Swimming and sleep relation : स्विमिंग ही अशी एक्सरसाइज आहे ज्यामुळे पूर्ण शरीर सक्रिय राहते. स्विमिंग करतान आपले स्नायू, हाड, श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया आणि मेंदू , हे सगळं एकत्रित पणे कार्य करते. यामुळे शरीरातील खूप उर्जा खर्च होते आणि त्यासाठी शरीर स्वतःला पुन्हा फ्रेश ठेवण्यासाठी आरामाची गरज भासते. याशिवाय पाण्यात राहिल्यामुळे शरीरच तापमान कमी होत, ज्यामुळे मेंदूला झोपेचे संकेत मिळू लागतात.
1 संपूर्ण शरीरातील स्नायूंचा वापर
स्विमिंग हा असा व्यायाम आहे ज्यामध्ये शरीराचं जवळपास प्रत्येक भागातील स्नायूला काम करावे लागते. हात, पाय, पाठ आणि मान.
जेव्हा स्नायू सतत कार्यान्वित असतात तेव्हा त्यांच्या कार्यासाठी खूप ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे शरीर थकते आणि मेंदूला असा संकेत मिळतो की, आता विश्रांती घेणं आवशक आहे. ह्याच कारणामुळे स्विमिंग केल्यानंतर थकवा जाणवतो आणि झोप येऊ लागते.
२ पाण्याचे आणि शरीराचे तापमान
पाण्यात राहिल्यामुळे शरीराच तापमान कमी होऊ लागते, विशेष म्हणजे जेव्हा पाणी थंड असते, तेव्हा शरीराला अपल तापमान संतुलित ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. या प्रक्रियेमुळे थकवा वाढतो. स्विमिंग झाल्यावर जेव्हा तुम्ही पाण्या बाहेर येता, तेव्हा शरीराचे तापमान सामान्य होण्याच्या दिशेने काम करते आणि झोप येऊ लागते.
३ ऑक्सिजनचा वापर आणि श्वास घेण्याची पद्धत
पोहताना शरीराला सामान्यपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासते कारण सर्व स्नायू सक्रिय असतात. श्वास घेण्याचाही ठरावीक आणि नियंत्रित पद्धतीने वापर होतो, ज्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनावर अधिक तण येतो. या वाढलेल्या ऑक्सिजनच्या वापरामुळे आणि नियंत्रिक श्वसनामुळे शरीर अधिक थकते, जे पोहल्यानंतर थकवा आणि झोप येण्याच आणखी एक कारण ठरते.
======================================================================================================
हेही वाचा :
तूप की एलोवेरा, कोरड्या त्वचेसाठी काय उत्तम?
चेहऱ्याला दररोज दही लावण्याचे फायदे-नुकसान घ्या जाणून
=======================================================================================================
४ स्ट्रेस कमी होतो
जेव्हा आपण पाण्यात असतो, तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शरीरावर कमी परिणाम होतो. त्यामुळे शरीराला एक प्रकारची विश्रांती मिळते. पाण्यात स्नायू अधिक रिलॅक्स होतात आणि मनही शांत होते. ही मानसिक शांतता नैसर्गिकरित्या झोप येण्याचं कारण ठरते.(Swimming and sleep relation)
५ पोहल्यानंतर आहार
पोहल्यानंतर शरीराची भरपूर ऊर्जा खर्च होते, त्यामुळे योग्य आहार घेणं अत्यंत महत्वाच असते. पोहणं हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असल्यामुळे, स्नायूंच्या दुरुस्तीसाठी प्रोटीन आणि ऊर्जेच्या पुनर्भरणीसाठी कार्बोहाइड्रेटयुक्त संतुलित आहार घेणं गरजेचं असते. त्याचप्रमाणे, पाण्यात व्यायाम करत असताना शरीरातून घामाच्या स्वरूपात आणि श्वासाच्या प्रक्रियामुळे पाणी गमावलं जात, जे आपल्याला लगेच जाणवत नाही. त्यामुळे पोहून झाल्यावर योग्य प्रमाणात पाणी किंवा इलेक्ट्रॉलाइटयुक्त पेय घेणं अवशक असते.