सीरियामध्ये बशर अल-असद सरकार इतिहासाचा एक भाग झाले आहे. बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कस पूर्णपणे ताब्यात घेतले असून सिरियाचे पंतप्रधानही त्यांच्या ताब्यात आहेत. सध्या बशरच्या राष्ट्रपती भवनात प्रचंड लूटमार सुरु असून बशर आपल्या कुटुंबासह परागंदा झाला आहे. त्याच्या कुटुंबाची सिरियावरील 50 वर्षाची सत्ता संपुष्ठात आली आहे. बशर अल-असदच्या विरोधात जवळपास 1 लाख सैनिक रस्त्यावर उतरले होते. शिवाय सिरियाचे नागरिकही बशरच्या विरोधात या सैनिकांना मदत करत होते. यासर्वात बशरचे सैन्यही जनतेवर अत्याचार करण्याच्या विरोधात होते. या सगळ्यांचा मिलाफ म्हणजेच सिरियामध्ये सत्तापालट झाली आहे. या सर्व बंडखोरांचे नेतृत्व केले ते हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाचा प्रमुख अबू मोहम्मद अल-जोलानी याने. (Abu Mohammad Al-Jolani)
अल कायदा या दहशतवादी गटामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि काही काळ अल कायदामध्ये महत्त्वाच्या भुमिकेवर असलेल्या अबू मोहम्मद अल-जोलानीने बशरची सत्ता उलथावून टाकली आहे. 2016 मध्ये जोलानीने स्वतःची संघटना उभी केली, आणि तो सिरियाचा मागे लागला. त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून बशरला मिळणारा इराक आणि रशियाचा पाठिंबा दूर सारुन हे यश संपादन केलं आहे. त्यामुळे आता हा अबू मोहम्मद अल-जोलानी नेमका कोण आणि त्याच्यासमोर बशरनं कशा पद्धतीनं हार मानली याची चर्चा सुरु झाली आहे. सिरियातील गृहयुद्ध संपून आता तिथे अबू मोहम्मद अल-जोलानी या बंडखोर नेत्याचे राज्य आले आहे. बंडखोरांनी सिरियाची राजधानी दमस्कस आणि सरकारी टीव्ही नेटवर्कचा ताबा घेतला तेव्हा बशर हा रशियाला पळून गेल्याची चर्चा झाली आणि बंडखोर गटाचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी कॅमे-यासमोर आला. त्यांनी संपूर्ण देशावर आपली सत्ता आली असून हा देश हुकुमशाही विरोधात कायम उभा राहिल असा विश्वास जनतेला दिला आहे. (International News)
एकेकाळी दहशतवादी संघटना अल कायदाची शाखा असलेली अबू मोहम्मद अल-जोलानी ची संघटना ही आता जगातील सर्वोत्कृष्ठ सैन्यांची संघटना आहे. 2016 पासून जोलानीनं आपल्या संघटनेला अल कायदापासून वेगळं केलं. तेव्हापासून त्यानं शिस्तबद्ध पद्धतीनं आपली संघटना बांधण्याचे काम सुरु केले. त्याच्याजवळचे सर्वच योद्धे हे उत्तम प्रशिक्षीत योद्धे आहेत. एचटीएसचे नेतृत्व करणारा अबू मोहम्मद अल जोलानी हा कट्टरपंथी नेता असला तरी तो आता स्वतःला आधुनिक विचारांचा नेता म्हणवून घेतो. याला कारण त्याला होत असलेला विरोध असल्याचे मत आहे. कारण पाश्चात्य देश एचटीएसला दहशतवादी संघटना मानतात. (Abu Mohammad Al-Jolani)
अगदी अमेरिकाही. अमेरिकेत अबू मोहम्मद अल-जोलानी याच्याविरोधात माहिती देणा-याला बक्षिस देण्याची घोषणा कऱण्यात आली आहे. अमेरिकेबरोबर हे वैर भविष्यात आपल्याला मारक ठरेल हे अबू मोहम्मद अल-जोलानीला माहित आहे. त्यामुळेच त्यानं स्वतःला आधुनिका विचारसरणीचा नेता म्हणायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. अबू जोलानी यांचा जन्म 1982 मध्ये झाला. सीरियाची राजधानी दमास्कसमधील माजेह भागात त्यांचे बालपण गेले. जोलानी याचे कुटुंब गोलन हाइट्स भागातील आहे. मात्र जोलानीच्या जन्मस्थानावरून वाद आहे. काही दाव्यांवरुन त्याचा जन्म अहमद हुसेन अल-शारा रियाध, सौदी अरेबियामध्ये 1982 मध्ये झाल्याचे सांगण्यात येते. जोलानीचे वडिल पेट्रोलियम अभियंता होते असेही काहींचे म्हणणे आहे. पण ते किराणा दुकानात काम करत होते, असा दावा करणारेही अनेक आहेत. अबू मोहम्मद अल-जुलानीचे बालपणीचे नाव अहमद अल-शरा आहे. तो क्वचितच चेहरा दाखवतो. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरुद्धच्या युद्धानंतर त्यांनी बगदादला जाऊन तेथील अमेरिकन आक्रमणाविरुद्ध लढा दिला. (International News)
========
हे देखील वाचा : देवा ! पुन्हा वेंगाबाबा
========
इराकमधील अल-कायदामध्ये तो सामील झाला. जोलानीला 2005 मध्ये मोसुलमध्ये अटक करण्यात आली. तेव्हा तो 23 वर्षांचा होता. इराक कॅम्प बुक्का येथील अमेरिकन तुरुंगात तो पाच वर्ष होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर जुलानीने नंतर अल कायदा पासून स्वतःला वेगळे केले आणि स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यामुळे अजूनही अमेरिकेने त्याच्यावर 1 डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. स्वतःची संघटना स्थापन केल्यावर जोलानीनं एचटीएसच्या बॅनरखाली एक मजबूत सैन्य तयार केले. यामध्ये जगभरातील लढवय्यांचा समावेश आहे. जोलानी गेली अनेक वर्ष सिरियामध्ये हल्ले करत आहे. मात्र गेल्या 11 दिवसात त्यानं जे केलं त्यामुळे सिरियाची सत्ता त्याच्या हातात आली आहे. जोलनानं सीरियातील सरकारचे मित्र हिजबुल्लाह आणि इराण यांच्याशी इस्रायलचा संघर्ष वाढला तेव्हाच संधी साधत बशर अल-असद सरकारवर हल्ला चढवला. त्यात तो यशस्वी झाला असून सिरिचावर आता त्याचा ताबा आहे. आता तो सिरियाचा नवा हुकुमशहा होणार ही लोकशाही सरकार चालवणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. (Abu Mohammad Al-Jolani)
सई बने