपोर्ट्सनुसार वर्ष २०४५ पर्यत भारतात टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांचा आकडा १३.४ कोटींहून अधिक होईल. वर्ष २०१९ मध्ये हा आकडा ७.७ कोटीच्या आसपास होता. टाइप २ मधुमेह हा सर्वाधिक सर्वसामान्य टाइप आहे. याचेच सर्वाधिक रुग्ण आढळतात. या आजारात व्यक्तिच्या शरिरात इंन्सुलिन तयार होते पण रजिस्टेंसच्या कारणामुळे इंन्सुलिन योग्य प्रमाणे काम करत नाही. अशा स्थितीत रक्तातील साखर वाढते आणि मधुमेहाची समस्या होते.