Sweet food craving बहुतांशजणांना जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. खरंतर, जेवणानंतर गोड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही. या सवयीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढली जाऊ शकते. याशिवाय मधुमेहाच्या आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, गोड खाण्याची क्रेविंग का होते? यामागील कारण वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. रिपोर्ट्सनुसार, जेवल्यानंतर गोड खाण्याच्या सवयीमागे काही कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे पोषण तत्त्वांची कमतरता, असंतुलित आहार अथवा तणावामुळेही गोड खाण्याची सवय लागू शकते. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया…
ब्लड शुगर अस्थिर असणे
जेवणामध्ये रिफाइंड कार्बोहाइड्रेट भरपूर असल्यास शरिरातील ब्लड शुगर वेगाने वाढून कमी होऊ शकतो. यामुळे शरिराला इंस्टंट एनर्जी मिळण्यासाठी साखरेची गरज भासते आणि त्यावेळी गोड खाण्याचे मन करते.
इमोनशल कारण
काहीजण आराम मिळण्यासाठी किंवा स्वत:च्या मनाला बरे वाटण्यासाठी गोड खातात. याशिवाय इमोशनल इटिंगच्या कारणास्तवही गोड खातात

sweet food craving
गोड खाण्याची सवय
जेवल्यानंतर प्रत्येकवेळी गोड खाण्याचे मन करत असेल तर याची सवय लागू शकते. यामुळे जेवल्यानंतर गोड खाणे शक्यतो टाळावे.
=======================================================================================================
हेही वाचा :
Saffron for Skin : चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाटी केशरचे 5 फायदे
Black Raisins : काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने शरीराला होतील अनेक मोठे फायदे
=======================================================================================================
पौष्टिक आहाराची कमतरता
जेवणामध्ये पोषण तत्त्वांचा अभाव असल्यास गोड पदार्थांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे जेवणानंतर गोड खाण्याची क्रेविंग होते. (Sweet food craving)
शरिरात उर्जेची कमतरताा
खूप थकले असल्यास शरिराला लगेच उर्जा मिळण्यासाठी साखरेची गरज भासते. अशातच काहीजण गोड पदार्थ खातात.