आपल्या घरात विविद वीजेच्या उपकरणांचा वापर केला जातो. परंतु जेव्हा आपण एखादी पिन स्विच बोर्डाच्या (Switch board) सॉकेटमध्ये लावतो तेव्हा ते त्याला तीन पिन्स असतात. बहुतांश विजेचे प्लग हे तीन पिनांचेच असतात. जर तुम्ही स्विच बोर्ड खोलून पाहिल्यास तुम्हाला या तीन पिनांमध्ये तीन तारा जोडलेल्या असतात. या तिन्ही पिनांचा आकार हा समान आणि एकसारखाच असतो. परंतु तिसरी पिन ही या दोन पिनांच्या तुलनेत आकाराने थोडी मोठी असते. या पिनला सामान्यपणे एक हिरव्या रंगाच्या तारेने जोडले जाते. या तारेला अर्थ तार असे म्हटले जाते. परंतु तुम्ही कधी लक्ष दिले आहे का याकडे की तीन पिन्स का दिले जातात?
तिसरी पिन आणि हिरव्या रंगाच्या तारेतून सामान्य स्थितीत कोणत्याही प्रकारची विद्युत पुरवठा होत नसतो. या तारेचा एक भाग हा ज्या विजेच्या उपकरणाचा तुम्ही वापर करत आहात त्याला जोडलेला असतो. तसचे हिरव्या रंगाची तार असेलला पिन प्लगच्या माध्यमातून ज्या पॉइंटला जोडला जातो त्याला अर्थिंकला जोडला जातो. त्याला इलेक्ट्रिक ग्राउंडिंग असे सुद्धा म्हटले जाते.
जेव्हा विजेचा धक्का लागतो
कधी कधी असे होते की, विद्युत उपकरणांमध्ये काही फॉल्ट असतो तेव्हा या उपकरणात विजेचा पुरवठा होऊ लागतो. अशा स्थितीत जेव्हा एखाद्याने त्याला हात लावल्यास त्याला त्याचा झटका लागतो. विजेच्या झटक्याची गंभीरता या गोष्टीवर अवलंबून असते की, मनुष्याच्या शरिसार किती वीजेचा धक्का कशा प्रकारे प्रवाहित होत आहे. जर त्याचे हात ओलसर असतील तर शरिरात अधिकाधिक विजेचा धक्का लागतो. याचे कारण म्हणजे कोरड्या त्वचेपेक्षा ओली त्वचा ही वीजवाहक असते आणि अशा स्थितीत व्यक्तीला जोरदार धक्का बसतो. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो.(Switch board)
हे देखील वाचा- नवं घर खरेदी करताना ‘ही’ महत्वाची कागदपत्र जरुर तपासून पहा
तिसऱ्या पिनच्या माध्यमातून अर्थिंगचे काम
तिसऱ्या पिनचा वापर किंवा अर्थिंग अशी एक पद्धत आहे जी फॉल्ट असलेल्या उपकरणांमधून निघणारा वीजेचा पुरवठ्याच्या झटक्यापासून आपल्याला सुरक्षितता देते. मेस मध्ये वापरली जाणारी सर्व उपकरणांसाठी हे फार महत्वाचे आहे की, त्यांचे अर्थिंग सोबत योग्य जोडणी केलेली असावी. प्लगचा तिसरा पिन हेच काम करतो.
तर झटका लागणार नाही
जर विजेची तिसरी पिनची योग्य प्रकारे अर्थिंग असेल तर विजेचे उपकरण जरी फॉल्टी असेल किंवा त्यामध्ये करंट सुरु झाल्यास तर विजेचा झटका लागणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला विजेचा प्लगचा तिसरा पिन तुम्हाला अधिक सुरक्षितता देतो.